लॉस एंजेलस ऑलिम्पिक्स जुलै २०२८ मधे आहे. म्हणजे त्याला अजुन २ वर्षांपेक्षा जास्त दिवस बाकी आहेत.
पण हा धागा इतक्या आधी सुरु करायचे कारण म्हणजे आत्ताच २ तासापुर्वी मला लॉस एंजेलस ऑलिंपिक्स ऑर्गनायझिंग कमिटीचे इ मेल आले आहे की तिकीट विकत घ्यायच्या प्रॉसेस मधे माझे नाव “ पहिल्या लॉट“ मधे आले आहे! याचा अर्थ मला कोणत्याही ऑलिंपिक्स इव्हेंटची तिकीटे घेण्यात सर्वात आधी संधी मिळणार आहे. त्यांच्या नियमानुसार मला १२ तिकिटे मिळणार आहेत. मग ती मी १२ ईव्हेंट्सचे एक तिकिट किंवा ६ ईव्हेंट्सची २ तिकिटे किंवा ४ इव्हेंट्सची ३ तिकिटे …. वगैरे वगैरे घेउ शकतो. ( या १२ तिकिटां व्यतिरिक्त मी अजुन फक्त सॉ़करची १२ तिकिटे घेउ शकतो). मला त्यांनी ती तिकिटे विकत घ्यायला १३ एप्रिल पासुन ४८ तासांची मुदत दिली आहे. अर्थातच मी १२ तिकीटे घेणार आहे. आमच्या घरी ३ जण आम्ही आहोत. म्हणजे एकुण ४ इव्हेंट्सना आम्हाला जाता येणार आहे.
या तिकीट मिळवायच्या प्रोसेसची सुरुवात जवळजवळ वर्षभरापुर्वी मी सुरु केली होती.
मायबोलीवर ज्यांनी ज्यांनी माझे लेखन वाचले आहे त्यांना ठाउ़क आहे की मला सर्व स्पोर्ट्समधे किती स्वारस्य आहे व खासकरुन ऑलिम्पिक्समधे! २००८ च्या सुमारास मी मायबोलीवर बैजींग ऑलिम्पिक्स निमित्त ऑलिम्पिक्स गोष्टींची एक लेखमालाही लिहीली होती.
३-४ वर्षांपुर्वी जेव्हा २०२८ ऑलिम्पिक्स लॉस एंजेलस मधे होणार आहे हे जाहीर झाले तेव्हाच मी ते अटेंड करायचे ठरवले होते व मायबोलीवर म्हटले होते की लॉस एंजेलस मधे कोणी मायबोलीकर एल ए मधे राहात असतील तर त्यांच्याकडे ऑलिम्पिक्स दरम्यान मला रहायला मिळेल का? 
पण आता मला सिरिअसली माहीत आहे की मला ऑलिम्पिक्सची तिकीटे नक्की मिळणार आहेत. म्हणुन परत एकदा इथे जाहीर रित्या विचारतो की कोणी एल ए मायबोलिकर आम्हा तिघांना त्यांच्याकडे रहायला परवानगी देतील का? परवानगी देत असाल तर संपर्क देउ शकतो व त्यासाठी मी तुमचा कायमचा आभारी व ऋणी राहीन!
इथे विचारायचे कारण असे की मी होटेल व एअर बी एन बी साठी मी प्रयत्न करणारच आहे पण ऑलिंपिक्स सारख्या इव्हेंट वेळी त्या दोन्ही गोष्टी शक्य होतील की नाही याची गॅरंटी नाही! म्हणुन इथे जाहीर आवाहन!
पराग.. तु तिकिटांसाठी रजिस्टर केले होतेस का? मी स्वयंसेवक होण्यासाठीही रजिस्टर केले आहे. त्यात निवड होणार की नाही याचे उत्तर एल ए ऑलिम्पिक्स कमीटीकडुन अजुन यायचे आहे.
पराग.. तु तिकिटांसाठी रजिस्टर
पराग.. तु तिकिटांसाठी रजिस्टर केले होतेस का? ! >>>>>> येस !!!!! मला पण आत्ताच इमेल आली आहे.
आता वेळापत्रकाचा अभ्यास करायचा आहे
मी स्वयंसेवक होण्यासाठीही रजिस्टर केले आहे >>>> अरे स्वयंसेवक रजिस्ट्रेशन ओपन झालं का ? मी बघितलं तेव्हा सुरू झालं नव्हतं.
आयला.. पराग! एकत्र एंजॉय करु!
आयला.. पराग! एकत्र एंजॉय करु! मस्तच! मी वेळापत्रकाचा अभ्यास आधीच केला आहे! गेल्या शनिवारच्या त्यांच्या इ मेलमधे वेळापत्रक होते.
स्वयंसेवकासाठी रजिस्ट्रेशन तिकिटांसाठीच्या रजिस्ट्रेशन वेळीच होते. ते आधी एल ए मधले लोकल स्वयंसेवक निवडणार आहेत. मग बाहेरच्यांची निवड करणार आहेत. त्यांना इ मेल करुन विचार की ते अजुन अॅप्लिकेशन्स घेत आहेत का?
मी मेन ऑलिम्पिक्स स्टेडिअम मधला एक इव्हेंट( जास्तीत जास्त फायनल्स इव्हेंट्स असलेला) , एक स्विमिंग इव्हेंट, एक जिमनॅस्टिक इव्हेंट व एक अजुन.. जो अजुन ठरवला नाही.. अश्या ४ इव्हेंट्सना जाणार आहे. क्रिकेट पण बघणार आहे पण त्यासाठी जास्त तिकिटे असल्यामुळे आयत्या वेळेला त्याची तिकीटे घेइन.
मुकुंद, एल ए मध्ये स्वागत आहे
मुकुंद, एल ए मध्ये स्वागत आहे. तुम्ही आमच्या घरी राहू शकता. डाउनटाऊनपासून थोडं साउथला आहे पण जमवू.
अम्ही देखील Badminton Women's Final, Hockey Women's Bronze Medal, Table Tennis Mixed Semifinal, Volleyball Women's Semifinal, Swimming Mixed Preliminary बघायला जाणार आहोत. लोकल असल्याने अम्हला पहिला मान मिळाला गेल्या आठवड्यात.
समीर, तुमचे आभार कसे मानु?
समीर, तुमचे आभार कसे मानु? तुमच्या मनाच्या मोठेपणाला मनापासुन सलाम! माझे इ मेल muban12321@gmail.com आहे. प्लिज इ मेल मी.. मग मी माझा फोन नंबर देइन. संपर्कात राहु!
अरे वा! तुमची तिकिटे काढुन झाली वाटत! जस्ट क्युरिअस.. किंमती वाजवी आहेत का आणी तुम्हाला हवे ते इव्हेंट्स सहज उपलब्ध होते व मिळाले का?
समीर, आत्ताच गुगल करुन बघीतले
समीर, आत्ताच गुगल करुन बघीतले. त्यात अस समजल की ऑलरेडी स्विमिंग च्या सगळ्या फायनल्स इव्हेन्ट सेशनची तिकिटे संपलेली आहेत! तीच गोष्ट अॅथलेटिक इव्हेंट्सची व जिमनॅस्टिक्सची!
तिकिटांच्या प्राइसेस सुद्धा १००० डॉलर प्रती तिकीट आहेत म्हणे! नॉट सो पॉप्युलर खेळांची तिकीटे सुद्धा ३००- ४०० डॉलर्स प्रति तिकिट आहेत म्हणे! वर २५ टक्के सरचार्जही लावतात अस कळल! म्हणजे ४०० डॉलर्स मिनिमम तिकीटाची किंमत ( तेही नॉट सो पॉप्युलर खेळाची) व १०० डॉलर्स सर्व्हिस सरचार्ज! म्हणजे ५०० डॉलर्सचे एक तिकीट! १२ तिकिटांचे कमीत कमी ६००० डॉलर्स! महा भयंकर ग्रिडी प्रकरण दिसतय हे!
समीर, खर आहे का मी जे काय तिकिटांबद्दल वाचतोय इंटरनेटवर ते?
मी काय एक एक मनात मांडे खात
मी काय एक एक मनात मांडे खात होतो.. मेन ऑलिम्पिक्स स्टेडियम मधला एक जास्तीत जास्त फायनल्स असलेला एक सेशन काय… स्विमिंग फयनल्स असलेला एक इव्हेंट काय.. जिमनॅस्टिक्सचा एक इव्हेंट काय…
कसच काय आणी कसल काय…
मी टीव्हीवर फुकट बघणार.
मी टीव्हीवर फुकट बघणार. टेक्नॉलॉजी प्रगत झाले आता. पूर्वीच्या काळासारखं स्टेडियममध्ये जायची गरज नाही
https://www.maayboli.com/node
बोकलत, तुमचे बरोबर आहे. पण प्रत्यक्ष ऑलिम्पिक्स बघण्याचा आनंद मी स्वतः १९९६ च्या अॅटलांटा ऑलिम्पिक्सला जाउन अनुभवलेला आहे. टिव्हीवर बघण्याची व त्याची तुलना होउ शकत नाही. त्या अनुभवाबद्दल वाचायचे असेल तर इथे टिचकी मारा…
https://www.maayboli.com/node/75848
अर्थात २०२८ मधे हजारो डॉलर्स खर्च करुन तसा अनुभव परत घेणे वर्थ आहे की नाही ही विचार करायला लावणारी बाब आहे हे मात्र खर! पण मनातल्या सगळ्या इव्हेंट्सना जरी जाता नाही आले तरी एखाद दुसर्या नाममात्र इव्हेंट्सना जाउन बाकीचा वेळ तिथले व्हेन्युज च्या आजुबाजुचे ऑलिम्पिक्स अॅटमॉस्फिअर सोक अप करण्यात सुद्धा मजा असते असा माझा अॅटलांटांचा पुर्वानुभव आहे. असो.
त्यात अस समजल की ऑलरेडी
त्यात अस समजल की ऑलरेडी स्विमिंग च्या सगळ्या फायनल्स इव्हेन्ट सेशनची तिकिटे संपलेली आहेत! तीच गोष्ट अॅथलेटिक इव्हेंट्सची व जिमनॅस्टिक्सची! Sad>>> हे फक्त लोकल ड्रॉप साठी आहे. तुमच्या ड्रॉपसाठि नविन लॉट आहे. त्यात अगदि २८$ पासून तिकिटे असतिल. तुमचा टाईमस्लॉट उशिरा असेल तर कदचित अगदि सर्वात स्वस्त संपलेली असतिल. पण १००/२००/३०० चि आहेत. थोडं शोधावं लागतं. अर्थात सर्च पर्याय व्यवस्थित आहेत.
समीर, आम्ही पण रूमाल टाकू का
समीर, आम्ही पण रूमाल टाकू का रहाण्यासाठी ?
अर्थात सर्च पर्याय व्यवस्थित आहेत. >>>> ते गेल्यावर्षीचीच सिस्टीम वापरत आहेत बहुतेक. हो, ती चांगली आहे. त्यांचा रि-सेल प्लॅटफॉर्मपण मस्त आहे एकदम. तो नंतर उघडे अर्थात.
मुकूंद, केलं सबमिट व्हॉलेंटीयर नॉमिनेशन.
पराग,
पराग,
कुठला उचलायचा ते २ वर्षानी पाहू.
हो टाक की
एक जनरल निरिक्षण - बर्याच जणांची पहिली पसंती पुरुष सामन्यांसाठी दिसली. त्यामुळे महिला सामने (अगदि मेडल मॅच देखिल ) कमी किमतीत तिकिटे दिसत होती. (हे अर्थात जिमनास्टीक्स सोडून)
ओपनिंग आणि क्लोजिंग सेरेमनी
ओपनिंग आणि क्लोजिंग सेरेमनी ची तिकिटे होती का त्या लॉट मध्ये? का ती वेगळी घ्यावी लागणार आहेत?
भरपूर अभ्यास करावा लागेल असे दिसते आहे तिकिटे काढण्याकरता पण.
माझ्या मित्राला world कप ची तिकिटे काढायची होती. खूप महाग आहेत म्हणाला आणि काढली नाहीत. आता ही मिळतात का ते पाहूया
समीर, माहीतीबद्दल धन्यवाद!
समीर, माहीतीबद्दल धन्यवाद! तुमची पोस्ट दिलासा दिणारी आहे पण आंतरजालावर एक नजर टाकली किंवा नॅशनल न्युजवर सुद्धा सगळीकडे “ ब्लिक“ चित्र रंगवतायत तिकिट अव्हैलेबिलिटी , तिकिट “ स्टिकर“ शॉक व पर तिकीट २५ टक्के “ प्रॉसेसींग फिज “ बद्दल!
हे १ उदाहरण म्हणुन.. पण १००% बातम्या याच सुराच्या आहेत!
https://sports.yahoo.com/articles/excitement-over-affordable-l-olympics-...
बाय द वे.. इथे कोणी जाणकार
बाय द वे.. इथे कोणी जाणकार सांगु शकतील का निरज चोप्रा शिवाय अजुन कोण भारतिय संभाव्य पदक विजेते आहेत व कोणत्या खेळांमधे? त्यांचे सेशन मिळवायचा प्रयत्न करीन म्हणतो. आपल्या मेन्स हॉकी टीमला गोल्ड मेडलची शक्यता आहे का?
पण आंतरजालावर एक नजर टाकली
पण आंतरजालावर एक नजर टाकली किंवा नॅशनल न्युजवर सुद्धा सगळीकडे “ ब्लिक“ चित्र रंगवतायत >> बातम्या बहुतांशी अश्याच असतील कारण ज्याना स्वस्त तिकिटे मिळाली आहेत, ते येउन सांगणार नाहित. एक महत्वाचं. फक्त मेडल राउंड्वर फोकस करू नका. प्रिलिमनरी राउंड्ची तिकिटे मिळतिल स्वस्त.
मी मेन ऑलिम्पिक्स स्टेडिअम मधला एक इव्हेंट( जास्तीत जास्त फायनल्स इव्हेंट्स असलेला) , एक स्विमिंग इव्हेंट, एक जिमनॅस्टिक इव्हेंट>> यातलं स्विमींग sofi stadium मध्ये होणार आहे. गेल्या वर्षी जसं lucas oil stadium (Indianapolis) ला त्यांनी नॅशनल गेम्स केले होते.
जिमनॅस्टिक - LA Convention Centerला होणा आहे.
मेन ऑलिम्पिक्स स्टेडिअम - हे LA Coliseumला असेल जिथे फक्त Athletics (track and field) असतील.
पराग, बहुतेक सगळी तिकिटे
पराग, बहुतेक सगळी तिकिटे संपली आहेत. माझी तिकिट खिडकी उद्या सकाळी १० वाजताउघडणार आहे. मी बहुतेक सोफाय स्टेडिअमच्या बाहेर चणे फुटाणे खायला जाइन अस वाटतय बहुतेक!