आमच्या घरचा बाप्पा

Submitted by संयोजक on 7 September, 2026 - 11:58

Screenshot_20250827_063028_Gallery.jpg

आमच्या घरचा बाप्पा

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥

नमस्कार मायबोलीकर.
ज्या क्षणाची आपण सर्व आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण आला आहे.
आपल्या लाडक्या गणरायाचे ढोल-ताशा, टाळ-मृदुंगाच्या आवाजात दमदार आगमन झालेले आहे.
आपल्या मायबोलीवरदेखील गणपतीबाप्पाची प्रतिष्ठापना झालेली आहे.
तुम्हां सगळ्यांकडे सुद्धा बाप्पा थाटात विराजमान झाले असतील ना?
मग पाठवा लगेच तुमच्या घरातील बाप्पांचे, मखराचे, सुंदर सजावटीचे फोटो.
तसेच तुमची यंदाची सजावट काही वेगळी असल्यास त्याबद्दल नक्की लिहा.

मग वाट कसली बघताय, घ्या मोबाईल, करा क्लिक आणि द्या इथे फोटो.

गणपती बाप्पा मोरया ! मंगलमूर्ती मोरया!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्व मूर्ती छान.
पहिल्या मूर्तीतले गणपती बाप्पा छान आरामात बसले आहेत

ती मागे साडी आहे का?>>>>>> होय.

भ्रमर, मूर्तीच्या चेहऱ्यावरील भाव खूप सुंदर आहेत.

सगळ्यांचे गणपती छान आहेत.
हा आमच्या घरचा म्हणजे कोकणातला. सगळी सजावट घरीच केली आहे मुलानी.

IMG-20260914-WA0011_2.jpg

गणपतीच्या दुसऱ्या दिवसाला आमच्या भागात उंदीरकी म्हणतात. शेतातील भाताच्या पिकाचं नुकसान करणाऱ्या उंदराला आज खुश करायचं. गणपतीच वहान असणाऱ्या उंदराच्या तोंडात आज शेतातील भाताचं केसर द्यायची प्रथा आहे आमच्या भागत. आज आपण हून तुला नवीन भाताचं केसर देतोय पण आमच्या भाताचं नुकसान करू नको अशी प्रार्थना करतात.
IMG-20260915-WA0003_0.jpg
उंदराला नवीन केसर दिलेलं फोटोत दिसत आहे. केसर म्हणजे भाताची लोंबी.

हा माझ्या मावशीकडचा - मालवण
ganpati1.jpg
हा आजोळचा. मालवणच.
ganpati2.jpgganpati3.jpg
हा ताईकडचा. वेंगुर्ला.
ganpati4.jpg

भरत, अ ति शय प्रसन्न वाटलं मूर्ती बघून.
उर्मिला, खूप मस्त आरास!

ममोताई, ही प्रथा आजच कळली.

(मला समहाऊ ममोताई आणि भरत यांच्या पोस्ट्स असतील तर आधीच समजतं बरेचदा... ओळखू यायला लागलंय Happy )

सगळे बाप्पा सुरेख, कोकणातल्या बाप्पाच वेगळेपण उठुन दिसतय..
ममो ,माटोळ आणी उन्दिरमामाला केसर दोन नविन प्रथा कळल्या.

IMG-20260914-WA0037.jpg
माझ्या मावशीच्या घरचा बाप्पा
त्यांनी दरवर्षी प्रमाणे ह्याही वर्षी मूर्ती घरी साकारली आहे
जगन्नाथ जींच्या स्वरूपात आहे ह्या वर्षी

प्राचीन अप्रतिम पेंटिंग. गुलाबाच्या माळाही सुंदर. जांभळ्या दिव्यांनी एकदम अ‍ॅम्बिअन्स आलेला आहे.
.
सुरेश्वरी आवडला.

काय सुन्दर गणू आणि डेकोरेशन्स आहेत सगळ्यांचे.
गणरायाचं रुप प्रत्येकाकडे वेगळं पण प्रत्येक रुप किती सुंदर दिसतं.
आमचे बाप्पा आणि गौराई -

38b7b416-bea7-44c7-9d70-2bdc62722e7f.jpeg

माझ्या साबांना उजव्या सोंडेचा गणपती मिळाला होता घराजवळ. स्वयंभु आहे हा. माझ्या घरी त्याचीच स्थापना करतात. मी गणपती कोरलेली सुपारी आणते आणि त्याची प्रतिष्टापना करुन त्याचेच विसर्जन करते. हा माझ्या घराचा गणपती -

IMG_6589.jpeg

Pages