१. शृंगार
२. वीर
३. करुण
४. हास्य
५. रौद्र
६. भयानक
७. बीभत्स
८. अद्भुत
९. शांत
यमक, अनुप्रास, उपमा, उत्प्रेक्षा, श्लेष, रूपक, व्यतिरेक , अनन्वय, अपन्हुती......
नमस्कार मायबोलीकर मंडळी!
तुम्ही म्हणत असाल , शीर्षकात तर शशक लिहिलंय. आणि व्याकरणाचा, त्यातही सौंदर्यशास्त्राचा तास का वाटतोय?
तर हो आणि नाहीही.
यंदा तुम्हांला शंभर शब्दांची अशी कथा लिहायची आहे ; जी वाचून नवरसांपैकी कोणत्याही एका रसाची अनुभूती येईल आणि या कथेत एका अलंकाराचा ठळक वापर असेल.
नियम
१. प्रवेशिका पाठवण्याकरता 'मायबोली गणेशोत्सव २०२६' या ग्रूपचे सदस्य असणे आवश्यक आहे. हा ग्रूप सदस्यनोंदणीकरता १४ सप्टेंबर रोजी खुला करण्यात येईल.
२. लेखनाचा धागा हा पर्याय निवडून लेखन करा.
३. प्रवेशिकेचे शीर्षक पुढीलप्रमाणे द्यावे - शशक स्पर्धा - तुमचे नाव - कथेचे शीर्षक
४. एक सदस्य कितीही प्रवेशिका देऊ शकतो.
५. प्रत्येक प्रवेशिकेला "मायबोली गणेशोत्सव २०२६" अशी शब्दखूण द्यावी.
६. प्रवेशिका पाठवण्यासाठी अंतिम मुदत - शुक्रवार सप्टेंबर २५, २०२६ अमेरिकेतील पॅसिफिक टाईम झोन (PST) रात्री १२:०० पर्यंत.
७. स्पर्धेचे विजेते मतदानाने ठरवले जातील.
चला तर मग. घ्या एक रसरशीत कथा लिहायला आणि करा तिला अलंकृत.
गणपती बाप्पा मोरया!
अवघड आहे. जमेलसे वाटत नाही.
अवघड आहे. जमेलसे वाटत नाही. तेथे पाहीजे जातीचे.
जवळ जवळ तयार आहे.
जवळ जवळ तयार आहे.
<<<< आणि या कथेत एका
<<<< आणि या कथेत एका अलंकाराचा ठळक वापर असेल.
>>>
अरे देवा हे काय असते.?. कोणी मराठीचे जाणकार हे समजावेल का?
नक्की. हे मराठीतील शब्दालंकार
नक्की. हे मराठीतील शब्दालंकार व अर्थालंकार सोप्या भाषेत, प्रत्येकी एका उदाहरणासह पाहूया.
अलंकार सोपा अर्थ उदाहरण स्पष्टीकरण
१. यमक कवितेच्या चरणांच्या शेवटी समान शब्द/ध्वनी पुन्हा येणे, पण अर्थ वेगळा असणे “मन माझे हरवले, तुझ्यात ते रमले.” हरवले–रमले या शब्दांच्या शेवटी समान ध्वनी आहे.
२. अनुप्रास एकाच अक्षराची किंवा वर्णाची वारंवार पुनरावृत्ती होणे “चंचल चिमणी चिवचिव करते.” ‘च’ या वर्णाची वारंवार पुनरावृत्ती झाली आहे.
३. उपमा एका वस्तूची दुसऱ्या वस्तूशी सारखा, प्रमाणे, जसा इत्यादी शब्दांनी तुलना करणे “तिचे मुख चंद्रासारखे सुंदर आहे.” तिच्या मुखाची चंद्राशी तुलना केली आहे.
४. उत्प्रेक्षा एखादी गोष्ट प्रत्यक्ष नसतानाही जणू काही तशीच आहे अशी कल्पना करणे “आकाशातील चंद्र जणू आकाशाचा दीपच आहे.” चंद्राला आकाशातील दीप असल्याची कल्पना केली आहे.
५. श्लेष एका शब्दातून दोन किंवा अधिक अर्थ व्यक्त होणे “हरि आला.” हरि म्हणजे श्रीविष्णू तसेच सिंह असाही अर्थ होऊ शकतो.
६. रूपक उपमेय आणि उपमान यांच्यात थेट एकरूपता दाखवणे “तिचे मुख चंद्र आहे.” मुख चंद्रासारखे आहे असे न म्हणता थेट मुख म्हणजे चंद्र असे म्हटले आहे.
७. व्यतिरेक उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे दाखवणे “तिच्या मुखापुढे चंद्रही फिका पडतो.” तिचे मुख चंद्रापेक्षा सुंदर/श्रेष्ठ असल्याचे दाखवले आहे.
८. अनन्वय एखाद्या वस्तूची तुलना त्याच वस्तूशीच करणे “आई म्हणजे आईच!” आईची तुलना दुसऱ्या कोणत्याही वस्तूशी न करता आईशीच केली आहे.
९. अपन्हुती एखादी गोष्ट आहे हे नाकारून ती दुसरीच गोष्ट आहे असे सांगणे “हे तिचे मुख नाही, हा तर चंद्रच आहे.” प्रत्यक्षात मुख आहे; पण ते नाकारून चंद्र असल्याचे सांगितले आहे.
पटकन लक्षात ठेवण्यासाठी
यमक → शेवटचा ध्वनी/शब्द पुन्हा
अनुप्रास → एकच वर्ण पुन्हा
उपमा → सारखा / प्रमाणे / जसा
उत्प्रेक्षा → जणू / जणू काही
श्लेष → एक शब्द, अनेक अर्थ
रूपक → थेट एकरूपता
व्यतिरेक → उपमेय उपमानापेक्षा श्रेष्ठ
अनन्वय → तुलना स्वतःशीच
अपन्हुती → नकार देऊन दुसरेच असल्याचे सांगणे
वा! ऋ ss न्मेष, छान स्पष्ट
वा! ऋन्मेssष, छान स्पष्ट करुन सांगितलेस.
धन्यवाद, चॅट जीपीटी मदत घेतली
धन्यवाद, चॅट जीपीटी मदत घेतली.
पण वाचताना स्वतःलाच वाटले की अरे हे तर एकूण एक आपल्याला आधीच माहित होते. फक्त यातली काही नावे विस्मरणात गेली होती
यानिमित्ताने माझ्यासारख्यांची व्याकरण उजळणी होणारी स्पर्धा ठेवल्याबद्दल संयोजकांचे कौतुक.
ती उजळणी सर्वांचीच व्हावी या हेतूने इथेही कॉपी पेस्ट केले. अन्यथा उगाच त्या मीम धाग्यावर शशक स्पर्धेचे नियम काहीतरी क्लिष्ट आहेत असे मीम पडले होते.
रस आणि अलंकार दोन्ही एकाच
रस आणि अलंकार दोन्ही एकाच कथेत हवे आहेत ना? कथा पोस्ट करताना दोन्ही लिहायला हवे. सगळे फक्त रस लिहीत आहेत.
हो, शीर्षकात रस आणि अलंकार
हो, शीर्षकात रस आणि अलंकार दोन्ही लिहायला हवेत.
बहुधा साध्यासरळ मायबोलीकरांना अलंकारात रस नसेल
स्पर्धा आहे म्हणून विचारून
स्पर्धा आहे म्हणून विचारून घेतलेलं बरं, कथा बाद नको व्हायला :p
अय्या! खरच कित्ती काळजी आहे
यमकाच्या ओळी दिसतील २-४. अवघड आहे हे शिवधनुष्य पेलणं.
छान आहे उपक्रम
छान आहे उपक्रम