मभागौदि २०२५ शशक- नियत - छल्ला
पुरे पुरे, सुभद्रे. किती वाढशील मला? अर्जुनाने हात आडवा धरत म्हटले आणि क्षणार्धात त्याला त्याच्या चुकीची जाणीव झाली.
अपूप वाढणारे द्रौपदीचे हात किंचीत काळ थबकले पण ती बोलली काहीच नाही.
इतकी आवडते ती त्याला? इतकी? मनात सदैव तिचेच नाव रेंगाळत राहण्याइतकी? या अर्जुनावर मी उत्कट प्रेम केले. सगळे आयुष्य पणाला लावले. पण जिंकली कोण? तर सुभद्राच!
तिच्या मनात असूयेच्या ठिणग्या उडत होत्या. डोळे भरुन येत होते.