लोकशाही, निवडणुका, राजकारण अन... आपण!
भारत माझा देश आहे, हे वाक्य आपण शाळेच्या पहिल्या दिवसापासुन म्हणत असतो! पण जसे जसे शाळा संपुण कॉलेज मध्ये जातो अन नंतर रोजच्या जीवणात पाउल ठेवतो, तस तसे आपण हे वाक्य विसरत जातो. (कदाचित कॉलेज च्या ५-७ वर्षाच्या काळात आपण रोजची प्रतिज्ञा म्हणत नाही अन म्हणुन!) शाळेत असताना नागरिक शास्त्राच्या पुस्तकात आपण भारत हे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही प्रजासत्ताक आहे असे वाचत असतो, परंतु शाळा संपुण महाविद्यालयात गेल्या नंतर अन मग नोकरी करु लागल्यावर मात्र हे सर्व शब्द आपण विसरुण जातो!

