शुभारंभ !!!

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

ऑर्कुट कम्युनिटी: श्री विट्ठलराव लंघे पाटील

http://www.orkut.com/Main#Community.aspx?cmm=93556659

महाराष्ट्राच्या स्थापणेला ५० वर्षे पुर्ण होत असताना, नेवासा तालुक्यातील जनतेला नेवासा हा स्वतंत्र मतदार संघ मिळणे, ही भारतीय लोकशाहीची नेवासा तालुक्यातील जनतेला सुंदर भेट च आहे. अन, नेवासा तालुक्यातील जनतेचे लाडके नेते, माननीय श्री विट्ठ्लराव लंघे-पाटील यांच्या रुपाने नेवासा मतदार संघाला प्रथम आमदार मिळणे हा सुवर्ण कांचण योग च म्हणावा लागेल!

विसाव्या शतकाच्या मध्यानीला १९५० साली, प्रवरा नदीच्या किनार्‍यावर एका भुताच्या माळावर एक विट्ठल मांड ठोकुण उभा राहिला, अन कामाच्या झपाट्याने, त्याने आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना उभा केला. तो विट्ठल म्हंजे, आदरणीय पद्मश्री विट्ठलराव विखे पाटील. आज एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर, प्रवरेच्या अश्याच एका किनार्‍यावर, नेवासा नगरी मध्ये एक विट्ठल मांड ठोकुण उभा आहे. अन जनांचा प्रवाह चालला....या उक्ती प्रमाणे, जनतेच्या उस्फुर्त प्रतीसादाने/प्रेमाने हा विट्ठल एक नवा इतिहास रचण्यास सिद्ध झाला आहे. हा नवयुवक म्हंजेच नेवासा तालुक्यातील जनतेचे लाडके नेते, माननीय श्री विट्ठलराव वकीलअण्णा लंघे-पाटील उर्फ भाऊ :)!!!

महाराष्ट्रातील वारकरी/भागवत संप्रदायाच्या मनात श्रद्धेय असणार्‍या ग्रंथश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वरीच्या अठरा अध्यायाच्या पुढे एक पाउल टाकत हा विट्ठल एकोणीसावा अध्याय रचण्याचे स्वप्न पाहतो आहे!

वर्षानुवर्षे उपेक्षित राहिलेल्या या तालुक्यातील प्रस्थापित अन संकुचित नेत्रुत्वा च्या विरुद्ध शंख फुंकुन द्वंद करण्यास हा युवक सज्ज झाला आहे....!!

कौरव शंभर होते, अन पांडव पाच च होते. पण विजय नेहमी सत्याचा होतो. अन ही विजयाची घडी आता जवळ आली आहे...!!

भारतीय लोकशाहीच्या दैदिप्यमान इतिहासामध्ये लवकर च एक सुवर्ण पान लिहिले जाईल, जेंव्हा माननीय श्री विट्ठलराव लंघे पाटील नेवासा तालुक्याचे प्रथम आमदार म्हणुन विधानसभेत प्रवेश करते होतील...!!

मित्रहो, या अन सामील व्हा!!! नेवासा तालुक्याच्या विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी माननीय श्री विट्ठलराव लंघे पाटील ह्यांना येत्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकी मध्ये प्रचंड बहुमताने विजयी करु!!! Happy

प्रकार: 

छान!!!!!!!!

कौरव शंभर होते, अन पांडव पाच च होते. पण विजय नेहमी सत्याचा होतो. अन ही विजयाची घडी आता जवळ आली आहे...!! खरच मला ही असेच वाटते विजय सत्याचाच होयला पाहिजे.:दिवा: