आरक्षण झालेच पाहिजे!

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

विप्रोचे अध्यक्ष अझीम प्रेमजी यांचे 'आरक्षण' या विषयावरील मत
(मराठीत स्वैर भाषांतर)

मला वाटते, सर्व क्षेत्रांमध्ये 'आरक्षण' ही संकल्पना राबविलीच गेली पाहिजे. यासाठी आपले पंतप्रधान आणि सर्व राजकारणी, नेते यांना मी अनुमोदन देत आहे.

आपल्या सर्वांचा आवडता विषय 'क्रिकेट' यापासूनच याची सुरूवात करू या. आपल्या राष्ट्रीय संघामध्ये १०% जागा मुस्लिम, ३०% जागा ओबीसी, एससी / एसटी इ. साठी राखीव झाल्या पाहिजेत.

अनुसुचित जातीजमातींच्या खेळाडूंसाठी सीमारेषा कमी केली गेली पाहिजे. शिवाय या खेळाडूंनी चौकार मारल्यास त्याच्या ६ धावा, तसेच षटकार मारल्यास ८ धावा मोजल्या गेल्या पाहिजेत. अशा प्रकारे तो साठ धावांपर्यंत पोचला, की त्याने शतक केल्याचे घोषित केले जावे.

आयसीसीवर दबाव टाकून सर्व नियम सुधारून घ्यायला हवेत. जेणेकरून ओबीसी खेळाडूंना शोएब अख्तरसारख्या धोकादायक गोलंदाजांचा सामना करावा लागू नये. इतर गोलंदाजांनीही ८० किमी प्रतितास या वेगाच्या वर चेंडू फेकल्यास तो चेंडू 'नो बॉल' किंवा अशाच काहीतरी नियमांतर्गत बेकायदेशीर ठरवावा.

'ऑलिंपिक्स' मध्येही आरक्षण आवश्यकच आहे. १०० मीटर्स च्या शर्यतीत ८० मीटर्स पुर्ण केलेल्या ओबीसी खेळाडुला सुवर्णपदक दिले जावे. असेच आणखी अनेक नियम आपण ऑलिंपिक्समध्ये प्रगती करण्यासाठी जरूरीचे आहेत.

सरकारी नोकर्‍यांमध्ये तर हे व्हावेच व्हावे. अतिशय कमी मार्क्सचे निकष पुरे करून पायलट झालेल्या मागासवर्गीय उमेदवारास आपले मंत्री, राजकारणी, नेते इ. मोठे लोक नेहेमी प्रवास करीत असलेल्या विमानाचा ताबा द्यावा. ही खरी देशसेवाच ठरेल.

असेच कमीत कमीचे निकष पार करून डॉक्टर्स झालेल्या मागासवर्गीय उमेदवारांनाच आपल्या नेत्यांच्या शस्त्रक्रिया आदि करण्याची परवानगी द्यावी. देशाला वाचवण्याचा यापेक्षा सुरेख मार्ग आणखी दुसरा कोणता असेल?

तर, हे व्हावेच व्हावे अशी माझी जोरदार मागणी आहे.

***

हे शब्दशः प्रेमजी यांनी लिहिले / बोलले असेल की नाही, हे मला माहिती नाही. हे मला मेल मधून आलेले एक फॉरवर्ड आहे. ते इंग्रजीत होते, अन त्याचे हे स्वैर मराठी भाषांतर.

प्रकार: 

हे असं काही आपल्या इथे का होत नाही?

मनस्मी, हे शब्दशः प्रेमजी यांनी लिहिले असेल की नाही हे मला माहिती नाही. हे मला मेल मधून आलेले एक फॉरवर्ड आहे. ते इंग्रजीत होते, अन त्याचे हे स्वैर मराठी भाषांतर.

Lol Lol

शेवट्चे दोन पॅरा जबरदस्त आवडले

मस्तच साजिरा! Lol
अनुवाद छान जमला आहे. अनुवादित आहे असं कुठेही वाटत नाही.
-----------------------------------------------------------
विठुचा गजर, हरिनामाचा झेंडा रोविला....
-----------------------------------------------------------

साजिरा, मला पण मेल ने आलं होतं हे Happy

<<<सरकारी नोकर्‍यांमध्ये तर हे व्हावेच व्हावे. अतिशय कमी मार्क्सचे निकष पुरे करून पायलट झालेल्या मागासवर्गीय उमेदवारास आपले मंत्री, राजकारणी, नेते इ. मोठे लोक नेहेमी प्रवास करीत असलेल्या विमानाचा ताबा द्यावा. ही खरी देशसेवाच ठरेल.

असेच कमीत कमीचे निकष पार करून डॉक्टर्स झालेल्या मागासवर्गीय उमेदवारांनाच आपल्या नेत्यांच्या शस्त्रक्रिया आदि करण्याची परवानगी द्यावी. देशाला वाचवण्याचा यापेक्षा सुरेख मार्ग आणखी दुसरा कोणता असेल?>>>>

हे अस्सच व्हायला हवं.

***************
युद्धकर्ता श्रीरामः मम | समर्थ दत्तगुरु मुलाधारः ||
साचार वानरसैनिकोSहम | रावण वधः निश्चितः ||
इति अनिरुद्ध महावाक्यम |

हसण्याच्या कोट्याला अजुन आरक्षणाचे तोरण लागत नाही तोपर्यंत हसुन घ्याव :), :P, :D, :G, Rofl

सरकारी नोकर्‍यांमध्ये तर हे व्हावेच व्हावे. अतिशय कमी मार्क्सचे निकष पुरे करून पायलट झालेल्या मागासवर्गीय उमेदवारास आपले मंत्री, राजकारणी, नेते इ. मोठे लोक नेहेमी प्रवास करीत असलेल्या विमानाचा ताबा द्यावा. ही खरी देशसेवाच ठरेल.

असेच कमीत कमीचे निकष पार करून डॉक्टर्स झालेल्या मागासवर्गीय उमेदवारांनाच आपल्या नेत्यांच्या शस्त्रक्रिया आदि करण्याची परवानगी द्यावी. देशाला वाचवण्याचा यापेक्षा सुरेख मार्ग आणखी दुसरा कोणता असेल?>>>>

आयला हे दोन तर एकदम सहीच.. छान....

----------------------------------------------------------------------
आम्ही साहेब धामावरी सुखे मरीतो...

प्रेमजी ना कोल्हापुरकरान्चे "रेसच्या घोड्याचे" उदाहरण माहीती नसावे बहुधा! Happy
नाहीतर ८० मीटर पूर्ण करण्याची अन्न्याई अट टाकण्या ऐवजी पन्नासमीटरवरून सुरुवात करण्याचि अटच घातली अस्ती! नाही का? Wink
सीमारेषा कमी करण्याऐवजी ब्याटिन्गचे ठिकाणच सीमारेषेजवळ (शक्य असल्यास रेषेबाहेरच) नेऊन ठेवले अस्ते Lol
अन धावा कमी/जास्त मोजण्याचा घोळ करण्या ऐवजी पहिल्या धावेची सुरुवातच मुळी एक्कावन्न पासुन मोजायची असे ठरवले अस्ते Biggrin

हसण्याच्या कोट्याला अजुन आरक्षणाचे तोरण लागत नाही तोपर्यंत हसुन घ्याव>>>> हास हास फक्त आरक्षित कोट्यामधल्या कुणी विनोद सांगीतला तर जास्त हास.

साजिरा एकदम झकास

<<<सरकारी नोकर्‍यांमध्ये तर हे व्हावेच व्हावे. अतिशय कमी मार्क्सचे निकष पुरे करून पायलट झालेल्या मागासवर्गीय उमेदवारास आपले मंत्री, राजकारणी, नेते इ. मोठे लोक नेहेमी प्रवास करीत असलेल्या विमानाचा ताबा द्यावा. ही खरी देशसेवाच ठरेल.

असेच कमीत कमीचे निकष पार करून डॉक्टर्स झालेल्या मागासवर्गीय उमेदवारांनाच आपल्या नेत्यांच्या शस्त्रक्रिया आदि करण्याची परवानगी द्यावी. देशाला वाचवण्याचा यापेक्षा सुरेख मार्ग आणखी दुसरा कोणता असेल?>>>>

याला तर हजारो मोदक.. हीच खरी देशसेवा ठरेल रे..

साजीर्‍या सही रे. Happy

अजून गिरणी कामगार आले नाहीयेत वाट्टं. Proud

@लिंबुटींबु..... Lol

सरकारी नोकर्‍यांमध्ये तर हे व्हावेच व्हावे. अतिशय कमी मार्क्सचे निकष पुरे करून पायलट झालेल्या मागासवर्गीय उमेदवारास आपले मंत्री, राजकारणी, नेते इ. मोठे लोक नेहेमी प्रवास करीत असलेल्या विमानाचा ताबा द्यावा. ही खरी देशसेवाच ठरेल.

असेच कमीत कमीचे निकष पार करून डॉक्टर्स झालेल्या मागासवर्गीय उमेदवारांनाच आपल्या नेत्यांच्या शस्त्रक्रिया आदि करण्याची परवानगी द्यावी. देशाला वाचवण्याचा यापेक्षा सुरेख मार्ग आणखी दुसरा कोणता असेल?

बाकी काही होवो न होवो, या दोन गोष्टी तर नक्किच व्हाव्यात.... Happy
----------------------------------------
जळुन तृप्त होतो गुलमोहर,
तरी पाउसाची भेट नाही.
गुलमोहराचं जळणं,
कधीच का पावसाला कळत नाही ?

<<हे असं काही आपल्या इथे का होत नाही?>>

भारतीय राज्यघटनेत भाषणस्वातंत्र्य आहे, निदान १९७० पर्यंत तरी होते. तत्पूर्वी एकट्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना ते नाकारले होते. बिचार्‍यांन्ना मरेपर्यंत ते स्वातंत्र्य मिळाले नाही. त्याचवेळी मुस्लिमांना मात्र जिहाद, हिंदूद्वेष पसरवणारी भाषणे करण्याची संपूर्ण परवानगी होती, नि अजूनहि आहे.

वास्तविक, मंत्री, आमदार, नामदार, खासदार यांची सेवा करण्याची संधि मिळावी म्हणून अश्या उमेदवारांना नेहेमी पहिल्या दहा नंबरात आणावे. म्हणजे मंत्रि इ. लोकांना एकदम उत्कृष्ट लोक मिळतील. विशेषतः विमानचालक, कारड्रायव्हर्स, डॉक्टर्स, सुरक्षा दल इ. कामांसाठी. भाजप नी याला पाठिंबा दिल्यास, त्या लोकांना मुस्लिम अल्पसंख्यांक लोकांकडून सेवा उपलब्ध करून द्यावी!!

असे पत्र नि त्यावर एक हजार सह्या घेऊन ते कुणि स्वखर्चाने पेपरात पैसे देऊन छापून का आणत नाहीत? किती पैसे पडतात, टाईम्स, नि हिंदू, नि लोकसत्ता यांच्या पहिल्या पानावर पहिले अर्धे पान जाहिरात देण्याचे? साजिरा, तुम्हाला माहित असेल! मी पैशाची मदत करायला तयार आहे. फक्त पैसे कुठे पोचवायचे ते सांगा.
डॉलर्समधे चेक देईन, त्याचे रुपये करून घेण्याचे काम तुमचे.

अनुवाद मस्तच आहे. Proud
धनु.

झक्की तुम्ही एकवेळ पैसे पाठवाल हे खर मानल Wink (म्हणजे भा.पो. हो अस म्हणायचय मला :P), साजिरा किंवा आणि कुणी जाहिरातही छापुन आणली तरी "आपले" म्हणवणारे राजकारणी पण त्याचा त्यांच्याच फायद्यासाठी उपयोग करणार नाहीत ह्याची काय खात्री? (हलके घ्या दिवे घेऊ नका आता ह्यातुन कोणी Wink )

खरे आहे. माझे लिहीणे पूर्णपणे विचार न करता, (knee jerk reaction) केले होते. क्षमा असावी.

Happy Light 1

अहो झक्की क्षमा कसली मागताय. तुमच्या भा.पो. म्हंटलच आहे की मी. फक्त राजकारणी ही एक अ‍ॅडिशनल जात आहे त्यामुळे तिथले तथाकथित "आपले" ही त्यांचाच फायदा बघणारे निघाले तर आपलेच पैसे श्रम फुकट.

कुणा पत्रकारात धमक नाही का अर्जुनसिंगाला विचारण्याची की त्याचे डॉक्टर, पायलट, कार ड्रायव्हर्स, सुरक्षा दलाचे लोक आरक्षणातून आलेले आहेत का?? आरक्षणाचा घोष करणारे जे लोक आहेत, त्यांच्या सेवेत किती आरक्षणातून आलेले लोक आहेत? जे लोक परशुराम विद्यापीठाविरुद्ध तावातावाने भांडतात त्यांनी कधी याची चौकशी केली आहे का?

निदान माहिती तरी आहे का कुणाला? नि तशी काही बातमी कुणि छापेल का? छापली असल्यास कुठे? कधी?

नटनट्यांची लफडी शोधून काढून छापण्यापुरतेच पत्रकारांचे 'सत्यसंशोधन' नि शौर्य. नाहीतर 'संगीतका विश्वयुद्ध!' मधे भाग घेण्याचे.
बाकी फक्त 'फट्टू' असतो तर आमची लोकसंख्या एव्हढी वाढली असती का? असले मुद्दे मांडायचे!!
Happy Light 1

कुणा पत्रकारात धमक नाही का अर्जुनसिंगाला विचारण्याची
---- त्याने स्वत: ची कॅबीनेट मंत्री पदाची जागा रिकामी करुन लोकांच्या (त्याच्या चाहत्यांना) समोर एक चांगले तसेच अनुकरण करण्यासारखे उदाहरण ठेवायचे होते.

हसण्यासाठी हे सगळ ठीक आहे. पण मला नाही वाटत की अझीम प्रेमजीं सारखी जबाबदार व्यक्ती आरक्षणासारख्या (जे आवश्यक आहे पण त्याचे नीयम हे वेगळ्या नीकशांवर असावेत व त्यात राजकीय फायदा नसावा) मुद्यावर ईतक्या बेजबाबदापणे मत व्यक्त करतील.

एकंदरीत जे काय होते आहे, ते वर्णन केल्यापेक्षा फार वेगळे नाही. तेंव्हा ते खुद्द प्रेमजींनी लिहीलेले असो, नाहीतर कुणिही!

Pages