दहशतवाद - १९९४ ते डिसेंबर २००८ आकडेवारी

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago
Time to
read
<1’

दहशतवादामूळे भारताची केवढी मनुष्य हानी झाली ह्याची आकडेवारी देत आहे. ह्यात मालमत्तेला झालेले नूकसान गृहीत धरलेले नाही.

तक्ता १

India Fatalities, 2008

 
  Civilians Security Force Personnel Total
Jammu & Kashmir 64 87 151
Assam 219 16 235
Delhi 26 1 27
Gujarat 57 0 57
Haryana 0 0 0
Maharashtra 171 20 191
Karnataka 0 0 0
Manipur 125 13 138
Meghalaya 0 0 0
Mizoram 0 4 4
Nagaland 42 2 44
Rajasthan 80 0 80
Tripura 7 4 11
Left-wing Extremism 182 202 384
Uttar Pradesh 1 7 8
Total* 974 356 1330
* Data till December 1, 2008
* Does not have the full details of
26-11 and does not include terrorist deaths

*फक्त २००८ ह्या वर्षात १ डिसेंबर पर्यंत १३३० लोक मृत्यूमुखी पडले.

तक्ता २

Deaths from 1994 to 2007

  Civilians Security Force Personnel Total
1994 1696 417 2113
1995 1779 493 2272
1996 2084 615 2699
1997 1740 641 2381
1998 1819 526 2345
1999 1377 763 2140
2000 1803 788 2591
2001 1693 721 2414
2002 1174 623 1797
2003 1187 420 1607
2004 886 434 1320
2005 913 287 1200
2006 1104 388 1492
2007 1099 404 1503
Total* 20354 7520 27874

एक क्षण थांबा. विचार करा. आपल्याला हे परवडनारे आहे का? एक सामान्य नागरिक म्हणून मी काय कॄती करनार हाच विचार करनार का?

दोन्ही आकडेवार्‍या पाहील्या तर असे दिसून येईल की तिन सामान्य नागरिकांपाठीमागे एक सुरक्षा रक्षक ( सैन्य, पोलीस, किंवा इतर) शहिद झालाय. ह्या आकडेवारीतूनच आपण किती अकार्यक्षम आहोत हे दिसून येते. मुंबईमुळे हे फक्त प्रकाशझोतात आले इतकेच. आपण गेल्या दिवसांचा ( १९६५, १९७१) गर्व बाळगत किती दिवस बसनार आहोत देव जाने. ३०३ रायफली घेऊन ऐके ४७ वा ५६ ला जर मुकाबला करनार असू तर त्यांना आपल्याला मारण्याचा पुर्ण हक्क आहे.

हे किती दिवस चालवून घेणार? हा दहशतवाद तूम्ही समजताय तेवढा दुर नाही. उद्या ह्या मृतांच्या आकड्यात तूमचा ही नंबर लागू शकतो. वेळ आली आहे. जो कोणी ह्या दहशतवादाला खतपाणी घालतो त्याला चेपन्याची. मग ती एका विशिष्ट धर्माची वा संप्रदायाची माणसे असली तरी हरकत नाही.

इथे व्होट्स चे राजकारण करत बसलो तर लवकरच भारतात देखील हिंदू स्फोट, दलीत स्फोट, जैन स्फोट, ख्रिश्चन स्फोट होऊ शकतात नव्हे, झालेत.

दुर्दैवाने आपण भारतीय असेच समजत होतो की फक्त काश्मीर पुरता दहशतवाद त्रास देतोय. त्यावर काही हिंदू बोंब मारत आहेत एवढीच आपली दहशतवादाची ओळ्ख. वर मासल्या दाखल फक्त २००८ ची राज्य निहाय आकडेवारी दिली आहे. फक्त काश्मीर हा प्रश्न नाही तर "भारत" हा प्रश्न आहे.

अनेक ब्लॉग्स व काही लेखांमध्ये अहिंसेनी सामना करु हे वाचले. अहिंसेच्या दिवास्वनातून बाहेर यायला लोक का तयार नाहीत? "दहशतवादाचा मुकाबला फक्त शस्त्राने होऊ शकतो. गुलाबाचा फूलाने नाही." हे काही भारतीयांना कोण समजावून सांगेल हा प्रश्न मला पडलाय. आणि दहशतवादाचा खात्मा केला तर आपण काही हिंसक होणार नाही हे का कळत नाही. स्वरक्षन करने म्हणजे हिंसा का?

"१०० गुन्हेगार सुटले तरी चालेल पण एका निरपराध व्यक्तीला शिक्षा होता कामा नये" हे भंपक तत्वज्ञान आपण निदान दहशतवादांच्या केसेस मध्ये सोडायला पाहीजे. २९,२०४ लोक सरकारी आकडेवारी नुसार ह्या गेल्या काही वर्षात मेली आहेत. अजून किती निरपराध "अफझल गूरू" सुटनार आहेत ह्याचा विचार मानवतावाद्यांनी करायची गरज आहे.

आकडेवारी संदर्भ - Institute for Conflict Management

प्रकार: 

बापरे. हे पण एक प्रकारचे क्लिनझिंगच चाललेले आहे. तिकडे त्या मुगलीस्थाना बद्दल वाचले. इकडे प्रकाशित आकडेवारी त्यातले तथ्य दाखवितेय असे वाटते. त्या उल्फा, मार्क्सवादी इ सर्वांना पण मुस्लीम दहशतवाद्यांसारखेच सारखेच ट्रिट केले पाहीजे.

केदार, हे आकडे सरकारी आहेत? वास्तव याही पेक्षा भयानक असावे.

नुकत्याच झालेल्या मुंबई हल्ल्यात १८० ह्या सरकारी आकड्यां पेक्षा नक्कीच जास्त मनुष्य हानी झाली आहे. हा सरकारी आकडा लोकांचे मनोधैर्य खचु नये (आणि शत्रुचे वाढु नये) या साठी होता. कृपया एक तक्ता अतिरेक्यांचा पण टाका. म्हणजे १० वाईट्ट माणसे नाहीशी होतांना, १८० (सरकारी आकडा) चांगल्या माणसांना नाहिशी करतात १:१८ प्रमाण.

अरे केदार... फक्त अफझल गूरूच नाव कस काय घेतलस बाबा?? तू सगळया धर्मांच्या एकेक दहशतवाद्यांचं नाव लिहायला हावं होतस.. !!!!!!! निधर्मीवाद किंवा सर्वधर्मसमभाव नको का पाळायला आपण????

Angry Angry

ऍडमा बरोबर आहे. कळतयं मला.

उदय हो ही आकडेवारी चूकच असनार ह्यात वाद नाही. खरा आकडा ह्यापेक्षा कितीतरी जास्त असनार आहे.

------------------------------------------
अबला न माझिही माता रे। कथिल हे अगस्तीस आता रे।

बाप रे! वीस हजार लोक मरण पावलेत १४ वर्षात.... म्हणजे दरवर्षी कमीत कमी एक हजार लोक मरतात कोणत्या ना कोणत्या दहशतवादामुळे.... Sad