रोड रेज

Submitted by जिन्क्स on 7 May, 2016 - 05:56

गुडगाव, नोयडा ला वस्तीला असलेला हा राक्षस आता पुण्यात ही अवतरला आहे. संदर्भासाठी ही बातमी वाचा http://epaper5.esakal.com/7May2016/Normal/PuneCity/page5.htm . पुण्यातील कर्वे रोड सारख्या गजबजलेल्या रस्त्यावर एका कुटुंबाला मारहाण कर्ण्यात आली. कुटुंबा मध्ये नवरा, बायको आणि मुलाच समावेश आहे. ह्या कुटुंबा सोबत असलेल्या दांपत्याला पण मारहाण करण्यात आली. मारहाणीच कारण 'रोड रेज'. 'गाडी रस्त्याच्या बाजूला घ्या' अशा क्षुल्लक कारणामुळे सुरू झालेला हा वाद पुढे कुटुंबाला काठ्या-बांबूंनी गंभीर मारहाण करून जखमी करण्या पर्यंत गेला. मारहाण झालेल्यांमध्ये महिलांचा पण समावेश आहे. बातमी मध्ये लिहिले आहे की ते कुटुंब प्रचंड भयभीत झाले आहे. अर्थातच आपल्या समोर आपल्या कुटुंबातल्या व्यक्तींना मारहाण झाली तर कोणीही भयभीत होणारच. मारहाण करणाऱ्याचे वडील आणि भाऊ पोलीस कर्मचारी आहेत.
दररोज वर्तमान पत्रात येत नसले तरी पुण्यात रस्त्यांवर रोड रेज च्या घटनांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे . दररोज कामकाजांसाठी पुण्यातील रस्त्यांवर परवास करणाऱ्या लोकांच्या लक्षात येईल की कुठेना कुठे रोज वाद, हाणामाऱ्या, 'चल तुला दाखवतो', 'बापाचा रस्ता आहे का', 'तुला माहीत आहे का मी कोण आहे' सारख्या घटना चलूच असतात. आजकाल ओवरटेक करून पुढे गेला तरी लोकांना राग येतो आणि लोक भांडायला तयार होतात. मला तर असे वाटते की लोक रस्त्यावर आले की आपला इगो कसा दुखावला जाईल याचीच वाट पाहत असतात.
एका ओळखीच्या पोलीस कॉन्स्टेबलने सांगितले की हिंजवडी सारख्या ठिकाणी होणाऱ्या प्रचंड वाहनांच्या गर्दी मुळे बरेच लोक फ़स्त्रेट(मराठी शब्द? ) होतात आणि किरकोळ कारणां वरून भांडण सुरू करतात आणि यात शिकलेले आयटी इंजिनियर पण मागे नाहीत. कार्यालयातल्या कामकाजामुळे किंवा इतर कोणत्या कारणामुळे येणाऱ्या ताणाचा परिणाम रस्त्यांवरच्या वाहतुकीवर नक्कीच नाही काढता येणार.
त्यामुळे माझ्या पुणे आणि इतर ठिकाणी राहणाऱ्या बंधू आणि भगिनींनो: रस्त्यावर वाहन चालवतानी डोकं शांत ठेवा. आपला थोडासाही आततायीपणा आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या अंगाशी येऊ शकतो . वाद झाला तरी थोडीशी माघार घेण्यातच शहाणपण आहे.
तुम्हाला असा काही रोड रेजचा अनुभव आहे का? पुढच्यास ठेच मागचा शहाणाच्या चालीवर आपण सुरशित राहण्यासाठी काय करू शकतात ह्या साठी ही चर्चा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users