तू....तूच ती!! - ५ अन्तिम

Submitted by किल्ली on 25 February, 2018 - 14:02

तू....तूच ती!! - ४ लिंक
https://www.maayboli.com/node/65410
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
ठरवल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळीच श्रुती odc मध्ये पोचली आणि आदित्यचा शोध घेऊ लागली. तिला तो मिटिंग रूम मध्ये भेटला. तिला पाहून त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. आपण पकडले जाणार अशी भीती त्याच्या चेहऱ्यावर झळकून गेली . पण क्षणभरच !! त्यानंतर आदित्य ने तिला पकडले आणि कुठलीही संधी न देता श्रुतीच्या नाकावर क्लोरोफॉर्म चा रुमाल धरला !!!!!!!!
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

झालं असं की अगदीच mild effect असणारं क्लोरोफॉर्म आदित्य ने वापरलं होतं. ते नाकासमोर धरताच श्रुतीची शुद्ध हरपली. त्याला काहीही सुचेनासं झालं होतं. "अरे देवा हे काय केलं मी ! अगदीच गरज पडली तर म्हणून हा रुमाल बाळगत होतो. माझं गुपित कंपनीत कुणाला कळता कामा नये. इतर कुणीही असला तर चाललं असतं. मी केलं असत manage ! पण नेमकी ही श्रुती मध्ये आली. हिचे गैरसमज झाले असणार नक्कीच! काय करू? हिला विश्वासात घेऊन सर्व खरंखरं सांगून टाकायची इच्छा होत आहे. पण ह्या सगळ्यावर माझं नियंत्रण नाहीये. कर्ता करविता कोणी वेगळाच आहे. पण मी सुचवू शकतो त्यांना. ते ऐकतील का माझं? असं ऐनवेळी मुलीच्या मोहात पडून, तिला भुलून प्लॅन मध्ये बदल नाही करता येणार मला. ही शंभर प्रश्न विचारेल. हिला सगळं सांगितलं तर प्लॅनच काय ? एरवी कोणालाही सहज उल्लू बनवतो मी. पण हिने बरोबर पकडलं!! बास आता! माझे instinct कधीही दगा देणार नाहीत. त्यानुसार मला हिला सगळी हकीकत सांगावी लागेल तरच पुढचा प्लॅन यशस्वी होईल. तिचा प्रामाणिकपणा वेळोवेळी तपासला आहे. अखिलेश काका सुद्धा खुश आहेत तिच्या कामावर आणि प्रामाणिकपणावर. पण तिचा प्रामाणकपणाच नडला मला. त्यामुळेच आज ही परिस्थीती ओढवली आहे. विचार करकरून डोक्याचा भुगा झालाय. दार बंद आहे, अजून कोणी आलंसुद्धा नाहीये ते एक बरं आहे. बोलता येईल. हिला शुद्ध येईपर्यंत बाबांना कल्पना देऊन ठेवतो. तसाही मागे एकदा बोललो होतो. अरे पण हे काय, हिला जाग आली वाटतं "
आदित्य : " काय गं, झाली का झोप .. असं ऑफिस मध्ये झोपतात का ? "
श्रुती : "ए , तू fraud आहेस. ऐकला मी तुझं बोलणं. क्लायंट चे डिटेल्स, प्रोजेक्ट चे डिटेल्स कोणालातरी देत होतास तू . ह्यासाठी लवकर येतो, सगळं जाणून घेतो तू .ओळखलंय मी तुला, u cheater "
आदित्य: "किती ओरडते ग. शांत बस. एकदम शांत! विश्वास ठेव माझ्यावर सगळं सांगतो तुला "
श्रुती : "नाही, मी ओरडणार ! तू मला बोलबच्चन नाही देऊ शकत. छान दिसतोस म्हणून तुझा fraud नाही सहन करणार. अरे loyalty कशाशी खातात माहित आहेत का तुला ? तुझ्या ह्या handsome personality मागे एक दुष्ट शक्ती दडलेली आहे. मी हे सगळं जाऊन अखिलेश सरांना सांगणार. सोड मला"
आदित्य: "वेडी आहेस का तू ओरडायला! आणि अखिलेश काका स्वतः येत आहेत इकडेच बोलावलं आहे मी त्यांना. "
श्रुती : "काका काय म्हणतोस, रिस्पेक्ट देणं सुद्धा विसरलास का ?"
आदित्य :"काकाच आहेत ते माझे !"
श्रुती : "अच्छा म्हणजे ते पण सामील आहेत होय तुला !! अरे देवा ह्या दुष्ट लोकांची किती मोठी साखळी आहे आणि वरपर्यंत पोखरला गेलंय सगळं!! "
आदित्य : "हे बघ श्रुती. इतका वेळ मी शांत होतो आता बास. तू गप्प बस आणि मी काय म्हणतो ते चुपचाप ऐकून घे. तोपर्यंत एक शब्द सुद्धा बोलायचं नाही. fraud असतो तर तुला केव्हाच शूट केलं असतं. अशी चर्चा करत बसलो नसतो इथे! ही बघ. खरी बंदूक आहे ही. जीवाची पर्वा असेल तर शांत बस आणि मी म्हणतो ते ऐकून घे फक्त. मग तू जाऊ शकतेस. मी वचन देतो की त्यानंतर तुला धक्का ही लागणार नाही आणि हवं तिथे जाता येईल, हवं ते करायला तू मोकळी ! OK ? "
श्रुती : "हम्म .. "

गेले तासभर आदित्य बोलत होता आणि श्रुती थक्क होऊन ऐकत होती. त्याच्याबद्दल असणाऱ्या राग आणि चीड ह्या भावना केव्हाच मावळल्या होत्या आणि त्यांची जागा आता कौतुक आणि अभिमानाने घेतली होती.

श्रुती : "एक मिनिट आदित्य, म्हणजे तू प्रत्यक्ष कंपनी चा मालक आहेस आणि अखिलेश सर तुझे काका!! नाही रे अजूनही माझा विश्वास बसत नाहीये !"
आदित्य : "किती वेळा सांगू सुंदरी, तुझा विश्वास बसावा म्हणून तुला सगळ्या घटना तपशीलवार सांगितल्या तसे पुरावेही दिले. अजून काय करू म्हणजे तुला खरं वाटेल?"
श्रुती: "Let me summarize!! तुला कंपनी बद्दल सगळं माहित आहे, अखिलेश सरांबरोबर गप्पा मारताना तुला मी प्रत्यक्ष पाहिलं आहे, सगळे मेल्स चे BCC तुला येतात. कंपनी च्या क्लायंट बरोबर तुझे पर्सनल कॉन्टॅक्टस आहेत. तश्या मेल्स ही तू दाखवल्यास मला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कंपनीचे मालक अभिषेक ह्यांचा अमेरिकेत जाऊन शिकून आलेला मुलगा तूच आहेस. पण कंपनीत ग्राउंड लेवलला कस काम चालतं हे बघण्यासाठी एक साधा कर्मचारी म्हणून रुजू झालास. आता संगती लागत आहे मला. काही लोकांना अचानक कंपनीतून काढून टाकण्यात आलं मागच्या काही दिवसात!! नवे clients आणि प्रोजेक्ट्स आले. माझं जोरदार increment झालं. काहींच्या कामाचं स्वरूप बदललं. हा सगळ्या तुझ्या गुप्तपणे काम करण्याचा परिणाम!! पण तुझं मुख्य उद्दिष्ट मला नाही समजलं अजून. केवळ एवढ्यासाठी तुझी गरज नव्हती , तुला तर अनुभव ही आहे अमेरिकेत कामाचा. तुझी startup सुद्धा आहे!! ती इकडे merge करायचा विचार आहे वाटतं ... चांगला आहे !!"
आदित्य: "startup आहे माझी, पण मला माझा business भारतात वाढवायचा आहे. म्हणून मी इथे आलो. इथला अनुभव घेण्यासाठी. सुरुवातीला उद्दिष्ट असं काही नव्हतं. पण नंतर लोकांशी बोलत गेलो, मिसळत गेलो आणि मला बऱ्याच गोष्टी समजल्या.. सुधारणा सुचल्या, त्या मी बाबा आणि काका ह्यांच्याबरोबर डिसकस करत गेलो आणि बाकीच्या गोष्टी घडल्या. खूप काम केलं, काम करत नाही असं दाखवून सगळ्यांच्या गोटात शिरलो, खबरा काढल्या, खरोखर काम कसं चालतं हे जाणून घेतलं, खूप काही शिकलो, टेकनॉलॉजि आणि माणसं दोन्ही !! प्रत्येक प्रोजेक्ट चे code review केलं. technical pitfalls दूर केले. experts सोबत discussions केलं. आपली कंपनी छोटी आहे गं. तिचा विस्तार करायचा आहे. global प्रेझेन्स आणि रेकग्निशन मिळवायचं आहे. ह्या बाबांच्या ध्येयासाठी त्यांना मदत करत होतो इतकंच !! त्यात माझा ही फायदा झाला. माझी startup पूर्णपणे वेगळया technology आणि business goal वर काम करते ते काम तर चालू राहिलच पण आता बाबाना मदत करायची हे पक्क ठरवलंय मी. ही कंपनी त्यांनी सुरु केली, वाढवली, मी हिला अजून मोठ्या उंचीवर नेऊन ठेवणार !! हेच ध्येय आहे माझं!! "
श्रुती: "तू हे सगळं मला का सांगितलंस ?? बंदूक वगैरे काय काय नाटक केलीस ?"
आदित्य : "अगं, घाबरलो मी. पहिला अनुभव ना पकडले जाण्याचा . आतापर्यंत सगळं व्यवस्थित चालू होत. तू अचानक टपकलीस . असं वाटलं सगळी मेहनत पाण्यात जाते की काय. आता कळत आहे एवढं panic होण्याची गरज नव्हती मला. तुही काही कमी नाहीस, किती बडबड केलीस , and u know what , u just called me handsome and all. "
श्रुती : "हो ना खरंच आहे ते. पण दुष्ट शक्ती आहेत अस म्हणाले तेही खरं!!! "

असं बोलून श्रुती हसायला लागली. आदित्य सुद्धा तिच्या हसण्यात सामील झाला.
त्याने ठरवलं होत, उद्याच्या पार्टी मध्ये हिला propose करायचं आणि म्हणायचं,
"तू तूच ती ..... माझ्या हृदयाची राणी!!!! "

-----------------------------------------------------------------------------------------------
ही कथा आता इथेच थांबवते आहे.. कदाचीत पुढचा season लिहीन नंतर. कशी वाटली जरूर सांगा आणि सुधारणाही सुचवा.
हलकी फुलकी कथा होती.. थोडी टिपिकल वाटू शकते पण हेच सुचलं मला. इलाज नाही Lol
पहिला लिखाण आहे इथलं.. गोड मानून घ्या !!
मायबोलीचे आणि समस्त वाचकांचे आभार !!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Uhoh संपवली....
हलकीफुलकी ! आवडली.
या प्लॉटवर पुढे भारी स्टोरी लिहीता येईल ! मनावर घ्याच.
पुलेशु.
Happy

अहो कील्ली
इतक्यात संपवली देखिल
असो
मग
पुढचा सिजन केव्हा येनार??????

छान कथा, पुलेशु..
रच्याकने, कोर्पोरेट मध्ये असच चालतं, काम कमी पण दिखावा जास्त असं जो करतो तोच प्रोमोट होतो (त्याला visibility असं गोंडस नाव आहे) .. काम करणारे गाढव काम करत बसतात.

रच्याकने, कोर्पोरेट मध्ये असच चालतं, काम कमी पण दिखावा जास्त असं जो करतो तोच प्रोमोट होतो (त्याला visibility असं गोंडस नाव आहे) .. काम करणारे गाढव काम करत बसतात.>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>+१११
अगदी अगदी.......visibility हे showOff चं दुसरं नाव !!!

धन्यवाद !!

रच्याकने म्हणजे काय Proud
माबोवर प्रतिसादांमध्ये दिसत असतं .. अर्थ माहित नाही मला !!

माझ्या नवीन धाग्याची / कथेची रिक्षा !!
प्रेमकथा लिहिण्याचा प्रयत्न !! जरूर वाचा आणि अभिप्राय द्या...

तू....तूच ती पुढील सीजन>>>>> https://www.maayboli.com/node/66728