तू....तूच ती!! - ३

Submitted by किल्ली on 6 February, 2018 - 09:15

तू....तूच ती!! - २ लिंक
https://www.maayboli.com/node/65151

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

श्रुती ऑफिस ला पोचली. पार्किंग मध्ये तुरळक गाड्या होत्या. कुणीच आलं नसणार. ही थट्टा असू शकते असा विचार करत ती लिफ्ट मध्ये शिरली. ऍक्सेस कार्ड पंच करून तिच्या odc मध्ये शिरताच तिला आश्चर्याचा धक्का बसला!!!! .................
बाहेर कोणीच नसल्यामुळे कॉन्फरेन्स रूम चं दार उघडं होतं. श्रुतीने आत काय चाललंय हे जाणून घेण्याचा प्रयत्न सुरु केला कसलीतरी मीटिंग होती. आदित्य चा आवाज येत होता. अगदीच फॉर्मल डिस्कशन वाटत होतं. अजून कोण आहेत ते बघण्यासाठी ती हळूच किंचित डोकावली. तिच्या टीम मधली सिनियर मंडळी नव्हती कोणी. फक्त लवकर येणारी सौम्या आली होती. कोणीतरी तिला प्रोजेक्ट विषयी माहिती विचारत होते आणि फ्रेशर असलेली सौम्य बावरली होती आणि अडखळत होती. प्रश्न विचारणारे त्या क्षेत्रातले तज्ञ वाटत होते. कोण असतील ह्याचा विचार करत असतानाच तिची ट्यूब पेटली.

"अरेच्चा, हे तर अखिलेश सर आहेत, त्यांना अशा अचानक भेटी द्यायला आवडतं , त्यामुळे प्रोजेक्ट चं खरं स्टेटस समजतं अशी त्यांची धारणा आहे, असं ऐकलं होतं आणि आज त्यांना प्रत्यक्ष पाहत आहे मी. पण, हे काय !, सौम्याला फारसं माहिती नाहीये. त्यामुळे आपल्या टीम चं impression बिघडू शकतं. आपण भरपूर काम केलंय ते त्यांच्यापर्यंत पोचलं पाहिजे. शेवटी ते कंपनी चे Co Founder आहेत. पण आदित्यला कसं समजलं ते येणार आज. Anyways , मी जाते आत. असंही नुकतंच मी presentation तयार केलंय. तेही दाखवता येईल ".
श्रुतीने दरवाज्यावर टकटक केली. परवानगी घेऊन धीटपणे ती आत शिरली. आदित्य मिश्कीलपणे तिच्याकडे पाहत होता. त्याने तिची ओळख करून दिली होतीच . त्याच्याकडे एक कटाक्ष टाकून तिने मीटिंग चा ताबा घेतला. अखिलेश सरांना पूर्ण माहिती तर दिलीच शिवाय अजून काय करता येईल ह्याविषयीच्या नवनवीन ideas पण मांडल्या. त्यांना तीच आणि पूर्ण प्रोजेक्टचं काम खूप आवडलं , थोडक्यात सुधारणेच्या काही सूचना देऊन ते तिथून गेले. आदित्य त्यांच्या सोबत गेला.

इकडे श्रुती मात्र विचारात पडली होती. एवढ्या वेगवान घडामोडी घडल्या त्यात तिला काहीतरी वेगळं वाटत होतं.काहीतरी गडबड जाणवत होती. दिवसाची सुरुवात तर छान झाली होती. सगळ्या घटनांचा विचार करत तिने तिचा pc चालू केला. pc तर चालू झालाच आणि तिचं विचारचक्र सुद्धा!
"आदित्यचं ऐकलं हे बरं केलं मी. त्याच्यामुळेच आज मी अखिलेश सरांशी प्रत्यक्ष बोलू शकले. त्यांचं मार्गदर्शन मिळालं. अजून प्रगती करू शकेन मी आता. शिवाय काय काम करते हेही त्यांच्यापर्यंत पोचवता आल्यामुळे visibility विषयी जी शंका होती तीही मिटली. पण काय गडबड झालीये देव जाणे. पण एवढ सगळं चांगलं घडून सुद्धा काहीतरी चुकल्यासारखं वाटत आहे. नक्कीच आदित्य मुळेच अस्वस्थ वाटत आहे. पण आज चांगल्या कारणासाठी! अरे देवा, पण काय केलं मी हे आज! साधे आभार सुद्धा मानले नाहीत आदित्यचे! त्याला धन्यवाद द्यायला हवेत. पण तो जर वेडंवाकडं बोलला तर डोकं सरकेल माझं! काय करू? ह्या सौम्याचं एक बरं आहे. मला हीच वेळ सोयीची आहे असं सांगून लवकर येते आणि लवकर जाते. ठीकच आहे म्हणा असं ही पकवते ती " तिच्या विचारांचं तिलाच हसू आलं आणि श्रुती स्वतःशीच खुदकन हसली.

सोम्या: "हे ,हाय.आज लवकर आलीस तू. पण बरं झालं आलीस ते. कसली भारी बोललीस गं मीटिंगमध्ये, एकदम हवा केलीस आपल्या प्रोजेक्टची ! आणि by the way, आदित्य छान दिसतो ना. मला माहितेय तू त्याचा विचार करत होतीस आणि हसलीस, हो ना , चोरी पकडली एका मुलीची !!!"
श्रुती: "काहीही काय अगं , मला आमच्या कॉलेज मधला एक किस्सा आठवला. म्हणून हसले. बोल ना तू "
सोम्या: "तू आदित्य बरोबर काम करतेस ना ,आमची पण मैत्री झालीये आता. तुला एक गम्मत सांगू का ? हा आदित्य म्हणजे विचित्र वल्लीच आहे. सतत बडबड. एके दिवशी तर तुझीच स्तुती आरंभली होती राजांनी. "
श्रुती: "स्तुती नाही निंदा असेल. आम्ही बोलत नाही माहित आहे ना तुला"
सोम्या: "अगं खरंच. विश्वास ठेव. तो असा आहे ना कि बस. सगळ्यांसोबत जमतं त्याच गुळपीठ. जवळपास सगळेच त्याला मित्र मानतात आणि तो मैत्री निभावतोही! "
श्रुती: "पण तू हे सगळं मला का सांगत आहेस ?"
सोम्या:"तुझा गैरसमज दूर व्हावा आणि तू त्याच्याशी बोलावसं म्हणून. खरं सांगते, तो वाईट नाहीये आणि तुही छान आहेस. बघतेस ना रोज, एक अदृश्य ताण असतो सगळ्यांच्या मनावर. घाबरतात सगळे तुझ्याशी बोलायला, मैत्री करायला. मला हे तुला कधीपासून सांगायचं होतं. पण संधी मिळत नव्हती. तुला नाही आवडत ना तो , ठीक आहे. पण केवळ हाय हॅल्लो पुरता तरी बोल. अशी अढी ठेवू नको गं. तो तुला तुमच्या त्या दिवशीच्या भांडणानंतर सॉरी म्हणायला आला होता. तू त्याला टाळून निघून गेलीस. हे माहित आहे का तुला ? "
श्रुती: "बरं, आता हे आदित्यपुराण बंद कर आणि माझ्याबरोबर नाश्त्याला चल. मी बघते काय करायचं ते. "
सोम्या: "तू ऐकणार आहेस थोडीच. बघ माझं काम होतं तुला समजावण्याचं , म्हणून मी बोलले. Anyways ,खाऊया काहीतरी. पोहे छान मिळतात खाली भैयाकडे, एकदम गरम गरम!. आज माझी ट्रीट. ऐश करूया !! "

क्रमश:

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

Chan ahe katha.. Maza olkhichi vatate.. Mi pn IT made kam karte na.. Tasa aaditya mazahi officemade ahe.. Pahu tu.cha kasa nighti n. Amcha kasa.. Mi hi nahi bolat tyachashi... Kam n karta.. God bolun pudhe janare lok mala avdt nahit.. Lvkr pudhcha bhag ana.. Plssss. Me relate karte ya stofishi...

Sudharna..
Tumcha kasa nighto n amcha kasa*
Storishi**

धन्यवाद !!
पुढील भागास उशीर झाला हे खरे आहे ... टाकते लवकरच .