तू....तूच ती!! - ४

Submitted by किल्ली on 25 February, 2018 - 12:02

तू....तूच ती!! - ३ लिंक
https://www.maayboli.com/node/65232

---------------------------------------------------------------------------------------------------

"माणसाने जगावं तर खाण्यासाठीच असं माझा स्पष्ट मत आहे. वेगवेगळ्या चवीचे पदार्थ खाणे आणि त्याचा आनंद घेणे ह्यालाच तर सुखी जीवन म्हणतात. कसले चटकदार पोहे केले होते भैयांनी!! खरपूस तळलेले कांदे, शेंगदाण्याची आरास, कोथिम्बिरीची बरसात, शेवेची सजावट आणि लिंबाची फोड!! वाह ! जगावे खवय्याने मनमुराद तर पुण्यातच ! भैयाजी देव तुमचं भलं करो!! "

श्रुती नुकत्याच चापलेल्या पोह्यांच्या आठवणीत रमली होती. ती खमंग चव तिच्या जिभेवर रेंगाळत होती. आता दुपारी जेवणात काय खावं ह्याचे विचार तिच्या मनात घोळायला सुरुवात झाली होती. "foodie" लोकांचं एक बरं असतं, आयुष्यातल्या समस्त चिंता बाजूला सारून ते खाण्याची आणि चवींची स्वप्न बघत असतात. श्रुतीचा स्वभाव अगदी असाच होता आणि हो आदित्यचाही !! ह्या दोघांमध्ये असणारा हा सध्यातरी एकाच कॉमन धागा होता. आदित्य आज श्रुतींच्याच odc मध्ये बसला होता. नेमका त्याचा डेस्क तिच्या समोरच्या cubical मध्येच allot झाला होता. आदित्य आता श्रुतीच्या प्रोजेक्ट मध्ये असणार हे तिला mail द्वारे समजला. तो तिच्या प्रोजेक्ट मध्ये आला ह्याचा तिला काही प्रॉब्लेम नव्हता. पण खरी गोची पुढेच होती. अखिलेश सरांनी टीमला आदित्यचे inputs घ्यायला सांगितले होते आणि हे वाचून श्रुतीच्या अंगाचा तिळपापड झाला होता. ती नुसतीच सुन्न होऊन स्क्रीन कडे बघत बसली होती. खरे पाहता आता श्रुतीने आदित्य बरोबर संपर्क ठेवणे ही गरज बनली होती आणि त्यात काही गैर नव्हतेच. त्याने तिला नुकतीच मदत केली होती. पण आता श्रुतीचा इगो आडवा येत होता आणि तिला आता ही परिस्थिती कशी हाताळावी हे समजत नव्हते. हा प्रश्न आपोआपच सुटला. आदित्य चा बोलघेवडा स्वभाव सहज पणे सगळ्या गोष्टींवर मात करून गेला. त्याने हसत जाऊन श्रुती ला ग्रीट केला आणि कॉफी ऑफर केली. आजच सकाळी बरा अनुभव आल्यामुळे श्रुती सुद्धा हसून हाय म्हणाली आणि कॉफी साठी आदित्य सहीत टीम बरोबर कॅफेटेरियात गेली. मस्त गप्पा मारत कॉफी चे घुटके घेत टीम ने ब्रेक ची मजा घेतली.
एक वेगळ्या प्रकारचं सॅंडवीच लाँच झालं होतं आणि आदित्य ने सगळ्यांना ट्रीट दिली. आज त्याचा ह्या प्रोजेक्ट मधला पहिला दिवस म्हणून !! श्रुती तर खुशच झाली पण तिने चेहऱ्यावर तसे काही दाखवले नाही. तिने ट्रीट बद्दल त्याचे आभार मानले, टीम मध्ये स्वागत केला आणि डेस्क वर परतली.

त्या दिवसानंतर आदित्य काय करतो ह्याचे निरीक्षण करण्याचा श्रुती ला छंदच जडला. हळू हळू तिच्याही नकळत तिला तो आवडायला लागला होता. एकदोनदा सौम्या ने हटकले देखील. पण श्रुती ने ताकास तूर लागू दिले नाही. प्रोजेक्ट development बऱ्यापैकी वेगात चालली होती. क्लायंट ने critical deadlines दिल्या होत्या. त्यात श्रुती ची भूमिका अत्यंत महत्वाची असल्यामुळे तिला ऑफिस मध्ये जास्त वेळ बसून काम करावं लागत होतं. ती आता संध्याकाळी उशिरा घरी जायला लागली होती. काहीही करून तिला ह्या प्रोजेक्ट मध्ये extensions नको होत्या आणि bug fixing ला वेळ लागत असल्यामुळे जास्त काम करावं लागत होतं. श्रुतीच प्रोजेक्ट बद्दल आणि overall technical knowledge चांगलं असल्यामुळे टीमला तिच्या मदतीची गरज होती. ती सुद्धा प्रोजेक्ट यशस्वी व्हावा म्हणून चौफेर लक्ष देत, मदत करत, स्वतः चंही काम करत होती. सुरुवातीला तिच्याशी कमी बोलणाऱ्या टीम चं आता तिच्याशिवाय पान हालत नव्हतं. एकच व्यक्ती ह्या गोष्टीला अपवाद होती. अर्थातच आदित्य !! तिला काहीच न विचारता त्याचं काम चाले. तो नेमका काय काम करतो हे कोणालाही माहित नव्हतं. leads ना त्याने केव्हाच गुंडाळून ठेवलं होतं. श्रुतीला आता आदित्य विषयी भलताच संशय यायला लागला होता. तो रात्री ऑफिस मध्ये बसून कसले तरी कॉल्स घेत असे. क्लायंट मात्र नेहमीच आदित्य ला appreciate करत असे. तो काहीच काम करत नसून सुद्धा क्लायंट का appreciate करतो ह्याचं कोडं श्रुतीला उलगडत नव्हतं. इतर कोणालाच आदित्य विषयी सुतराम शंका नव्हती. ह्याच कारण म्हणजे सध्या टीमला खूप काम
होतं आणि एकमेकांशी जुळलेले सूरही त्याला कारणीभुत होते, त्यात आदित्यने सगळ्यांना चांगलंच पटवलं होतं. उंचापुरा आदित्य आपल्या मधाळ हसण्याने,बोलण्याने आणि बोलबच्चन स्वभावाने कुठल्याही कंपूत सहज मिसळत असे. मुली तर त्याच्या आजूबाजूला घुटमळत असायच्या. तो माझ्याशी बोलला, ही कोणत्याही मुलीसाठी आनंदाची गोष्ट झाली होती. श्रुती मात्र काय करावे ह्या संभ्रमात पडली होती. काहीतरी वेगळा शिजत आहे असं तिला सारखं वाटत होतं. नेमका काय ह्याचा एकीकडे शोध घेणं ही गरज होऊन बसली होती. तिच्या प्रश्नांची उत्तरे तिला लवकरच मिळणार होती.
खरेच आहे नाही का! कुठल्याही गोष्टीचा सातत्याने पाठपुरावा केल्याने त्यात यश मिळतेच. आणि यश मिळाले !! प्रोजेक्ट यशस्वी झाला !!
क्लायंट ने सगळ्यांना appriciate करणारी भली मोठी मेल पाठवली. श्रुतीचं विशेष कौतुक केलं होतं. अखिलेश सरांनी कॉल करून personally श्रुतीचं अभिनंदन केलं. ह्या यशानिमित्त अखिलेश सरांनी एक पार्टी जाहीर केली!! सगळ्यांच्या आनंदाला उधाण आलं !! ड्रिंक्स घेणारे तर हवेत तरंगायला लागले, न पिताच ! आतापासूनच !! फुकटची ढोसायला मिळणार होती ना.. अनलिमिटेड!! चर्चा रंगात आल्या होत्या जिकडेतिकडे ! बहुतकरून मुलींच्या गप्पा ड्रेस आणि लुक विषयी, आणि मुलांच्या ड्रिंक्स विषयी सुरु झाल्या होत्या!!! श्रुतीला ह्या कशातच काडीचाही रस नव्हता. तिला आनंद ह्या गोष्टीचा झाला होता की तिला आता शोधमोहीम व्यवस्थित करता येणार होती, पुढचं काम सुरु व्हायला वेळ होता. आदित्य नेमका काय करतो ह्याचा छडा लावुनच पार्टीचा आनंद लुटायचा असे तिने ठरवले होते . ती संधीच्या शोधात होती.
पार्टी जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी final रिपोर्ट्स साठी ती ऑफिस मध्ये थांबली होती. आदित्य एका कॉलवर होता. manners ची वाट लावून श्रुती हळूच तो काय बोलतो हे ऐकायला लागली. जे ऐकले ते समजताच तिचे डोके फिरले आणि ह्याची शहानिशा करायचीच असे ठरवून तिने घरी जाणारी कॅब पकडली.
ठरवल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळीच श्रुती odc मध्ये पोचली आणि आदित्यचा शोध घेऊ लागली. तिला तो मिटिंग रूम मध्ये भेटला. तिला पाहून त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. आपण पकडले जाणार अशी भीती त्याच्या चेहऱ्यावर झळकून गेली . पण क्षणभरच !! त्यानंतर आदित्य ने तिला पकडले आणि कुठलीही संधी न देता श्रुतीच्या नाकावर क्लोरोफॉर्म चा रुमाल धरला !!!!!!!!

क्रमशः

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त चाललंय लिखाण

पण लवकर लवकर पार्ट्स टाकत जा

खुप वाट बघायला लावता.

Oyyyy... Kahani me twist.....ata utsukta lagliy....
Pudhcha bhagachi vat pahte...