तू....तूच ती!! - १

Submitted by किल्ली on 24 January, 2018 - 09:47

बऱ्याच दिवसापासून लिहीन म्हणते. आज मुहूर्त लागला आहे. पहिलं लिखाण आहे. सांभाळून घ्या ही विनंती.
ऑफिस मध्ये रिव्ह्यू मेल मध्ये टाकते तसं वाक्य इथेही टाकते :
कृपया सुधारणा सुचवा .. धन्यवाद !!
हा ह्या कथेचा पहिला भाग आहे. सुचत जाईल तसे पुढचे भाग येतील
______________________________________________________________________________________

दिवस मावळतीकडे झुकला होता. सूर्याची किरणे तिच्या डेस्क वर खेळत होती. सहसा IT ऑफिस मध्ये सूर्य किरणांच दर्शन दुर्मिळ असतं . पण ती ह्या बाबतीत भाग्यवान ठरली होती. Live wallpaper प्रमाणे तिच्या डेस्क जवळच्या काचेच्या भिंतीतून ती निसर्ग पाहू शकायची आणि तिले हे खूप आवडायचं . पण आज तिचं ह्या कशाकडेच लक्ष नव्हतं. एक महत्वाची टास्क पूर्ण करायच्या मागे लागली होती ती. क्लायंट ला गुंडाळता येणं तिच्यासाठी सहज शक्य असला तरी ती प्रामाणिक होती. झपाटल्यासारखा तिने काम पूर्ण केला आणि कोड चेक इन केलं . आता अंधार पडला होता आणि एसी चा गारवा जास्तच जाणवू लागला होता. मात्र क्लायंट कॉल असल्यामुळे तिला थांबावे लागणार होते. ब्रेक घ्यावा म्हणून ती उठली. गरमा गरम वाफाळत्या कॉफीचा मग घेऊन तिने कॅफेटेरियात एक हवेशीर जागा निवडली. वाऱ्याची मंद झुळूक तिच्या केसांना हलकेच उडवून जात होती. आज नेमकी तिची टीम नव्हती नाहीतर तिने हा कॉफी टाइम मस्त एन्जॉय केला असता. एकटी असल्यामुळे तिच्या डोक्यात विचारांची चक्रे फिरायला लागली. ..

("का आले मी इथे? सखोल ज्ञान मिळेल, शिकायला मिळेलया आणि मुख्य म्हणजे दादा म्हणाला म्हणून तुलनेने छोटी कंपनी जॉईन केली. पण इथे खरंच तसं होत आहे का? नशीब माझं काम नवीन टेकनॉलॉजि मध्ये आहे नाहीतर कठीण झालं असतं माझं. लोकं किती टाळाटाळ करतात . मी तर मन लावून काम करते तरीही सगळ्यांना बॉस कडून मिळणाऱ्या वागणुकीत फारसा फरक दिसत नाही. अति महत्वाचा काम असेल कि लगेच ह्यांना मी दिसते.आज हि तसाच झालं. मी इथे थांबली आणि सगळी मंडळी घरी पळाली. असू देत. मी नाही विचार करत आता. आपण भलं, आपला काम भलं ". )

कॉफी संपवून ती मीटिंग रूम मध्ये आली. कॉल घेतला आणि घरी जायला निघाली , तोच तिने हाक ऐकली. वळून पाहते तर तो. हो तोच.
("अरे देवा, हे काय ...........................................................................

क्रमश:

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मॉल मधून शॉपिंग करतो तेव्हा असं वाटतं कि खूप काही घेतलं आहे. बिल ही मजबूत असतं.पण घरी आल्यावर बॅग बघतो तेव्हा समजतं कि "अरेच्चा काहीच नाही घेतला आपण !"
ह्या भागाचं ही काहीसा असंच झालाय शमिकाजी.... Happy Happy

धन्यवाद शमिकाजी आणि आनंदजी !

किल्ली, चांगली सुरुवात आणि छान प्रयत्न...
पहिल्या लिखाणासाठी अभिनंदन आणि पुढील लेखनासाठी शुभेच्छा...!!!

me navin maaybolikar ahe

mhanun mala madat havi hoti

ithe settings privecy kashi surakshit thevavi

hya page var mhanaje maaybolivar accounts tar hack hot nahit na pls guys mala madat havi ahe pls....

ही माझी इथली पहिली कथा , गेल्या वर्षी २४ जानेवारीला सुरु झाली होती..
ह्या वर्षी २४ जानेवारीच्या आत दुसरा सीझन सम्पवण्याचा विचार आहे..
आज ८ वा भाग पोस्टला आहे, अजुन १-२ भागात कथा सम्पेल..
कथेला दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल खुप खुप आभारी आहे...