Paus – ek priyakar…
Aata tari yena - Kiti ant pahashil
Mi chatakasarakhi tahanlele nahi
Morasarakhe thui thui nachtahi mala yet nahi
Tu yavas mhanun Tansenasarakha gatahi nahi..
Tu janatos - ya saryanpeksha vegali mazi priti
Antarichya olavyache apule nate
Mazya aat khup aat- tu daba dharun baslela- veli aveli kadhihi barasanara
Tu dhund kosalavas aani mala chimb mithit bhijvavas
Pahila aavesh sampalyavar tu nusatach barsavas
an mi tuzyakade pahat rahava – dole band karun tula anubhavava
Kadhi tu khup khup garjavas, vijanbarobar tandavnrutya karun mala ghabravavas,
निराशा / वैफल्य या संदर्भात माहिती हवी आहे.
वैफल्यातून येणा-या प्रतिक्रिया / वैफल्यग्रस्त होण्याची कारणे / स्वतः किंवा आपल्यामुळे इतरांच्यात वैफल्य येऊ नये यासाठी घ्यावयाची काळजी / स्वभाव विशेषाप्रमाणे होणारे परिणाम / उपचार इ. माहिती मिळाल्यास आभारी राहीन.
'संयुक्ता'ने माहिती संकलन, विचारमंथन आणि समाजसेवा हे तीन उद्देश समोर ठेवून आजवर धागे प्रकाशित केले आहेत. 'संयुक्ता'मध्ये चर्चेस घेतले जाणारे विषय सर्वंकश असावेत हे पथ्य संयुक्ता व्यवस्थापन तसेच संयुक्ता सदस्य कटाक्षाने पाळत आल्या आहेत. ह्यातले अनेक विषय केवळ स्त्रियांपुरते मर्यादित नसतात किंवा 'संयुक्ता'पुरते ठेवल्याने केवळ एकच बाजू समोर येते असे लक्षात आल्याने काही धागे सार्वजनिक करण्याचा निर्णय घेण्यात आला होता उदा: प्रोफेशनल नेटवर्किंग. 'चाळिशीतली वाटचाल' हा असाच एक विषय जो स्त्री-पुरुष दोघांनाही समसमान महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा. ह्याच कारणासाठी हा धागा सार्वजनिक आहे.
पंधरा दिवसांपूर्वी घरात एक छोटे मांजर आले. साधारण दोन एक महिन्याचे असावे. आमच्या पूर्वीच्या मांजराने नवा घरोबा केला असल्याने या नव्या जिवाला आनंदाने ठेऊन घेतले.
मांजर अगदी घरचेच झाले आहे. व्य्वस्थीत खाते, खेळते आणि माझ्याबरोबरच झोपते. स्वतःची स्वच्छ्तही छान राखते. घरच्या एका कोपर्यात त्याने त्याची सोयही केलेली आहे. इतरत्र कोठे घाण करत नाही.
हे ते आमचे गोड बाळ...

हा विनोदी लेख नाही !!!
डॉक्टर ने प्रिस्क्रिप्शन लिहीताना कॅपिटल लेटरचाच वापर करावा अस आवाहन सरकारने केले आहे.
ही म टा मधिल बातमी आहे,
लिंकः http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/16288855.cms
चुकीची औषधे घेऊन अमेरीकेत दरवर्षी सात हजार लोक मरण पावतात !
आरोग्य सेवेतील चुकांमुळे जगभरात डॉक्टर व वैद्यकीय संस्थांना वर्षाकाठी २९ अब्ज डॉलर्सचा भुर्दंड पडला आहे.
' वर्ल्ड हेल्थ असेंब्ली ने २००२मध्येच ठराव करून आरोग्य सेवांमधील चुका टाळण्याकरिता करायच्या उपाययोजनेची जंत्री जारी केली आहे.
खराब हस्ताक्षर असलेली मुले हमखास डॉक्टर होतात , असा प्रवाद किंवा विनोद आहे.
कोणाला खात्रीशीर Eczema Atopic dermatitis या विकारावरील औषधांविषयी व घरगुती उपचारांविषयी माहिती आहे का ?
माझा ४ वर्षाच्या मुलाला लहानपणापासून हा विकार आहे. Eczema चा उद्रेक बर्याच कारणांनी होऊ शकतो. Allergy युक्त खाद्य पदार्थ हे एक कारण आहे, पण Eczema चा उद्रेक तापमानात बदल इ यांनीही होऊ शकतो. माझे लिहिण्याचे प्रमुख कारण फक्त Eczema ची माहिती देणे नाही तर त्यावरील घरगुती औषधांबद्दल माहिती गोळा करणे आहे. या विकारावर त्वचेवरून लावायची मलमे (Steroidal व इतर) मिळतात पण या औषधांचे खूप दुष्परिणाम आहेत (अंतर्जालावर अशी औषधे व दुष्परिणाम याची जंत्रीच आहे).
CPR - Cardio-Pulmonary Resuscitation (कार्डिओपल्मनरी रेससिटेशन)
हा लेख वाचताना बर्याच जणांच्या मनात "आम्ही डॉक्टरही नाही आणि नर्सही नाही. मग हे आम्ही कशाला वाचायचं ? " असा प्रश्न येण्याची शक्यता आहे.
पण प्रत्येक व्यक्तीला बेसिक लाइफ सपोर्ट्बद्दल जुजबी माहिती असणं गरजेचं आहे.
वेळ-प्रसंग काही सांगून येत नाही. आणि सीपीआर शिकणं, हे वाटतं तितकं अवघडही नाही.
प्राणवायूचा पुरवठा थांबल्यापासून ४ ते ६ मिनिटांत मेंदूला इजा सुरू होते आणि अवघ्या आठ मिनिटात मृत्यू ओढवू शकतो.
अचानक कोसळलेल्या व्यक्तीला त्वरित सीपीआर मिळाला तर जीव वाचण्याची शक्यता वाढते.
ह्याआधीचा लेख - मेनोपॉज-१ : नेमकं काय घडतं ?
मागच्या लेखात आपण पाहिले की मेनोपॉज हा आजार नसून स्त्रियांच्या आयुष्यातील एक अटळ आणि पूर्णतः नैसर्गिक अशी अवस्था आहे.
त्या वेळी जाणवणारी शारीरिक आणि मानसिक त्रासाची लक्षणे ही इस्ट्रोजेन ह्या हॉर्मोनच्या कमतरतेमुळे होतात.
कुठली लक्षणे असतात ही ?
तुम्हाला हिमगौरीच्या गोष्टीतील "हाय हो, हाय हो, हाय हो" असं आनंदाने म्हणत लुटुलुटु चालणार्या सात बुटक्यांची फौज आठवते का ?
कसलीच तयारी न करता पहिल्यांदाच गिर्यारोहणाला जाणारे किती लोक पाहिले आहेत तुम्ही ??
ज्या जागी जायचं आहे तिथला नकाशा, तिथे आधी कुणी गेलंय का, त्यांचे अनुभव काय होते, तिथलं वातावरण कसं असेल, सोबत काय न्यावं लागेल, तिथे त्रास होऊ नये म्हणून खाण्या-पिण्यात काय बदल करावे लागतील, आणि सगळी काळजी घेऊनही काही त्रास झालाच तर काय उपाययोजना करायची.....
......बहुतांशी लोक अशी शक्य तितकी माहिती गोळा करूनच गिर्यारोहणाला निघतात.
आणि असं केल्यामुळे " आपल्याला नक्की जमेल हे ! " हा आत्मविश्वास कितीतरी पटीने वाढतो, प्रवास तुलनेने सुखकर होतो.
माझ्या बहिणीचा कर्करोग तिच्या शरिरात हळुहळू पसरायला सुरवात झाली आणि तिला त्याच्या वेदना देखील व्हायला लागल्या आहेत. पेनकिलर जर घेतलेले असले तरच तिला त्या वेदना सुसह्य होतात नाहीतर तळमळत पडत रहावे लागते. पुण्यात रुबी इथे तिने ३ वर्षांपुर्वी 'हरसेप्टीस' नावाची केमोथेरपीची ७ इन्जेक्शने घेतली होती पण ती अयशस्वी ठरलीत. परत कर्करोगाने अंग बाहेर काढले. सुदैवाने ताईचा मुलगा आता पुण्यात बर्यापैकी स्थायिक झाला आहे. त्याची बायको आणि तो दोघेही कमावतात. मला ताईला तिथेच ठेवायचे आहे. इथे एक विचारायचे आहे की शेवटच्या जाण्याच्या त्या काही महिन्यात तिला फार वेदना होऊ नये. तळमळत तिने जगाचा निरोप घेऊ नये.