मांजर, मी आणि 'तो'

Submitted by आंबा१ on 22 October, 2012 - 11:14

पंधरा दिवसांपूर्वी घरात एक छोटे मांजर आले. साधारण दोन एक महिन्याचे असावे. आमच्या पूर्वीच्या मांजराने नवा घरोबा केला असल्याने या नव्या जिवाला आनंदाने ठेऊन घेतले.

मांजर अगदी घरचेच झाले आहे. व्य्वस्थीत खाते, खेळते आणि माझ्याबरोबरच झोपते. स्वतःची स्वच्छ्तही छान राखते. घरच्या एका कोपर्‍यात त्याने त्याची सोयही केलेली आहे. इतरत्र कोठे घाण करत नाही.

हे ते आमचे गोड बाळ...

IMG0009A.jpg

काल मात्र या मांजराने एक नवाच पराक्रम केला. दुपारच्या वेळी त्याने घशातून चित्र विचित्र आवाज काढायला सुरुवात केली. जोरजोराने आचके दिले आणि खिडकीतून बाहेर त्याला ठेवायच्या आतच भक्कन उलटी करुन ते मोकळे झाले.

टिपिकल अ‍ॅसिडिक गंध दरवळला.. डॉक्टर मंडळीना हा गंध नवा नाही.

आणि त्याने जे काही ओकले, ते बघताच मलाच उलटी आल्यासारखे वाटले.

त्यात एक मोठा जंत वळवळत होता. !!!!!! नेमॅटोड जातीचा मोठा जिवंत जंत !!! डॉक्टरी शिकताना असले अनेक विविध जंत बाटलीत पाहिले होते. पण जिवंत नेम्याटोड - तोही तोंडातून बाहेर आलेला प्रथमच पाहिला आणि धन्य झालो. जंत शक्यतो खालच्या मार्गाने बाहेर जातात.. पण अगदी क्वचित, उलटा प्रवास म्हणजे रिट्रोग्रेड जर्नी करून तोंडातूनही बाहेर पडू शकतात.

एव्हाना त्याचे आचकेही कमी झाले होते. त्याला खिडकीतून बाहेर ठेवले, नंतरची उलटी त्याने बाहेरच केली.

जंत मात्र घरातच होता. एका अपृष्ठवंशीय - अंडज प्राण्याने दोन पृष्ठवंशीय- सस्तन प्राण्यांचे प्राण कंठाशी आणले. !!! Proud जंत काही क्षणातच मेला, मग त्यालाही बाहेर टाकले.

नंतर काही वेळाने नेहमीच्या कोपर्‍यात आणखी दोन जंत मिळाले! Sad तेही टाकले. सध्या मांजर व्यवस्थीत आहे. ( ?)

या प्रकाराने मी मात्र सुन्न झालो. माणसामध्ये लहान बाळात एक वर्षापर्यंत जंत होत नाहीत. कारण माणसाचे बाळ मातीच्या संपर्कात नसते... पण मांजराची ( कुत्र्याची आई ) मात्र मातीत फिरणार आणि नंतर पिल्ले तिला चाटणार ! त्यामुळे प्राण्याम्मध्ये मात्र सहा महिन्यांच्या आतच ( तेही बहुतेक सर्वच पिलांमध्ये !!!!!! ) जंत आढळतात, असे गुगलबुवाने सांगितले.

मांजराबरोबरच आता मलाही ट्रीटमेंट घेणे गरजेचे आहे. स्वतःसाठी एक अल्बेन्ड्याझोल टेब्लेट पुरेशी आहे.

पण मांजराचं काय करु?? पाव किलो वजनाचे, ३ महिन्याचे ते बाळ !!! त्याला कोणते जंत नाशक वापरू??? घरात कुत्रा, मांजर असलेल्या सर्वच लोकानी प्राणी आणि घरचे लोक याना नियमित जंतनाशक देणे आवश्यक आहे. याबाबत कुणाचे काही अनुभव आहेत का???

लक्षात ठेवा, जंताची अंडी मातीत वर्षानुवर्षे रहातात... मांजर, कुत्रे यांची घाण त्वरीत काढून टाकणे आणि तिथे एखादे जंतुनाशक टाकणे, आवश्यक आहे. ( पण जंताची अंडी बहुतांश जंतुनाशक औषधानी मरत नाहीत, हेही खरेच आहे! Sad )

nematode.jpg

जंताचे चित्र गुगलवरून घेतले आहे.

घरच्या कुत्र्या मांजरांची काळजी असा एक विभाग सुरु करावा. याच धाग्यावर चर्चा केलीत तरी चालेल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जंताच्या औषधाचा आणि वजनाचा फारसा संबंध नसतो. कारण ही औषधे आतड्यातच रहातात, शरीरात शोशली जात नाहीत, आणि नंतर तशीच बाहेर निघून जातात.

माणसाला जंताचे पातळ औषध १० मिलि असते... याला ५ मिलि देऊन बघतो.

इथे, कुत्र मांजरे पाळ णार्‍या लोकांपकी कुणीच प्राण्याना औषधे, इंजेक्शने देत नाहीत का?

जंतांसाठीच... शहरात प्राण्यांचे दवाखाने असतील, त्या डॉक्टरांचे कुत्र्यामांजरांसाठी काहीतरी डोस शेड्युल असेल की... खेड्यात मांजरांचा डॉक्टर कुठून आणायचा?? Sad

प्राण्यांचे डॉक्टर्स असतात ते देता. दर ३ महिन्यांनी कुत्र्यांना देतात. नॉर्मल जंतांचे औषध, वजनानुसार.

मी तीन दिवस लागोपाठ एक चमचा द्यायचो पूर्ण वाढलेल्या कुत्र्याला.

ईन्जेक्शन मांडीवर शीरेत दिलात तरी चालेल.

आंबोबा,
अँटीहेल्मेंथिक्स ल्युमिनल आहेत.
मांजराचा टोटल लाईफस्पॅन पहाता ४ महिने = किती ह्यूमन इयर्स?

फुल डोस द्या.

डॉक्टरकडे मांजरेही डिवॉर्म करुन मिळतात. माझ्या मांजराचे करुन आणायला हवे आता. सहा महिन्याचा झालाय तो.

लक्षात ठेवा, जंताची अंडी मातीत वर्षानुवर्षे रहातात... मांजर, कुत्रे यांची घाण त्वरीत काढून टाकणे आणि तिथे एखादे जंतुनाशक टाकणे, आवश्यक आहे. ( पण जंताची अंडी बहुतांश जंतुनाशक औषधानी मरत नाहीत, हेही खरेच आहे! )

माझा बोका बागेतल्या कुंड्यांमध्ये घाण करतो. त्याला रोज एक नविन कुंडी लागते. आता मी कुंड्यांमधली माती वगैरे बदलताना काय करु? ग्लोव्हज घालुन काम करावे काय???

आंबा, बाळ फारच गोड आहे Happy

आणखी एक - तुम्ही घरातले सगळेच एकदा योग्य त्या अ‍ॅन्टी रेबिज कन्सल्टन्टशी भेटून इंजेक्शनसचा बेसिक कोर्स करून घ्या. कारण भारत हा अतिशय रेबिज प्रोन देशांमधे मोडतो. आणि पाळीव कुत्र्यांपेक्षा पाळीव मांजरांकडून होणं जास्त शक्य असतं कारण मांजरं कुठेही भटकतात (इति आमचे फॅमिली डॉ़, व्हेट आणि अ‍ॅन्टी रेबिज कन्सल्टन्ट) तेव्हा मांजरांना वर्षातून काय औषधं, इंजेक्शन्स दिली असली तरी स्वतःही घ्यावीत. अनेकवेळा मुद्दाम म्हणून नाही पण खेळताखेळता मांजराची नखं लागून रक्त येतं किंवा ओचकारे उठतात. एकदा कोर्स केला की ३-४ वर्षं बघायला नको.
पण आपल्याकडे बरेच वेळा अर्धवट माहितीवर ही इंजेक्शन्स दिली जातात (त्याचे डोस ठरवले जातात) तेव्हा एखाद्या स्पेशालिस्टकडे जाऊन हे विचारून घ्यावे. आम्ही असले अर्धवट डोस घेऊन मग नंतर (फॅमिली डॉकनेच नंतर रीफर केलं) स्पेशालिस्ट कडे जाऊन शहाणे झालोत.

आणखी एक आगाऊ सल्ला - बाळ लहान आहे तोवर जमलं तर पाण्याची सवय लावा. म्हणजे नंतर अधून मधून ओला टॉवेल आणि थोडा डेटॉल, माईल्ड शॅम्पू यांनी घासपूस करायला बरं पडतं. नाहीतर दुनियेभरच्या धुळीत, घाणीत लोळून ती मांजरं घरात जिथेतिथे पसरतात.... सध्या आमच्या घरातल्या बोक्याची आंघोळ शेड्यूलवर आहे Happy

वरदा, अनुमोदन. काही पॉईन्टस् मध्ये मतभिन्नता

१. अ‍ॅन्टीरेबीज दरवर्षी द्यावं लागतं
२. त्याशिवाय ९ इन १ हे जनावरांना होणारे रोग टाळण्यासाठी वर्षातून एकदा जनावरांना द्यावे.