गेल्या आठवड्यात माझा नवरा ताप, कॉन्स्टिपेशन आणि पित्त, घशाला इन्फेक्शन अशा त्रासाने आजारी पडला. २-३ रात्री सलग जागरण (पहाटेपर्यंत) करून केलेलं ऑफिसवर्क, सतत बदलणारी हवा, जेवणाच्या थोड्या बदललेल्या वेळा...
ऑफिसमधे गुरुवारी सकाळपासून अखंड उचकी, त्यामुळी जास्ती प्यायलं गेलेलं पाणी, मग भूक न लागणं आणि सन्ध्याकाळपर्यंत घसा खवखवणं, थोडी कणकण असं सगळं सुरु होऊन तो घरी आला तेव्हा प्रचंड थकलेला दिसत होता. शुक्रवारपासून तापच आला.
मग औषधं वगैरे होतीच, पण या काळात त्याला योग्य जेवण देणं महत्त्वाचं होतं. पित्तामुळे थोडं फिकं, घशाला आराम पडेल असं लिक्विड जास्त, आणि कॉन्स्टिपेशन वर उपाय होईल असं...
भावनिक बुध्दयांक......
कुठे लिहावे ते समजेना म्हणुन या पानावर देत आहे. अयोग्य असेल तर सांगावे.
.
.
माबोकरांनो मला भावनिक बुध्दयांका(EQ) बद्दल जाणुन घ्यायचे आहे. पेपरमधे व इतर चर्चेत अॅकेड्मीक हुशारीपेक्षाही EQ ला जास्त महत्व आहे असे वाचण्यात ऐकण्यात आले होते. त्यासाठी मी एक इंग्रजीमधे पुस्तक आणले वाचले पण ते जास्तकाही कळले नाही.
अॅकेडमिक रेकॉर्ड एकदम एक्सलंट असतानाही मला करिअर मधे पाहीजे तसे यश मिळाले नाही असे मला दिड तपानंतरही वाटते. कुठे मुलाखतीला गेल्यावर मला खुप टेंशन येते.भीती वाटते.
आणि मग रिजेक्शन.....
श्रेयअव्हेरः हे लिखाण वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही. ह्या माहितीचा उपयोग सामान्यज्ञानापलीकडे करू नये. व्यक्तीपरत्वे वैद्यकीय चिकित्सा करवून घेऊनच उपचार घ्यावेत. हा लेख औषधोपचार अथवा आहारविषयक मार्गदर्शक सल्ला देणारा लेख नाही. माझी तशी वैद्यकीय पात्रता नाही. हे लेख ही माझीच अभिव्यक्ती आहे. इथे व्यक्त झालेली माहीती ही कुठल्याही पुस्तकाचे आधारे लिहावी असे प्रयोजन नाही. हे संदर्भलेखन नाही.
श्रेयअव्हेरः हे लिखाण वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही. ह्या माहितीचा उपयोग सामान्यज्ञानापलीकडे करू नये. व्यक्तीपरत्वे वैद्यकीय चिकित्सा करवून घेऊनच उपचार घ्यावेत. हा लेख औषधोपचार अथवा आहार विषयक मार्गदर्शक सल्ला देणारा लेख नाही. माझी तशी वैद्यकीय पात्रता नाही. हे लेख ही माझीच अभिव्यक्ती आहे. इथे व्यक्त झालेली माहीती ही कुठल्याही पुस्तकाचे आधारे लिहावी असे प्रयोजन नाही. हे संदर्भलेखन नाही.
स्वाईन फ्लू ची लस मुलांना द्यावी का ?
लसीचा effectiveness कसा आहे, लसीच्या short term/long term रिआक्शन काय आहेत ?
संबधीत जाणकारांनी आपले प्रतिसाद द्यावेत -
नमस्कार,
माझी डॉक्टर मैत्रिण( M.D.) भारतामध्ये गेले ४-५ वर्षांपासून काम/प्रॅक्टीस करत आहे. तिला अमेरिकेमध्ये येऊन काम करण्याची इच्छा आहे.
त्यासाठी काय करावे लागेल याची कोणाला माहिती आहे का? काही टेस्ट्स, परिक्षा असल्यास तिची द्यायची तयारी आहे. कृपया मार्गदर्शन करावे.
माझ्या आईला पाठीवर एक गाठ आलीय. जे.जे. ला चेक केलं. डॉक्टरने सांगितलं की ती चरबीची गाठ आहे. ऑपरेट करायची गरज नाहीय. चाळीशीनंतर येतात अश्या गाठी. काही उपाय माहीती आहेत का कोणाला ती गाठ जाण्यासाठी? शेकवलं की तात्पुरती जाते आणि नंतर परत दिसते ती.
समाधिननेन समस्तवासना ग्रन्थेर्विनाशोऽखिलकर्मनाशः |
अन्तर्बहि: सर्वत एव सर्वदा स्वरूपविस्फूर्तिरयत्नतः स्यात् || विवेक चूडामणि ३६४
या निर्विकल्प समाधीच्या योगाने, अंतःकरणांतील सर्व वासनारूप ग्रंथींचा नाश होतो आणि त्यापासून निर्माण होणार्या कर्माचा पूर्ण क्षय होतो. असे झाले म्हणजे, आत आणि बाहेर, दोन्ही प्रसंगी स्व-स्वरूपाचे स्फुरण सर्वदा प्रयत्न केल्यावाचून सहजपणे होऊ लागते.
॥ चतुर्थः कैवल्यपादः ॥
चवथा मोक्ष पाद सुरू होत आहे.
१. जन्मौषधिमन्त्रतपःसमाधिजाः सिद्धयः ।
विशिष्ट जन्म, दिव्य औषधी, भिन्न देवतांचे मंत्र, तपःसामर्थ्य आणि समाधी अशा पाचांपासून सिद्धी प्रकट होत असतात.