त्वचाविकार Eczema Atopic dermatitis

Submitted by टिकोजी on 1 August, 2012 - 13:21

कोणाला खात्रीशीर Eczema Atopic dermatitis या विकारावरील औषधांविषयी व घरगुती उपचारांविषयी माहिती आहे का ?

माझा ४ वर्षाच्या मुलाला लहानपणापासून हा विकार आहे. Eczema चा उद्रेक बर्याच कारणांनी होऊ शकतो. Allergy युक्त खाद्य पदार्थ हे एक कारण आहे, पण Eczema चा उद्रेक तापमानात बदल इ यांनीही होऊ शकतो. माझे लिहिण्याचे प्रमुख कारण फक्त Eczema ची माहिती देणे नाही तर त्यावरील घरगुती औषधांबद्दल माहिती गोळा करणे आहे. या विकारावर त्वचेवरून लावायची मलमे (Steroidal व इतर) मिळतात पण या औषधांचे खूप दुष्परिणाम आहेत (अंतर्जालावर अशी औषधे व दुष्परिणाम याची जंत्रीच आहे).

कोणी जाणकार पालक, वैद्य, आजी / आजोबा असतील तर कृपया माहिती द्या.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या विकारावर त्वचेवरून लावायची मलमे (Steroidal व इतर) मिळतात>> ही topical steroidal असतात ना ? त्यातला soft topical steroids बघा. prevention साठी ती न वापरता treatment साठी ती वापरावीत. Eczema आवाक्यात आला कि control therapy वापरून ज्या गोष्टींमूळे trigger होतोय त्या टाळणे हा एकमेव उपाय. घरगुती उपचारांची जी काहि माहिती मिळाली होती त्याने फारसा काही फरक पडला नाही. ते बहुतेक सगळे त्रास कमी व्हावा ह्यासाठी होते.

असामी धन्यवाद !

Dermitologyst ने सांगितलेली prescription Steroidal क्रेंस हि आता काम करेनाशी झाली आहेत. ४ वर्षांच्या मुलांना यापुढील ताकदीचे cream योग्य मानले जात नाही (इति dermitologists ). आम्ही trigger वर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवतो. मी घरगुती / गावठी / आयुर्वेद / homeopathy इ (non traditional ) उपचारावरील माहितीसाठी उत्सुक आहे.

वावावा!
फुकट ट्रीटमेंट
तीही स्टीरॉईड्स वापरायची
मग 'अ‍ॅलोपथीला साईड इफेक्ट' वाल्या बोंबा कुणी हो मारायच्या? असामी, असल्या ट्रीटमेंट आपल्या देशात कुणीही मेडीकल स्टोर्स वर जाऊन विकत आणू शकतो, हीच खरी शोकांतिका आहे.
कृपा करून पुन्हा स्टीरॉईड ट्रीटमेंट कुणालाच सांगू नका (unless you are qualified MCI recognised at least MBBS person) धन्यवाद!

असामी, असल्या ट्रीटमेंट आपल्या देशात कुणीही मेडीकल स्टोर्स वर जाऊन विकत आणू शकतो, हीच खरी शोकांतिका आहे.>> माझ्या माहितीप्रमाणे हि prescription drugs आहेत. मी सांगितल्यामूळे लोक लगेच आणायला धावतील इतकी दूधखूळी ती नसावीत एव्हढा संशयाचा फायदा त्यांना देऊ. फक्त अशी उपचार पद्धती आहे एव्हढी माहिती दिली होती. "Eczema आवाक्यात आला कि control therapy वापरून ज्या गोष्टींमूळे trigger होतोय त्या टाळणे हा एकमेव उपाय" हे वाक्य बघितलेलेत का ?

असामी जेव्हा ती स्टिर्~ओईड्स देतात तेव्हा (सांगितल्याप्रमाणे आणि तितकेच दिवस) लावायची..

वर वर्षे पाच पर्यंत बरेच विकार मूलाचं शरीर प्रतिकारशक्ती बिल्ड करत असतं...कदाचीत पाच नंतर जाईल. सध्या फ्रस्टेट न होणं हे इतकं तुम्ही करु शकलात तर फायद्याचं होईल.हे प्रचंड अवघड आहे हे निदान माझ्यासाठी मला वाटतं म्हणून लिहितेत....मी फ्रस्टेट न होणं हा प्रकार साधारण एक वर्ष केला आणि अर्र्थात डॉक्टरी सल्ले मानणं....एक्झेमा आता तरी नाहीये..
त्यावेळी भारतातल्या एका खूप चांगल्या पेडियास्ट्रिशियन ने एक लोशन दिलं होतं तुम्हाला मिळेल तर पहा त्यात कोरफड असतं......नाव आहे "ATOGLA" कुणालाही चालतं असं म्हणतात पण तुम्ही थोडं वापरून चालतं का ते कन्फर्म करा.

इथल्या (म्हणजे अमेरीकेतल्या) डॉ. चा सल्ला असा की लोशन्स म्हणजे अमेरिकेत मिळणारी बेबी स्कीन cream peksha use Vaseline हे इतरवेळी म्हणजे स्कीनला फायदा होतो..

मी दोन्ही वापरलं....नक्की कशाने गेलं/कमी झालं माहीत नाही पण तुम्ही जे काही वापरता ते त्यात्या स्कीनसाठी चाल्तं का हे थोडं वापरून कन्फर्म करा...माझ्या मुलाला खूप माइल्ड होता त्रास त्यामुळे तुमची केस कदाचीत वेगळी असू शकतात...

गुड लक. Happy

http://www.briaorganics.co.uk/eczema-products
हे युके मधलं घरगुती प्रॉड्क्ट आहे, पण आजकाल डॉक्टर्स कोरड्या त्वचा विकारांवर के वापरा असा सल्ला देतात.
यातले सगळे घटक नैसर्गिक आहेत, ते लावून पहाता येतिल किंवा युकेहून मागवता येइल.

http://www.myhomeremedies.com/topic.cgi?topicid=75
ह्या साइट्वर बर्‍याच लोकांनी त्यांना उपयोगी पडलेले घरगुती उपाय लिहिले आहेत.

मायबोलीवर जेव्हा जेव्हा विषय निघालाय ह्या आजाराचा तेव्हा तेव्हा लिहिलं आहे.
माझ्या मुलीला ती दोन वर्षाची असल्यापासून सहा वर्षाची होईपर्यंत सतत त्रास होता. देशाबाहेर असल्यामुळे सुरुवात अर्थातच टॉपिकल स्टेरॉईड्सने झाली. ओरल स्टेरॉईड्सही एक दीड वर्ष घेऊन झाली. काही काळाकरता पुण्यातील आयुर्वेदिक वैद्यांना दाखवून त्यांची ट्रिटमेंट घेतली पण उपयोग झाला नाही तेव्हा पुन्हा टॉपिकल स्टेरॉईड्सला स्विच केलं. अमेरिकेत आल्यापासून अजिबात त्रास नाही.

डिस्क्लेमरः मी एम्बीबीएस नाही. कोणती ही ट्रिटमेंट सुचवत नाही. फक्त आमच्याकरता काय उपयोगी पडलं एवढंच सांगायचा उद्देश आहे.

इब्लिस ना पुर्ण अनुमोदन...

बर्‍याच वेळा स्ट्रेस हा फॅक्टर अस्तो जो ट्रीगर असतो पण कळत नाही. Happy आता लहान मुलाला तो नसेलच असे काही नाही. तो व्यवस्थित शांत आणि पुर्ण वेळ झोपतो का? चिडचिड करतो का ते पण बघा.

इब्लिस, आमच्या एथे एक आर एम पी डॉ. कुठलेतरी स्टेरॉइड डायरेच्ट स्किन वर टोचतो.. म्हणजे बर्याच इन्फेक्टेड ठिकाणी, २५० रु घेतो आणि मग २-३ दिवसात सगळे क्लिअर होते. मग ती जागा कोड आल्या प्रमाणे पांढरी फटक होते. मग पेशंट दुसर्या डॉ. कडे जातो आणि मग १-२ वर्षात ती जागा बर्‍यापैकी अगोदर सारखी होते. (अगदी जवलच्या मित्राचा अनुभव)

वेका, अपर्णा, सायो, सर्वांना धन्यवाद. Eczema चे trigger बरेच आहेत, चर्चेत आल्या प्रमाणे स्ट्रेस, तापमानात फेरफार, आर्द्रतेत फेरफार, खाण्यातले पदार्थ इ इ.

ज्या मुलांना हा त्रास आहे त्यांच्या पालकांना फारच लक्ष ठेवावे लागते. काही trigger तुम्ही नियंत्रणात ठेऊ शकता, पण काही हाताबाहेरील आहेत.

कोरफड बद्दल लहानपणी खूप ऐकले आहे, ते जरूर बघीन.

भारतात Betnovet-N नावाचे एक मलम मिळते.हे दिवसातून २-३ वेळा लावल्यानन्तर ३-४ दिवसान्नी फरक दिसायला लागतो.या लोशनचे साईडइफेक्टस नाहित.काही दिवस वापरून बन्द करा व नन्तर परत त्रास सुरू होतोय का ते बघा.एक्झिमा प्राथमिक अवस्थेत असेल तर या लोशनने तो पुर्ण बन्द होइल.पण वापर बन्द केल्यावर काही दिवसान्नी परत त्रास होत असेल तर डोक्टरान्ना दाखवा.एक्झिमासाठी होमियोपथीचा खुप चान्गला उप्योग होतो.

आयृवेदिक तुलसी अर्क प्राशन केल्याने अश्या प्रकारच्या त्वचाविकारांवर नियंत्रण मिळवता येईल
या शिवाय याने
सर्दी, खोकला, डोकेदुखी, ताप इत्यादी आजारांमध्ये मदत होते
कॅन्सर च्या रुग्णांनी या तुलसी अर्काचे चे दोन थेंब ताका बरोबर सकाळ - संध्याकाळ प्राशन करावे
जेवण करताना फक्त दूध किंवा दही घाव्ये, ज्याने कॅन्सर च्या पेशी नष्ट होण्यास मदत होते.
या शिवाय जळले, छिलले, कापले, भाजले, खरचटले, विषारी कीटक दंश या सर्वांवर झटपट आराम मिळतो
केसगळती, केसांची वाढ न होणे, अकाली केस पिकणे, केसांमधे कोंडा होणे, या वर सुद्धा याचा उपयोग करता येतो.
कान दुखणे आणि कान प्रवाह या समस्या असतील तर या अर्काचा एक थेंब काना मधे घालणे
दात दुखणे, दातां मधे पोकळी निर्माण होणे, हिरड्यामधील रक्तस्त्राव इत्यादी समस्या असतील तर या तुलसी अर्काचे ४-५ थेंब कोमट पाण्यामध्ये टाकून दिवसातून दोन वेळा खळखळुण गुळण्या केल्याने आराम मिळतो
मुखदुर्गंधी ची समस्या असलेल्याने जेवण झाल्या नंतर या अर्काचे दोन थेंब प्राशन करावे
ज्यांना घसा दुखी किंवा अल्सर ची समस्या आहे त्यांनी या तुलसी अर्काचे ८-१० थेंब कोमट पाण्यामध्ये टाकून दिवसातून दोन वेळा खळखळुण गुळण्या केल्याने आराम मिळतो
या अर्काचे ८-१० थेंब तेला मधे टाकून रात्री झोपण्यापूर्वी शरीराला चोळावे, याने मच्छर चावण्या पासून आणि निद्रानाशा पासून आराम मिळेल
जर तुम्ही वॉटर कूलर वापरत असाल तर या अर्काचे ८-१० थेंब या मध्ये टाकावेत जेणेकरून तुमचे घर मच्छर मुक्त, स्वच्छ वातावरण, आणि जिवाणूं मुक्त राहील
या अर्काचे आणि लिंबाच्या रसाचे समान मिश्रण करून ते केसांच्या मुळा पर्यंत पोहचेल अश्या प्रकारे लावणे व ३ तासांनी केस स्वच्छ धुणे, जेणे करून केस स्वच्छ होऊन उवा लिकां पासून मुक्त होतील
या अर्काच्या नियमित सेवनाने कोलेस्ट्रॉल पातळी राखण्यासाठी मदत होते, रक्ताच्या गाठी कमी होण्यास मदत होते, हृदय स्ट्रोक प्रतिबंधित करते
या अर्काचे ८-१० थेंब अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्याने त्वचा समस्या कमी होण्यास आणि ताण तणाव कमी होण्यास उपयोग होतो
या अर्काचे २ थेंब त्वचेसाठी असलेल्या जेल मध्ये टाकून सकाळ - संध्याकाळ चेहऱ्या वर लावावे जेणे करून त्वचा सुंदर होऊन चेहऱ्यावरील pimples, wrinkles, spots, डोळ्या खालची काळी वर्तुळे, काळे डाग, मुरूम, पुळी, पुटकुळी, नायटा, सुरमा, सुरकुत्या कमी होण्यास उपयोग होतो

तुलसी अर्क हवा असल्यास - संपर्क - ९८२२५१३४५२, ९६८९८६५७७२, 9822513452, 9689865772