डॉक्टरचे हस्ताक्षर !!

Submitted by डांबिस on 7 September, 2012 - 03:39

हा विनोदी लेख नाही !!!

डॉक्टर ने प्रिस्क्रिप्शन लिहीताना कॅपिटल लेटरचाच वापर करावा अस आवाहन सरकारने केले आहे.

ही म टा मधिल बातमी आहे,
लिंकः http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/16288855.cms

चुकीची औषधे घेऊन अमेरीकेत दरवर्षी सात हजार लोक मरण पावतात !
आरोग्य सेवेतील चुकांमुळे जगभरात डॉक्टर व वैद्यकीय संस्थांना वर्षाकाठी २९ अब्ज डॉलर्सचा भुर्दंड पडला आहे.
' वर्ल्ड हेल्थ असेंब्ली ने २००२मध्येच ठराव करून आरोग्य सेवांमधील चुका टाळण्याकरिता करायच्या उपाययोजनेची जंत्री जारी केली आहे.

खराब हस्ताक्षर असलेली मुले हमखास डॉक्टर होतात , असा प्रवाद किंवा विनोद आहे.
मात्र आता या प्रवादाला धक्का लावत महाराष्ट्रातील डॉक्टरांना त्यांचे हस्ताक्षर सुधारावे लागणार असून प्रिस्क्रिप्शन कॅपिटल लेटरमध्ये लिहिण्याचे बंधन कर्नाटक व गोव्यातील डॉक्टरांप्रमाणे स्वतःवर घालून घ्यावे लागणार आहे. प्रिस्क्रिप्शन कॅपिटल लेटरमध्येच लिहिण्याबाबत महाराष्ट्रातील डॉक्टरांच्या मेडिकल कौन्सिलने पुढाकार घ्यावा , असे आवाहन आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी केले आहे.

डॉक्टरांचे अक्षर समजत नाही म्हणून चुकीचे औषध देण्याचे व त्यामुळे पेशंटच्या जिवावर बेतण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे कर्नाटक मेडिकल कौन्सिलने २४ ऑगस्ट २०१२ रोजी ठराव करून त्यांच्याकडे नोंदणी केलेल्या ९६ हजार ९२० डॉक्टरांना कॅपिटल लेटरमध्ये प्रिस्क्रिप्शन देण्याचे बंधन घातले. महाराष्ट्रातील डॉक्टरांच्या मेडिकल कौन्सिलने याकरिता पुढाकार घ्यावा , असे आवाहन आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी केले आहे. चेंबूरमधील २०० डॉक्टरांनी त्यांच्या बैठकीत कर्नाटकमधील डॉक्टरांचे अनुकरण करण्याचे ठरवले असल्याचेही शेट्टी यांनी सांगितले. गोव्यातील मेडिकल कौन्सिलनेही डॉक्टरांनी आपल्या चुका टाळण्याकरिता कोणती खबरदारी घ्यावी , याची आचारसंहिता तयार केली असून प्रिस्क्रिप्शन स्वच्छ व शुद्ध हस्ताक्षरात लिहिणे डॉक्टरांवर बंधनकारक केले आहे.

महाराष्ट्रात डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनमधील हस्ताक्षरामुळे चुकीचे औषध घेतल्यामुळे किंवा नर्सने भलतेच इंजेक्शन दिल्यामुळे किती पेशंट दगावले , याची आकडेवारी उपलब्ध नाही. मात्र महाराष्ट्रातील डॉक्टरांच्या हस्ताक्षरावर शस्त्रक्रिया करण्याची वेळ आल्याचे आरोग्य खात्याचे म्हणणे आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कधी कधी डॉक्टरांना औषधाच्या नावाचे पूर्ण स्पेलिंग माहीत नसते, म्हणून ते असे लिहितात ( असे एका डॉक्टरनेच कबूल केले होते.) केमिस्टला खात्री नसेल तर तो डॉक्टरला फोन करुन विचारु शकतो.
अर्थात सुवाच्या अक्षरात लिहिण्याची सक्ती झाली आणि त्यापेक्षा जर टाईप करुनच दिले तर जास्त चांगले.

आमच्या इकडे एका डॉ नी कॉम्पुटराइज्ड सिस्टीम केली आहे.
त्यामुळे प्रिन्ट येते. तीच फाइलला लावली जाते आणि फाइल पेशंटकडे. (ओपीडी पेशंटला सुद्धा)
त्यामुळे हस्ताक्षराच टेन्शन नाही.

अवांतर : मला वाटल होत की डॉ च हस्ताक्षर म्हणुन तुम्ही स्वतःच्या हस्ताक्षरातील लिहिलेली एखादी गोष्टच स्कॅन केलीये की काय. Happy

माझ्या मुलाच्या डॉक्टरचे हस्ताक्षर चांगले आहे. मी देखील वाचु शकतो. (हा जोक नाहिये :))
बायकोला ट्रीटमेन्ट सुरु होती त्या गायनॅक डॉ चे अक्षर खुपच छान होते. त्या प्रिस्क्रिप्शन लिहुन देताना देखील कंटाळा न करता छान अक्षरातच देत असतं.

माझा बॉस डॉक्टर नाही पण त्याचं अक्षर त्यालाच लागत नाही Lol
मी नेहमी त्याला विचारते तुम्ही आयटीत कसे आला? डॉक्टर एकदम पर्फेक्ट झाला असतात.. असो...

मी आत्तापर्यंत भेटलेल्या सर्व डॉक्टरांचं अक्षर बरं आहे. निदान वाचता तरी येतं... अगदी सुंदर नसलं तरी.

चांगला विचार!
मी टाईप केलेले प्रिंटेड प्रिस्क्रिपशनच देते.
मी कर्नाटकातच करते प्रॅक्टिस पण अजून इथल्या आय एम एच्या ब्रँचने प्रिस्क्रीप्शनची काहीच गाईडलाईन दिलेली नाही.

अरे माझे तर कEपिटल अक्षरही खराबच येते. आता झाली का पंचाईत??बाकी स्पेलिंगचाच प्रॉब्लेम नाही तर कधीकधी रोगाची आणि औषधांची नाव फ़ार मोठी असतात त्यामुळे लिहायचा कंटाळा येतो.शिवाय कितीवेळा तेच तेच लिहावे लागते त्यामुळे त्याचाही कंटाळा येतो.त्यामुळे अक्षर खराब येते.माझेही अक्षर मलाच बर्‍याचदा कळत नाही.बर्‍याचदा मी हळुहळु प्रयत्न करुन सुवाक्षर काढले तरीही लोक नाकं मुरडतात,च्युक च्युक करतात त्याने डोके फ़िरते.

माझ्या ओळखीतल्या एका डॉक्टरांचे अक्षर छपाई केल्यासारखे सुंदर आहे. इंग्रजी व मराठीसुद्धा. मला फार हेवा वाटतो त्यांचा. Happy

माझं अक्षर सुंदर आहे की नाही हे माहीत नाही, पण सुवाच्य नक्कीच आहे. त्यावरून अनेकदा "तू डॉक्टर कशी झालीस गं ?" असे टोमणे ऐकून घेतले आहेत.
(आणि एकच हॅमरिंग पुन्हा-पुन्हा झालं की आपल्यालाही ते खरंच वाटू लागतं, त्यामुळे मधल्या काळात जाणीवपूर्वक खराब हस्ताक्षर काढू लागले होते :हाहा:)

chinya1985,
बाकी स्पेलिंगचाच प्रॉब्लेम नाही तर कधीकधी रोगाची आणि औषधांची नाव फ़ार मोठी असतात त्यामुळे लिहायचा कंटाळा येतो.शिवाय कितीवेळा तेच तेच लिहावे लागते त्यामुळे त्याचाही कंटाळा येतो.
>>>>
तुम्ही डॉक्टर आहात?? मग असे नका म्हणु हो... स्पेलिंगचा प्रॉब्लेम असेल तर कधी देवनागरी मधुनही नाव लिहिले एका बाजुला तर चालेल की!

माझा आताचाचं अनुभव आहे, कधी कधी आजारी व्यक्तीला डॉक कडे घेउन जाणारी व्यक्ती आणि औषधे देणारी व्यक्ती वेगळी असते, तेव्हा एका वेळी ४ -५ गोळ्या द्यायच्या असतील तर खुप गोंधळ होतो आणि बरेचदा सकाळी, रात्री , जेवल्यावर की जेवण्याच्या आधी हे सुद्धा नीट लिहिलेले नसते मग औषधं देताना जरा टेन्शनच येतं.

रोगाची नावे प्रिस्किप्शनमध्ये लिहितात ? >>
हो लिहितात ना. रोगाचं निदान लिहिणं खरंतर आवश्यक आहे, पण काहीजणांकडून लिहिलं जात नाही.

बाजो... जर योग्य पद्धत बघितली तर कधी तपासले ती वेळ, तेव्हाचे वजन, बीपी, होणारा त्रास, त्यावरुन डॉक्टरने काढलेला निष्कर्ष, पुढील भेटीची तारीख आणि वेळ, औषधे घेण्याच्या वेळा.. हे सगळे लिहिले पाहिजे.. आणि पुढच्या वेळी येताना हे प्रिस्क्रीप्शन कंपल्सरी आणणे असेही लिहिले पाहिजे. जेणेकरुन तोच पेशन्ट परत आल्यावर निम्म्यापेक्षा कमी वेळात तपासणी होणे शक्य आहे..

आमचे फॅमिली डॉकच्या प्रिस्क्रीपशन वर ह्या सगळ्या गोष्टी असतात.. त्याचा त्यांना तसेच पेशंटला दोघांनाही उपयोग होतो. आमचे डॉक तर गोळी किती वाजता घ्यायची तेही लिहितात..

असे होते पण औषध परत डॉ. ला दाखवता येते. पण तेवढा वेळ नसतो परत डॉ. कडे औषध घेऊन यामुळे असे होते.

वाचकहो,

एक कल्पना मनी आली. औषधाच्या प्रत्येक बाटली वा पुडक्यावर रेखासंकेत (बारकोड) टाकला पाहिजे. सोबत एकदाही लिहिला पाहिजे. जेणेकरून दूरभाषे विचारता येऊ शकेल.

जर फिरस्ते (मोबाईल फोन) भारतातल्या घराघरात पोहोचू शकतात, तर ही औषधनोंदप्रणाली उभारणे अवघड नसावे.

आ.न.,
-गा.पै.

हिम्सकूल. बरोबर.
हे सगळं माझ्याकडे असतंच. Happy

शिवाय गोळ्या आणल्यावर त्या डॉ ने स्वतः पेशंटला एक्सप्लेन केल्या पाहिजेत कंपाउंडरवर सोडू नये.

माझ्या वडलांना शाळेत सुंदर हस्ताक्षराचं बक्षीस मिळालं होतं. ते डॉक्टर आहेत. त्यांचं आताचं अक्षर बघून हे इंग्रजीत लिहिलंय का मराठीत यावर सुद्धा एकमत होत नाही आमचं. त्यांचं प्रिस्क्रिप्शन वाचू शकणार्‍या कंपाऊंडरविषयी नितांत आदर आहे त्यामुळे Happy

साती,

एकदा मी औषध विकत घेतलं की मग मला दूरभाष करून डॉक्टरास केवळ आकडा सांगता येईल. किंवा शिफारसपत्रात डॉक्टर सरळ औषधाचा आकडाच लिहितील.

आ.न.,
-गा.पै.

भारतात किती डॉक्टर पेशंटचे फोन उचलतात?:)
काही क्वॅक्स किंवा खूपच सस्पिशीयस औषधे ठेवणारे डॉक्टर ?
असं नंबरिंग करतात औषधाचं. पण ते काही खरं नाही.
तसेच तुम्हाला जर असे वाटत असेल की प्रत्येक औशध एकाच प्रमाणित डोसात भारतभर सगळ्याच रोग्याना देतात तर असे नाही. व्यक्तीनुसार गोळ्यांचे डोस बदलतात.
त्यामुळे बाटलीवरचा नंबर पेशंटने फोन करून कळवला तर डॉ केवळ बारकोडवरून योग्य डोस सांगेल असे नाहि.

गा पै,

बारकोडचे अनंत उपयोग आहेत. डॉक्टरांनाही त्याचा चांगला उपयोग होऊ शकेल.

प्रत्येक औषधाला स्वतंत्र बारकोड ( हे असेही अगोदर दिले गेलेले असतात) चा वापर करून डॉक्टर प्रिस्क्रिपशन
हाताने न लिहिता संगणका व्दारे देऊ शकेल.
डॉक्टरानी पेशंटला दिलेल्या औषधाच्या संबंधीत बारकोड वर स्कॅन केले तर त्यांचा संगणक
आपसुकच औषधाचे नाव प्रींट करेल. त्या औषधाच्या नावाबरोबरच बारकोड ही प्रिंट केल्याने मेडिकल स्टोरलाही
बरोबर औषध काही चुक न होता देता येईल.

त्या शिवाय डॉ क्टरांनी त्यांच्या कडे येणार्या प्रत्येक पेशंटला ही एक बारकोड असाईन केला व तो त्या पेशंटच्या
फाईलला लावला म्हणजे सर्व माहीती संगणकात कमीत कमी श्रमात संम्मिलित करून घेता येईल.

त्या शिवाय डॉ क्टरांनी त्यांच्या कडे येणार्या प्रत्येक पेशंटला ही एक बारकोड असाईन केला व तो त्या पेशंटच्या
फाईलला लावला म्हणजे सर्व माहीती संगणकात कमीत कमी श्रमात संम्मिलित करून घेता येईल.

विवेक,
ही सुबिधा सध्या माझ्यासह बर्याच डॉक्टरांकडे उपलब्ध आहे.

पण औशधांचे बारकोड मी वर म्हटलेल्या कारणांमुळे शक्य नाही.

साती,

औषधांचं रेखासंकेत (बारकोड) आणि अंकप्रमाणन करण्यामागचा प्रमुख उद्देश उपचारकर्ता आणि रुग्ण यांतील संवाद सुलभ करण्याचा आहे. तसेच उपचाराच्या रुग्णाकडील नोंदी अचूक व्हाव्यात हाही असू शकतो.

यात अडचणी असणारच. मात्र प्रमाणन केलेले बरे पडेल असे वाटते. औषधयोजनेत कुठे चूक झाल्यास ती लवकर सापडण्याची शक्यता जास्त असेल.

हे अर्थात माझं ठोकळेबाज गृहीतक आहे. आपला अनुभव आणि शिक्षणायोगे आपण अधिक प्रकाश टाकू शकता! Happy

आ.न.,
-गा.पै.

तुम्ही डॉक्टर आहात?? मग असे नका म्हणु हो... स्पेलिंगचा प्रॉब्लेम असेल तर कधी देवनागरी मधुनही नाव लिहिले एका बाजुला तर चालेल की!
हो मी डॉक्टर आहे.खरतर प्रॉब्लेम हा आहे की आम्ही ब्रिटीश आणि अमेरीकन दोन्हीही पुस्तक रेफ़रंस बुक म्हणुन वापरतो.त्यामध्ये बर्‍याचदा स्पेलिMग वेगवेगळे असतात.त्यामुळे लिहिताना कुठल स्पेलिMग लिहाव याबद्दल कन्फ़ुजन होत.

बाकी क्वेक्स्ननी अक्षर तरी चाMगल काढाव. डॉक्तरी शिकता नाही आली कमित कमी अक्षरतरी शिका म्हणाव

माझ अक्षर पुर्वीपासुनच खराब होत पण हळुहळु अजुनच खराब होत चालल आहे.

बाकी बारकोड वगैरे हळुहळु येउ लागल आहे

बारकोडचे कळले नाही. म्हणजे जर २ लाख औषधे अस्तित्वात असतील तर डॉक्टरांनी २लाख बारकोड पण पाठ करायचे की काय? तसे असेल तर अवघड नाही का? डॉ. लोक म्हणतील अक्षर सुधारतो पण बारकोड आवरा.

सुनिधी,

जगात जिथेजिथे म्हणून बारकोड वापरले जातात तिथे कुठेही पाठ केले जात नाहीत! Happy बारकोडाच्या खाली एक आकडाही छापलेला असतो. तो आकडा फोनवरून डॉक्टरास सांगून औषधाची खातरजमा करता येईल. हा औषध प्रमाणनाचा एक उपयोग आहे. इतरही अनेक आहेत. तसंही औषधांचं प्रमाणन केलेलं बरं.

आ.न.,
-गा.पै.

अहो पण बारकोड डॉक्टरला फोनवरुन सांगितला तर तो बरोबर आहे हे कळण्यासाठी डॉक्टरला तो पाठ करावाच लागेल ना???शिवाय या फोनाफोनीच बिल कोण देणार??

chinya1985,

डॉक्टरकडे बारकोड डायरेक्टरी असेल असं गृहीत धरलं आहे. फोनाफोनीचा खर्च फोन लावणार्‍याने करायचा आहे. Happy बाजारातून औषध विकत घेऊन परत डॉक्टरला दाखवावे लागते. हा खटाटोप टाळण्यासाठी प्रमाणानाचा उपयोग होऊ शकेल. हा एकमेव उपयोग नाही.

आ.न.,
-गा.पै.

Pages