हा धागा मी उघडेन असे कधी वाटले नव्हते. मी टिटोटलर झालो आणि बरेच दिवस काहीच घेतले नाही .
अजूनही दारू घेणार नाही यावर ठाम आहे. लॉकडाउन मध्ये घरी तुम्ही कोणकोणती मॉकटेल्स बनवताय यावर चर्चा करायला हा धागा.
मॉकटेल म्हणजे कॉकटेल नव्हे, त्यामुळे फक्त नॉन अल्कोहोलिक मॉकटेल्स बद्धल शेयर करूया |
गेले काही दिवस मी उष्णतेच्या आजाराने त्रस्त आहे. उष्णतेचा दाह फक्त तळपायांना जास्त जाणवतो. डॊक्टरना विचारले पण दरवेळी डॊकटर गोळ्या देऊन परत पाठवतात. पण त्याने तितका फरक नाही पडत. पायात दिवसभर शुज असतात. तळपायाची जळजळ होत असली की तात्पुरता हापिसाच्या पार्किंग मधे जाऊन पाय धुवुन येतो. असे दिवसातुन तीन चार वेळा तरी. रस्त्यातुन चालताना अचानक पायाची जळजळ चालु होते. आणि चालणे मुश्कील होते. कधीकधी अनवाणी पायांनी चालाव अस वाटत. इतका त्रास होतो. मध्यंतरी कोल्हापुरी चप्पल घेतलेली. पण हापिसात घालुन जाणं ऒकवर्ड वाटत.
नोटबंदीबद्दलची चपराक अजूनही हुळहुळत असतानाच पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाने हायवेवरील दारूबंदीसंदर्भात नवी चपराक दिलेली आहे
(कुणाला, ते विचारू नका.)
हायवेपासून ५०० मीटरपर्यंतच्या अंतरापर्यंद दारू दुकाने नकोत, असा आदेश दिल्यानंतर देशातील जनादेशप्राप्त पापिलवार भगव्या सरकारांनी ताबडतोब शहरातले महामार्ग मुन्शिपाल्ट्यांकडे हस्तांतरीत केले. हे करताना कुणी किती मलिदा कसा खाल्ला, याच्या चर्चा फारच चविष्ट आहेत.
दादर माटुंगा बांद्रा माहिम या परिसरातील समुपदेशकांबद्दल माहिती हवी आहे. जवळच्या नात्यातील एका व्यक्तीला डिप्रेशन सिंड्रोम्स दिसत आहेत. कृपया कोणाला एखाद्या चांगल्या समुपदेशकाबद्दल माहिती असल्यास सांगा. धन्यवाद.
चांगला चष्मा लाऊन मी एक्सपायरी डेट पहात होतो. अस वाटल एक भिंग लावाव मग कुठे दिसेल. जी माहिती ग्राहक म्हणुन तुम्हाला हवी असते तीच नेमकी बारिकश्या अक्षरात लिहलेली असते अन्न पदार्थ आणि औषधावर.
जसा आरटीओ चा नंबर प्लेट काय साईझ मधे असावी, कोणत्या रंगात असावी याबाबत काही नियम आहेत म्हणतात तसे औषधे आणि अन्नपदार्थांच्या बाबतीत असतात का ?
जर असतील तर त्याचे पालन का होत नसावे ? आणि नसतील तर ग्राहकांनी आग्रह धरावा का या बाबतची मते जाणुन घेण्यास मी उत्सुक आहे.
नमस्कार
वेगळ्या धाग्यावर पुणे शहरातील डॉक्टर्सची अत्यंत उपयुक्त माहिती मिळतेय, पण पिं.चिं. / पिंपळे सौदागर/ वाकड/निगडी/ आकुर्डी येथील डॉक्टर्सची माहिती मिळत नाहीये.
या धाग्यावर आपण पिंपरी / चिंचवड / पिंपळे सौदागर / पिंपळे निलख/ वाकड / निगडी / आकुर्डी / चिखली / मोशी मधील चांगल्या डॉक्टरांबद्दल जितके माहितीवर्धक लिहिता येईल तेवढी माहिती लिहूया. त्यांचा फोन क्रमांक, पत्ता, कशासाठी प्रसिद्ध, त्यांच्या कामाच्या वेळा, आलेला अनुभव इत्यादी.
बंगळुरुतले चांगले डॉक्टर (व्यक्ती म्हणुन + व्यवसायाने) आणि वैद्यकीय सेवाभावी संस्था यांची यादी.
नाव, गाव, पत्ता, वेळ, स्पेशलायझेशन, पॅथी.