विश्वरचना (भाग - 3 आणि भाग - 4)
भाग - 3
शी जिनपिंग, पुतीन, नरेंद्र मोदी, अमित शहा आणि इतर शंभर जगाला बनवू शकणाऱ्या शंभर लोकांची एक बैठक बोलवली गेली. बोलावलेलं प्रत्येक जण स्वतःच्या घरात बसलेला होता. या सर्वाना उद्देशून पुलम याने असे संगितले की काही दुष्ट प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी काही पावले उचलत आहोत. आम्हला तुम्ही अल्ला, देव, जीजस ख्राईस्ट काहीही म्हणा शेवटी आम्ही सगळे एकच आहोत आणि एका चागंल्या ग्रहाचे संपूर्ण वाटोळे करण्यात आम्हाला बरे वाटणार नाही. हवे असेल तर आम्ही काही क्षणात सर्व मानवजात नष्ट करू शकतो. परंतु तसे न करता आम्हाला सर्व सृष्टीच सुजलाम सुफलाम करायची आहे आणि त्याकरिता तुम्ही तुमच्या ताब्यातील प्रदेश आणि अधिकार यांचे जबाबदारीने पालन करा. तुमच्या मदतीला आम्ही ठीक ठिकाणी कार्यालय उघडून तेथे काही सहायक ठेवत आहोत. कोणत्याही अडचणीच्या वेळेला अथवा सल्ला मसलतीसाठी तुम्ही त्या कार्यालयाला मदत मागू शकता. या चौदा कार्यालयातून आमचे लाखाहून अधिक प्रतिनिधी जबाबदार असतील. आम्ही बऱ्याच मितीत व्यवस्थापन करू शकतॊ. तुम्हाला माहिती असलेल्या त्रिमिती प्रमाणे आम्हाला सत्तावीस मिती माहित आहेत. त्याचा एक परिणाम म्हणून आम्ही तुमच्या पैकी काही लोकांचे आयुष्य वाढवले आहे तर जवळ जवळ दोनशे कोटी लोकांचे आयुष्य कमी केले आहे. ही आपली बैठक संपल्यावर तुम्हला त्याचे अनुभव लगेचच बघावयास मिळतील. आपल्या या बैठकीसाठी कुठलेही कालाचे बंधन नाही. बैठक संपताच तुमच्या कालमापाप्रमाणे फक्त एक मिनिट संपलेले असेल.
पुलम पण एक स्वतंत्र बैठक घेत होता. बैठकीला सर्वेश, विकर्मा असे बरेच जण हजर होते. त्यात मानवांच्या मुख्य अडचणींविषयी मुद्दे ठरवण्यात आले.
1. जन्म मृत्यू
2. ऊर्जा निर्मिती आणि ऊर्जा संचय
3. अन्न उत्पादन आणि अन्नाची गुणवत्ता
या शिवाय प्रत्येक भागात किंवा देशात असलेले स्थानिक समस्या. त्यानंतर तासाभरातच अमेरिकेतील सर्व टी व्ही वरचे सर्व चॅनेल बंद होऊन तेथे एक आवाज येऊ लागला. नागरिक हो, तुमच्या राष्ट्राने आणि पुढाऱ्याने अक्षम्य अपराध केले आहेत त्यात शस्त्र अस्त्रांचा सामान्य जनतेवर परीक्षण करणे, काहीही कारण नसताना युद्ध लादणे, आणि स्वतःची अर्थव्यवस्था बळकट करण्याकरिता दुसऱ्यांची संस्कृती नष्ट करणे असे अक्षम्य अपराध आहेत. तुम्ही निवडलेल्या अध्यक्षाने तुमचीच लष्करी ताकद आणि लष्करी उत्पादने वापरून ही दुष्कृत्ये केली आहेत. ही करताना तुमच्या शस्त्र अस्त्रासाठी अधिक बाजारपेठ मिळावी असे स्वच्छ उद्दिष्ट आहे या शिवाय तुम्ही जगभर स्थापन केलेले बावीस लष्करी तळ आम्ही पूर्णतः नष्ट केले आहेत. तुमच्या राष्ट्रातले सर्व अण्वस्त्र आम्ही नष्ट केली आहेत आणि तुमच्या अणुभट्ट्या चालवण्यासाठी सुद्धा तुम्हला वार्षिक फी भरावी लागणार आहे आणि पुढील पाच वर्षातच या सर्व अणुभट्टी बंद करून तुम्हाला नैसर्गिक शक्तीवर जावे लागणार आहे. तुमच्या सेनेनी आणि अध्यक्षांनी केलेली इतर राष्ट्रांवरची मालकी आम्ही या क्षणापासून संपुष्टात आणत आहोत. आज मितीला आम्ही तुमच्या देशाच्या सर्व सरहद्दी पूर्णतः बंद केल्या आहेत. कोणत्याही प्रकारची शक्ती किंवा पदार्थ ही सरहद्द आम्ही परवानगी दिल्याशिवाय ओलांडू शकणार नाही.. त्यामुळे अर्थातच तुम्ही आयात निर्यात बंद पडेल.
अशा तर्हेचे भाषण इस्रायल नागरिकांना सुद्धा हिब्रू भाषेत ऐकवले गेले. पाकिस्तान आणि अफगाणिस्थान मध्ये त्यांच्या दहशदवादाचे हे परिणाम आहेत असे स्पष्टरित्या सांगितले गेले. भाषण संपताच अमेरिकेत निदर्शने होऊ लागली. पोलिसच नव्हे तर नॅशनल गार्ड्सना पण या दंगली आटोक्यात ठेवता येईनात. तीच स्थिती इस्रायल मध्ये ही झाली. पाकिस्तानात त्यांच्या अतिरेक्यांनी त्यांच्या संरक्षण व्यवस्थेवर आघात सुरु केले. थोडक्यात अमेरिका, इस्रायल, अफगाणिस्थान आणि पाकिस्तान या देशात जनतेचे आंदोलन फार मोठया प्रमाणावर सुरु झाले. इराण आणि पश्चिम आशियातील नुकसानीचा अंदाज घेऊन अमेरिकेने या सर्व देशाना मिळून त्यांच्याकडील सुवर्ण साठ्यातील तीन हजार टन सुवर्ण साठे पुर्ननिर्माण करीता द्यावा असा निर्णय झाला तसेच सर्व सैन्य आणि सर्व सैन्याशी निगडित उत्पादकांनी आणि संस्थांनी हे पुनर्निर्माणाचे कार्य स्वतः जातीने पश्चिम आशियात पूर्ण करावे असेही निवेदन करण्यात आले. याशिवाय अमेरिकेला दंड म्हणून अमेरिकेचे अलास्का हे राज्य रशियाला सध्याच्या बाजार भावात विकावे असे ठरले.
ही सर्व परिस्थिती त्यांना कळणाऱ्या माध्यमातून प्रसारित करण्यात आली. अमेरिकेन जनतेला त्यांचे नेते निवडण्यास सांगण्यात आले तसेच त्यांच्या सीमा बंद केल्यामुळे कुठलेही विमान अथवा जहाज कुठेही नेण्यास परवानगी नाकारण्यात आली होती. अमेरिकेन जनतेला असे सांगण्यात आले कि त्यांच्या राष्ट्रात त्यांची कामे त्यांनीच करावीत. इतर राष्ट्रांच्या भानगडीत पडू नये आणि मुख्य म्हणजे आपले सामर्थ्य दाखवायला जाऊ नये. युद्धामुळे अमेरिकेचा तोटा आणि ट्रम्प सारख्या काही लोकांनाच कसा फायदा झाला आहे एवढेच दाखवण्यात आले. याच्या पुढे अमेरिकन युद्ध साहित्य कंपन्या आणि त्यांनी सैन्य दले यांना इराण पुनर्निमाणाचे कार्य सोपवल्यात आले.
जगभर प्रसारित संदेशात असे जाहीर करण्यात आले की जगात कोठेही दहशवाद किंवा युद्धवाद पूलम किंवा सर्वेश चालू देणार नाहीत आणि गुन्हेगारांना त्याची जबरदस्त शिक्षा लगेचच मिळेल. धर्माच्या नावाखाली इतरांची पिळवणूक किंवा जन आंदोलन हे पूर्णतः ना मंजूर आहे. यांच्या कोणत्याही कायद्यात अथवा समाज प्रथेत आम्हाला बदल अपेक्षित नाही. परंतु त्या बरोबरच आम्ही विश्व नियंत्रक असल्यामुळे सर्व मानवाने स्वतःचे नियंत्रण करावे असा आमचा आग्रह आहे. राष्ट्रीय भौगौलिक रचनेवर आम्ही काही निर्णय तातडीने घेतले आहेत आणि काही यापुढे घेतले जातील. त्याचे तंतोतंत पालन होणे आवश्यक आहे. मध्य पूर्वेत इराण सोडून अमेरिकेच्या संघटनेमुळे बऱ्याच अरब राष्ट्रांचे नुकसान झाले आहे. ते सर्व नुकसान इराणने भरून द्यावे. अरब राष्ट्रांची जरूर असल्यास त्यांना कोणतेही राष्ट्र मदत करू शकतात.
सर्वेशच्या अध्यक्षतेखाली पुलम ची बैठक चालू होती. त्यात पृथ्वीवासीयांना दोन अति महत्वाची संशोधने बहाल करण्यावर एकमत झाले आणि तसा निर्णयही पृथ्वीवासीयांना कळवण्यात आला. पृथ्वीवरची बहुतेक जनता संतुष्ट आणि आनंदात होती. काही राजकीय नेते असंतुष्ट होते. पण त्यांना कोणावर आणि कसा हल्ला करायचा हेच समजत नव्हते.
भाग - 4
भारत वर्षात आमीनी नावाच्या मुख्याला नेमण्यात आले होते. भारतापुढे असलेल्या जन शक्तीचा अभ्यास करून खालील महत्वाची केंद्रे ठरवण्यात आली होती. त्यात वाढती लोकसंख्या, मुस्लिमांचा वाढता धर्मप्रचार आणि ऊर्जेची कमतरता हे विषय प्रामुख्याने होते. त्याचप्रमाणे राज्य कारभारातील खाबूपणा अतिशय त्रास देत होता. विकर्माने पहिले पाऊल उचलून सैन्य दल आणि पोलीस दल यातील लाचलुचपत घेणाऱ्या आणि चालू ठेवणाऱ्या बावीस लाख लोकांची हकालपट्टी केली. एवढेच नाही तर त्यांना त्यांच्या सर्व कुटुंबासकट अक्साई चीन मध्ये बांधलेल्या घरात पाठवण्यात आले. ही घरे पाचशे स्वेअर फुटाची होती आणि चीनला अशा दहा लाख घरांचे उत्पादन आणि व्यवस्थापन करण्याचे कॉन्ट्रॅक्ट जगन नियंत्रकाने दिले होते. अर्थात हे नाव सुद्धा त्यांना लोकांनीच बहाल केले होते. सर्वसामान्य जनता खुश होती. त्यांच्या दृष्टीने कामातील अडथळे संपून जीवन सुसह्य झाले होते. सहा महिन्यातच संत्र्या पासून मंत्र्या प्रर्यंत आणि कष्टकरी कामगारांपासून ते बड्या उद्योगपती पर्यंत सर्वांचीच त्यांच्या जवळच्या नातेवाइकांसकट संपत्ती सरकार जमा करण्यात येऊन अशा कुटूंबाना निवासा साठी अक्साई चीन मध्ये पाठवण्यात आले होते. जगन नियंत्रकाने प्रत्येक राष्ट्रातच सामान्यजन सुखी करण्याकरिता प्रयत्न चालवले होते. तर तुरंगात खितपत पडलेल्या आणि त्यातील बलात्कारासारखे अपराधी असणाऱ्यांना तातडीने मृत्युदंड दिला.
जगतात सर्वत्रच आनंद आणि खुशाली पसरत चालली होती. जगाची लोकसंख्या आता आठशेकोटीवरून साडेपाचशे कोटीवर आली होती आणि ती कमी होण्याची चिन्ह दिसत होती. चीन आणि भारत यांची जनसंख्या शंभर कोटीहूनही कमी आली होती.
अशावेळेस सर्वेश आणि पुलम यांनी त्यांच्या वरिष्ठाना सांगून काही वैश्विक साधने आणि उत्पादने पृथ्वीवर चालू करण्याचे ठरवले होते. त्यांना दिसत होते कि बहुतेक भांडणे यांच्या मागे ऊर्जा निर्मिती किंवा ऊर्जा साठवणूक हे कारण आहे. पृथ्वीवर प्रचंड प्रमाणात सौरऊर्जा उत्पादन शक्य होते. परंतु या ऊर्जेचे वहन आणि साठवणूक याला मात्र कोणतेही सोपे सुलभ आणि कमी मूल्याचे साधन नव्हते. पुलमच्या विश्वात पाचशे किलोवॅट आवर्स सिगारेच्या छोट्या पाकीटा एवढा होता. ही दुसरी पृथ्वीवरील मानवाला देण्यात येणारी शास्त्रीय पद्धती ही कालमापनावर आधारित होती. या शास्त्रीय पद्धतीत भविष्य काळातील उत्पादन वर्तमान काळात वापरता यायचे. उदारणार्थ चीन ला जर दहा कोटी स्वयंपाकाच्या गॅस सदृश्य पण विद्यत उर्जेवर चालणाऱ्या शेगडीचे उत्पादन सोपविले आणि ते उत्पादन ते पाच वर्षात चीन करू शकणार असेल तर पुढील पाच वर्षात तयार झालेले सर्व उत्पादने वर्तमान काळातच वितरित करण्यात आली असती. या पद्धतीमुळे वाटप व्यवस्था कालमापनाच्या पलीकडे जाऊ शकत होती. तेल संकटावर मात करण्यासाठी बरीशी उत्पादने मोठया प्रमाणावर वतर्मान काळातच आवश्यक होती. उदारणार्थ यात गॅस सदृश चालणारी स्वयंपाकाची उपकरणे, गिझर्स, विविध तर्हेचे टू, थ्री, फोर चाकांच्या गाड्या असे महत्वाचे विषय होते. हे सर्व वर्तमान काळात उपलब्ध झाल्यास गॅस सिलेंडर, पेट्रोल डिझेल यांचे पंप्स आणि वाटप व्यवस्था बंद झाली असती. प्रत्येक उपकरणाचे ऊर्जा साधन त्याला जोडलेले असणार होते. आणि सर्व उपकरणात असे दोन तरी ऊर्जा संचय बसवण्यात येणार होते.
जगाच्या नवीन रचनेत सर्व राष्ट्रांना ऊर्जा संचय आणि भविष्य काळातील वस्तूंचा वर्तमान काळातील उपयोग या संकल्पना पटवल्या गेल्या. काही महिन्यातच जगातून विद्युत वहन आणि त्याचा फापट पसारा कमी झाला असता. त्या ऐवजी प्रत्येक घराला एक ऊर्जा संचय जोडला गेला असता आणि त्या उर्जेवर घरातील सर्व विद्युत उपकरणे चालली असती. हे ऊर्जा संचय ठीक ठिकाणी विकत मिळाले असते आणि त्यामुळे अडकून बसण्याची सवय सुटली असती. औद्योगिक क्षेत्रात विद्युत जनित्रे कालबाहय झाली असती. थोडक्यात विद्युत उपकरणे आणि त्यांचे संयमन फारच सोपे झाले असते. दळण वळणाच्या बाबतीत तर इलेक्ट्रिक वेहिकल शेकडो किलोमीटर विदाउट रिचार्ज चालली असती. उदाहरण सांगायचे झाले तर पस्तीस प्रवासी असलेली वातावरणकुलीत बस दोन हजार रुपयांच्या ऊर्जा संचयामुळे सहज पाचशे किलोमीटर गेली असती. ठीक ठिकाणी ऊर्जा निर्माणापासून ऊर्जा संचय रिचार्ज करण्याची सोय केली गेली असती. वेगवेगळ्या कारणांसाठी असे ऊर्जा संचय 500 KWH , 5MWH, 100 MWH आणि 1 GWH अशा रचनेचे आराखडे मानवाला देण्यात येणार होते.
ऊर्जा संचय आणि ऊर्जा उपकरणे यांची व्यवस्था लागल्यावर ऊर्जा निर्मितीचे आठपट वेगवान असणारे तंत्रज्ञान मानवाला मिळणार होते. जरी या सर्वाला पाच सह वर्ष जाणार असली तरी सामान्य जनतेला लागणारी विद्युत उपकरणे आणि ऊर्जा संचय चार पाच महिन्यात उपलब्ध झाले असते.