ही-मॅन

Submitted by अविनाश जोशी on 23 May, 2026 - 05:50

ही-मॅन
धर्मेंद्र, हेमामालिनी ही चित्रपटातील यशस्वी जोडी होती. सीता और गीता, शोले असे ओळींनी अकरा चित्रपट या जोडीचे सुपरहिट झाले. शोले चित्रपटात धर्मेंद्रला ठाकूरची भूमिका करायची होती. शेवटी रमेश सिप्पी ने त्याला समजावून सांगितले. नंतर चित्रपट ठाकूरचे आणि हेमामालिनीचे एकही शॉट नाही पण चित्रपटातील सर्व दृश्य हेमामालिनी बरोबरच आहेत हे ऐकल्यावर धर्मेंद्र वीरू झाला आणि जय - वीरू ही जोडी पण अजरामर झाली. या चित्रपटात एक दृश्य आहे. त्यात धर्मेंद्र हेमामालिनीला बंदूक चालवायला शिकवत असतो. त्यात धर्मेंद्र हेमामालिनीच्या मागून तिला पकडत असतो आणि बंदूक उडाल्यावर स्वतःकडे खेचत असतो. अमिताभ झाडाखाली बसून असतो. शॉट ची रिअर्सल ओके झाली. पहिल्या टेक मध्ये बंदूक उडाली पण त्या वेळेला पाच पैकी एक रिफ्लेक्टर हालला त्यामुळे गोळीच्या आवाजानंतर कॅमेरामॅन लगेच कट म्हणून ओरडला. परत दुसऱ्यांदा टेक सुरु झाला पण परत तसेच घडले. असे करता करता हा शॉट अकरा वेळा रिटेक केला गेला. स्पॉट बॉयच्या जागा बदलून झाल्या तरी तसेच होत होते. शेवटी कॅमेरामॅन म्हणाले, आता शेवटचे प्रयत्न करू, जर नाही झाले तर आजचे शूटिंग कॅन्सल करू आणि बारावा शॉट एकदम ओके झाला. अमिताभ ने कॅमेरामॅनला सांगितले, हा सगळा चावटपणा धर्मेन्द्रचा आहे. धर्मेंद्रने सगळ्या स्पॉट बॉयला दोन हजार रुपये आधीच देऊन ठेवले होते आणि जास्तीत जास्त रिटेक होऊ देत असे सांगितले.
अशा या धर्मेंद्रला 'ही-मॅन' हा किताब मात्र त्याच्या हळुवार प्रदर्शनाला मिळाला. एका चित्रपटात कोमल नायिका अतिशय घाबरून सतरंजीवर पडलेली असते. पुढच्या प्रसंगाच्या भीतीने तीचे अंग थरथर कापत असते. धर्मेंद्र आत येतो आणि दार लावतो आणि नायिकेकडे नजर टाकतो. ती थंडीने कापत आहे असे त्याला वाटते आणि तिचा पांढरा फटक पडलेला चेहराही त्याला दिसतो. तो तिच्या अंगावर एक पांघरून घालतो. या कृतीमुळे तो 'ही-मॅन' म्हणून जास्त प्रसिद्ध झाला.
चित्रपटात काम करत असताना धर्मेंद्र बऱ्याच वेळेला संवादाचे उच्चार तो पंजाबी स्टाईल ने करायचा. कित्येक वेळेला त्याच्या नकळत पंजाबी उच्चार बाहेर पडायचे. एक दिगदशकाने अशी पैज घेतली की तो धर्मेंद्रचे सर्व उच्चार अस्खलित हिंदीत करून दाखवेल. तो पैज जिंकला. दिग्दर्शक होता ऋषिकेश मुखर्जी आणि चित्रपट होता 'चुपके चुपके'.
आशा पारेख बरोबरच्या एका चित्रपटात काम करताना आशा पारेखने निर्माता दिगदर्शकाकडे तक्रार केली, धर्मेंद्र बऱ्याच वेळेला दारू पिऊन सेटवर येतो. हे ऐकल्यावर धर्मेंद्रने आशा पारेखला सांगितले, मी तुझ्या बरोबर काम करताना दारूला स्पर्शही करणार नाही. त्याच सिनेमाच्या एका दृश्यात नायिका नायकाला एका थंड तळ्यात ढकलते आणि तो कसा बसा बाहेर येतो. त्या दृश्यात तळ्यात ढकलल्याबरोबर आणि धर्मेंद्रने वेट सूट न घातल्यामुळे त्याला हायपोथॅर्मीचा शॉक लागला आणि तो खाली खाली बुडायला लागला. शूटिंगच्या लोकांनाही महत प्रयासाने बाहेर काढले. तोपर्यंत जवळच असलेल्या एका खेड्यातील लोकही आलेली होती. दवाखान्यात नेण्या इतका वेळही नव्हता. त्याला एका घरात नेण्यात आले आणि त्याच्या दोन्ही बाजूला शेकोट्या पेटवून उब निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु झाला. सर्व पाणी पुसून घेऊन स्थानिक लोकांनी त्याच्या अंगाला ब्रँडी चोळायला सुरवात केली. त्यांनी सांगितले याने लवकर हालचाल करायला पाहिजे नाहीतर कदाचित एखादा अवयव निकामी होईल. स्थानीक लोकांनी ब्रॅन्डी चोळत असतांनाच धर्मेंद्रने डोळे उघडले पण तरीही हालचाल नव्हती. आशा पारेख जवळ रडतच उभी होती. शेवटी त्या घरातील लोकांनी धर्मेंद्रला ब्रँडी प्यायची गळ घातली. पण तो प्यायला तयार होईना. युनिटचे लोकही आश्चर्यात पडले. धर्मेंद्र दारू का पीत नाही? शेवटी आशा पारेखच्या लक्षात आले आणि तिने स्वतःनेच त्याला ब्रँडी पाजली.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users