जंजीर
पालम विमानतळावर तीन तरुण वाट पाहत थांबले होते. ते होते राजीव गांधी, संजय गांधी आणि अमिताभ बच्चन. नेहरू घराणं आणि हरिवंशराय बच्चन दोघेही अलाहाबादचे. नेहरूंचा घर आनंदभुवन हे त्यावेळेला काँग्रेसचा राजकीय आखाडा झाला होता. एखाद्या राजाला शोभेल असा तो महाल होता. बच्चन कुटूंबियाचे निवास स्थान साधेच होते. हरिवंशरायांची पहिली पत्नी अल्पवयातच निधन पावली. त्यानंतर त्यांनी तेजोवंश कौर या त्यांच्या प्रियेसीशी लग्न केले. बच्चन यांचा मधुशाला हा काव्यसंग्रह ही तो पर्यंत गाजला होता. सत्तेचाळी साली पंतप्रधान झाल्यावर नेहरू कुटूंब दिल्लीला गेले. त्यावेळी प्रशासकीय काम आणि भारताची राष्ट्रभाषा कोणती असावी यावर चर्चा चालू होत्या नेहरूंनी हरिवंशराय बच्चनना दिल्लीला बोलावून घेतले आणि त्रिमूर्ती जवळच एक बंगला त्यांना राहायला दिला. इंदिरा गांधी आणि त्यांच्या समवयस्क तेजी बच्चन अर्थात तेजवंश कौर यांची घट्ट मैत्री जमली. अशा सुमारासच इंदिरा गांधी प्रेमात पडल्या आणि त्यांनी तेजीला सांगितलं ती प्रेमात पडली आहे पण तिचा प्रियकर पारशी आहे. तेजीने तिला धीर देऊन सांगितले की तू बिनधास्तपणे घरी सांगून टाक. माझे सुद्धा असेच झाले होते. मी पंजाबी तर माझा नवरा कायस्थ. त्यामुळे दोघांच्याही घरून विरोध होता. शेवटी मीच पुढाकार घेतला आणि आमचे लग्न झाले. काही दिवसातच दोघीनांही मुले झाली. तेजीला अमिताभ आणि अजिताभ तर इंदिराला राजीव गांधी आणि संजय गांधी. चारही मुले एकत्रच वाढत होती. एकाच शाळेत शिकत होती आणि दोन्ही घरे जोडलेली असल्यामुळे त्यांची मैत्री वाढतच राहिली. त्यात राजीव गांधी आणि अमिताभ फारच सख्खे मित्र झाले. काही वर्षांनी अमिताभ आणि अजिताभ नैनितालला गेले तर राजीव आणि संजय नेहरू घराण्याच्या प्रथेमुळे डेहराडून येथे स्कूलला गेले. अमितभच्या डोक्यात सिने क्षेत्र, रेडिओ क्षेत्र असा किडा वळवळ्तच होता. तो मुंबईस राहिला त्या सुमारास राजीव गांधीही इंडियन एरलाईन मध्ये पायलट म्हणून रुजू झाला.
अमिताभ आणि राजीवची मैत्री एवढी दृढ होती की मुंबईहुन राजीव फ्लाईट घेऊन जाणार असला तर तो अमिताभ ला कळवायचा आणि अमिताभ त्या फ्लाइटचे बुकिंग करून विमानाने टेकऑफ घेतल्यावर कॉकपीट मध्ये जाऊन राजीव सोबत गप्पा मारत बसायचा. या सुमारास अमिताभने अनेक ठिकाणहून नकार ऐकले. अमीन सायनाने सुद्धा त्याचा आवाज रिजेक्ट केला. या दरम्यान के ए अब्बास यांच्या 'सात हिंदुस्तानी' या चित्रपटात एक नगण्य भूमिका मिळाली. त्याच्या वडिलांचे नाव हरिवंशराय बच्चन असे समजताच त्यांना वाटले की हा मुलगा सिनेमात काम करण्यासाठी घरून पळून आला आहे म्हणून त्यांनी हरिवंशराय यांना तार करून अमिताभ बद्दल विचारले. अर्थातच हरिवंशराय यांनी अमिताभ विषयी चांगले मत नोंदविले. ते वाचल्यावर अब्बास यांनी अमिताभ ला काम दिले.
इंदिरा गांधींच्या नर्गिस या चांगल्या मैत्रिणी होत्या. इंदिरा गांधींनी नर्गिसला अमिताभ विषयी सांगितले. सुनील दत्तने त्याला रेश्मा और शेरा यामध्ये भूमिका दिली. त्याचा आवाज न आवडल्यामुळे संपूर्ण चित्रपटात त्याला एकही संवाद नव्हता. तर याला मुक्याची भूमिका देण्यात आली. आणि अमिताभला त्याचा काहीही फायदा झाला नाही.
त्यानंतर काही दिवसांनी राजीव गांधी अमिताभला घेऊन महमूद कडे गेला. त्यावेळेस महमूद त्याच्या बॉंबे तो गोवा चित्रपटाकरिता एका नव्या चेहऱ्याच्या शोधात होता. चित्रपटाची नायिका अरुणा इराणी आणि चित्रपटाचे लो बजेट यामुळे कोणीही चित्रपटात नायक म्हणून येण्यास तयार नव्हता. राजीव गांधींच्या शिफारशींमुळे अमिताभला बॉंबे तो गोवा मध्ये हिरोची भूमिका मिळाली.
त्यावेळेस रोमँटिक चित्रपटाचे चलती होती. राजेश खन्नाची प्रचंड चलती होती. त्याच वेळेस प्रकाश बेहरा एका इमानी पोलीस ऑफिसरची भूमिका असलेला जया बहादुरी नायिका असलेले आणि बऱ्याच जणांना कथानकही न आवडल्यामुळे त्यांनाही कोणी हिरो मिळत नव्हता. अशा वेळेला मेहमूद बॉंबे टू गोवा मारामारीचे शॉट्स घेऊन प्रकाश मेहरांकडे गेला. प्रकाश मेहरांनी अमिताभ ला चित्रपटात काम दिले अशा रीतीने रोमॅंटिक हिरो प्रतिमे ऐवजी अँग्री यंग मॅन अशी प्रतिमा पुढे आली. तो चित्रपट होता जंजीर.
जंजीर
Submitted by अविनाश जोशी on 19 May, 2026 - 03:42
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नर्गिस , नेहरुंची मुलगी
नर्गिस , नेहरुंची मुलगी असल्याचा प्रवाद ऐकला होता.