साधारण पंधरा-सोळा वर्षांपासून मी मायबोलीचा नियमित वाचक आहे . वेळ मिळेल तसा आणि मूड लागेल तसा इथल्या साहित्याचा आस्वाद मी घेत आलो आहे. फक्त त्यात सलगता राहिलेली नाही.
म्हणजे असं की नेहमी किंवा रोज इथे येऊन नवीन लेखन कोणी केले आहे याचा धांडोळा घेऊन वाचत राहिलो तर नियमित लिखाण करणाऱ्या लेखकांची मनात एक प्रतिमा तयार होते . आपल्याला कोणाचे लेखन आवडत आहे याचे ठोकताळे तयार होतात आणि मग आपण त्यांचं नवीन लेखन कधी येते याची वाट पाहू लागतो.
पण मधे गॅप आली , समजा एक दोन तीन महिन्यांनी परत आलो तर बऱ्याच वेळा वेगळे लेखक येथे लेखन करू लागलेले आढळतात आणि जुन्यापैकी किंवा आधीच्या पैकी लेखक दिसेनासे झालेले असतात. आता आठवायचा प्रयत्न केला तर त्यांची नावेही आपल्याला नीटपणे आठवत नाहीत. कधी कधी एखाद्या कथेतील छोटासं वर्णन~ कथा भाग आठवत राहतो आणि मन कुरतडत राहतं की कुठली कथा होती, कोणाची होती? त्यांचं लेखन परत वाचता येईल का?
मला हे अगदी आपल्या जीवनातल्या प्रवासाची साधर्म्य दाखवणारे वाटते . जसे की शाळेमधून कॉलेजमध्ये जेव्हा जातो तेव्हा मित्र-मैत्रिणी बदलून जातात. आधीचे जे अतिशय जवळचे जिवलग असतात ते हळूहळू भेटेनासे होतात, आठवणीतूनही हळूहळू काढता पाय घेतात. कॉलेजातून नोकरीत प्रवेश केल्यावर पुन्हा हेच घडते आणि नोकऱ्या बदलल्यावर तर हे अपरिहार्यपणे घडत राहते कारण आधीच्या नोकरीतल्या सवंगड्यांची ओळख ही कृत्रिमच झालेली असते.
मला आता मायबोलीवर आल्यावर हे जाणून घेण्याची खूप इच्छा असते की आपण त्या काळात वाचत होतो, ते लोक आता कुठे असतील? आता ते इथे का येत नाही? ते स्वतः लेखन करत नाहीत तर निदान दुसऱ्यांच्या लेखनाला प्रतिसाद का देत नाहीत? त्यांना त्यांच्या लेखनातून आणि आपल्या वाचनातून भेटावसं वाटत राहत
कहां गए वो लोग
Submitted by पशुपत on 20 May, 2026 - 07:56
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
आयडींच्या मांदियाळीतून एखादी
आयडींच्या मांदियाळीतून एखादी आयडी वठत गेली तरी ते कुणाच्याही लक्षात येत नाही If your laugh world laugh with youe if you cry cry alone. पण वास्तव जगात ही असेच होते. इथे सर्व व्यक्तिमत्वे त्यांच्या लिखाणातून समजतात. हे देखील प्रवाही असते.कधी कधी आपण आपले अस्तित्व दखलपात्र राहावे यासाठी केलेला अट्टाहास मला केविलवाणा वाटतो.
इथे माणूस मरून जात नाही… तो
इथे माणूस मरून जात नाही… तो फक्त दिसेनासा होतो. त्यामुळे closure मिळत नसावं.
अजून एक गोष्ट म्हणजे आपणही नकळतपणे दिसेनाश्या लोकांची दखल घेत नाही. तसच आपल्याबद्दल लोकांचे होते.
किंवा आपण काही लोक आवर्जून लक्षात ठेवतो किंवा रहातात. तसंच आपणही कोणाच्या तरी लक्षात रहात असू.
आणि तरीही…काही लोकांचा परिणाम कायम राहतो.
त्यांची एखादी कथा, एखादा प्रतिसाद, एखादी शैली आपल्या विचारांचा भाग बनते. म्हणजे व्यक्ती हरवते, पण तिचा ठसा राहतो.
मला वाटतं आपण माणसांपेक्षा तो काळ जास्त मिस करतो.
मला वाटतं आपण माणसांपेक्षा तो
मला वाटतं आपण माणसांपेक्षा तो काळ जास्त मिस करतो.>>>>>> अगदी सहमत
पशुपत, तुम्ही १८+ वर्षांपासून
पशुपत, तुम्ही १८+ वर्षांपासून मायबोलीवर आहात.
मी सदस्य होऊन ११+ वर्षे झालीत पण मायबोली नियमित वाचायला सुरुवात करून ७-८ वर्षे झाली. त्यात मायबोलीचा उच्चांख काळ निघून गेला होता असे कळते. तरीही मला मायबोलीवर लिहिणारे, छान माहितीपूर्ण प्रतिसाद देणारे बरेच सदस्य आठवत असतात जे आता मायबोलीवर येत नाहीत.
तेव्हा तुमच्या सारख्या जुने मायबोलीकर काय मिस करत असतील याची चांगलीच कल्पना येते.
एकदा कुठल्याही कारणाने डिस्कनेक्शन झालं की लोक येत नाहीत, आणि कुणाची वैयक्तिक कारणेही असतील. नंतर आले तरी रमत नाहीत कदाचित त्यांना मायबोली फार बदलली असे वाटत असेल.
असे कुणीतरी मध्येच येऊन गेले, कुणा कुणाची आठवण काढुन अथवा थोडं काहीतरी लिहुन येईनासे झाले असे पण बघितलेय.
मला वाटतं आपण माणसांपेक्षा तो काळ जास्त मिस करतो.>> हे पण बरोबर आहे.
मी इथे तसा बविबच आहे. पण
मी इथे तसा बविबच आहे. पण अंतर्धान पावलेल्या काही लेखकांची/ आय डी ची आठवण ह्या लेखामुळे जागृत झाली. सगळ्यात पहिले नमन म्हणजे हायाझेननर्ग ना , कथेचे मर्म उकळून दाखवण्यात त्यांचा हातखंडा. ह्याना हे कसे प्रतीत झाले आणि आपल्याला का नाही झाले? हा मला पडलेला नेहमीचा प्रश्न. नंतर क्रमांक येतो तो जव्हेरगंज ह्यांचा. त्यांच्या कथा निराळ्याच गूढ वातावरणात घेऊन जातात, तेसध्या कुठे आहेत हे मला माहित आहे. पण... नंतर आठवण येते ती चैतन्य रासकर ह्यांची, तसेच अज्ञातवासी. ते जे गायब झाले ते झालेच. ह्या लोकांची शैली काही निराळीच होती. पण माझ्या मनावर खोलवर परिणाम केला प्रकाश कर्णिक ह्यांच्या गुप्तहेर कथेने. ही कथा मला दोनदा वाचावी लागली. great!
सध्याही ताकदीचे लेखक आहेत. पण अजून ते तेजाने तळपत असल्याने त्यांच्याबद्दल लिहित नाही.
विज्ञानाबद्दल लिहिणारे मोजकेच आहेत. त्यांचा आढावा नंतर घेईन.
मला जाणवलेला एक महत्वाचा फरक, पूर्वी व्वाचाणारे भरभरून प्रतिसाद देत असत. आता मात्र हात राखून प्रतिसाद देतात. असे का? मला माहीत नाही.
Astronaut vinay
Astronaut vinay
मी अनु
दाद
फुल
स्वप्ना राज
शाली
अजून किती तरी नावे घेता येतील
आता ही नावे डोक्यात आली
हे काही फार जुने माबोतले आहे असेही नाही
मागच्या चार ते पाच वर्षातली मंडळी
..
केकू +११
किल्ली
किल्ली
मला जशी आठवत गेली तशी लिहीय गेलो.
तुम्ही लिहिली ते पण सगळे आवडते आहेत.
लेखक काय येत जात राहतात.
लेखक काय येत जात राहतात. मायबोली प्रतिसाद देणाऱ्यामुळे टिकली आहे.
त्यातही माझ्या धाग्यावर नियमित प्रतिसाद देणारे मायबोलीवरुन गायबले की मला फार दुःख होते
तरी काही चांगले लिहिणारे आठवले चटकन..
अश्यातले कोणी विवाद होऊन गेले की ते जास्त वाईट वाटते मला पर्सनली
>>>>>आयडींच्या मांदियाळीतून
>>>>>आयडींच्या मांदियाळीतून एखादी आयडी वठत गेली तरी ते कुणाच्याही लक्षात येत नाही If your laugh world laugh with youe if you cry cry alone.
कळतं कळतं
>>>>>>>कधी कधी आपण आपले
>>>>>>>कधी कधी आपण आपले अस्तित्व दखलपात्र राहावे यासाठी केलेला अट्टाहास मला केविलवाणा वाटतो.
परदेशात एकाकीपण असलं आणि आपल्याला कनेक्शन चा सोस असला की अट्टाहास होतो. काही लोक सकारण तर काही अकारण फटाकून वागतात. आपण ऑब्सेस होतो. पण मग चुकून एखादा ब्रेक येतो आणि मग आपण हे गाणे गात मस्त जगायला शिकतो
दुनिया जाय तेल लेने - ऐश तू कर
लेट देम थिअरी- मेल रॉबिन्स - एक पॉवरफुल पुस्तक.
सर्वजणांच्या प्रतिसादातून
सर्वजणांच्या प्रतिसादातून माझ्या भावना सगळ्यांपर्यंत पोहोचल्याचा आनंद वाटला.
खरंच आपण त्या लेखकांबरोबर तो काळही मिस करत असतो.. लोकांशी; जास्ती करून आपल्याशी साधर्म्य असलेल्या विचारांच्या लोकांशी कनेक्टेड राहणं यासाठी हा सगळा खटाटोप असतो !
कदाचित आता इथे न येणाऱ्या सभासदांना इथल्यापेक्षा जास्ती चांगली/ इंटरेस्टिंग व्यासपीठे / माणसे सापडली असू शकतात !
मला झक्की चांगले आठवतात तसेच
मला झक्की चांगले आठवतात तसेच जिप्सी आणि स्पोर्ट्स बद्दल उत्तम लिहिणारे पराग, मला २४ वर्षे झाली, स्वप्ना राज फार उत्तम लिहायच्या.... बर्^याच जणांनी कोविड मध्ये धीर दिला..... मिस करतो हे मात्र खरे.... तेव्हा कुरघोडी व्हायची नाही.... विषयांतर कमी असायचे
मला राहून राहून आठवण येते ती
मला राहून राहून आठवण येते ती डॉक्टर xxxx . ते माय्बोलीवर फुलपाखरे आणि पक्षी ह्या विषयावर लिहित असत. अकोल्याचे होते. अत्यंत विनम्र व्यक्तिमत्व! एखाद दुसरी कथा पण लिहिल्याचे आठवतंय. महाराष्ट्रातील फुलपाखरे ह्या विशातावर त्यांनी एक पुस्तकही लिहिले आहे. कोविड सुरु झाला आणि ते अदृश्य झाले.
आता मला त्यांचे नाव मात्र आठवत नाही.
विद्न्यावर लिहिणारे Slarty आश्चिग अतुल आणि हो वावे. वावे विद्न्यानापुरत्या अदृश्य! बाकी "वाचू आनंदे" माशे असतात. आश्चिग अतुल मधेच डोकावतात्त.
एकूण विज्ञानावर लिहिणारे आठवत नाहीत.
कथा
विशाल कुलकर्णी, कवठी चाफा, कौतुक शिरोडकर. हे माझे आवडते लेखक.
>>>>>>ती डॉक्टर xxxx . ते
>>>>>>ती डॉक्टर xxxx . ते माय्बोलीवर फुलपाखरे आणि पक्षी ह्या विषयावर लिहित असत.
कसांबे का काहीतरी आय डी होता का? मी शोधते.
----------------------
Dr Raju Kasambe
पशुपत तुमची कळकळ जाणवली.
पशुपत तुमची कळकळ जाणवली.
अगदी असेच थोड्याफार फरकाने मला वाटते.
आता कदाचित ते दुसऱ्या समाजमाध्यमावर जास्त रमले असतील. काहींनी इथल्या प्रतिसादांचा वाईट अनुभव आला असावा.
सर्वांचे प्रतिसाद छान
दक्षिणा, प्रतिसाद आवडला.
@केशवकूल, ते डॉ राजू कसंबे. महाराष्ट्रातील पक्षीशास्त्रातील एक मानाचे व्यक्तिमत्व. मुंबईतील BNHS च्या CEC चे ते प्रमुख होते.
ओह आभार सामो आणि ऋतुराज.!
ओह आभार
सामो आणि ऋतुराज.!