गाता रहे मेरा फिल्मी दिल
गाता रहे मेरा फिल्मी दिल
दहावी पास होई पर्यन्त माझी चित्रपटीय ( भक्त म्हणून ) वाटचाल अगदीच अगाध होती. "तू एकदा दहावी पास हो मग तूला घरी केबल लावून देइन" हे आईने दिलेले आश्वासन मला दहावीची परिक्षा पास होण्यास पूरेसे होते. तो पर्य.न्त गाण्याच्या भेण्ड्यातील माझे योगदान हे " शेवटचे अक्षर "ळ" आल्यास " ल" घेता येइल का? किन्वा " आता म्हटलेले गाणे मागे म्हटले गेले होते काय यावर चर्चा करणे येथ पर्यन्त सिमीत होते. शाळेतली मुले गाण्याच्या अन्तरा बरोबर पूर्ण दोन-तीन कडवी म्हणताना पाहून मला अचम्बीत व्ह्यायला होई.