लेख

लेख

(विवेक)सूर्य पाहिलेला माणूस - श्री. सुनील सुकथनकर

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

फार वर्षांपूर्वी महाराष्ट्रात विवेकवादाचा जागर करणार्‍या आगरकरांनी लिहून ठेवलं होतं - 'मानसिक धैर्य म्हणजे काय? तर स्वतंत्रतेने विचार करून जे आपणास तथ्य वाटेल ते बिनदिक्कत बोलून दाखविणे आणि त्या बोलण्याप्रमाणे आचरण करणे. खरा शूर आहे तो जसा शत्रूंच्या संख्येची पर्वा न करता त्यांच्यावर बेलाशक तुटून पडतो व धारातीर्थी पतन पावण्याचा उत्साह बाळगतो, त्याप्रमाणेच मानसिक धैर्य त्याच्या ठायी पुरे वास करीत आहे तो पुरुष प्रतिपक्षांच्या आक्षेपास किंवा निंदकाच्या निर्भर्त्सनेस खुशाल एकीकडे गुंडाळून ठेवतो आणि आपल्या मताचे नि:शंकपणे प्रतिपादन करून त्याप्रमाणे आचरणही करण्यास चुकत नाही.

प्रकार: 

ब्लाऊस पिस

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

आमच्याकडे विदर्भात खास करुन अकोल्यात आणि आजूबाजूच्या गावात कुणाच्या भेटीला एखादी स्त्रि गेली असेल आणि ती जर जवळची असेल तर तिला ब्लाऊज पीस देतात. आमच्याघरी जेंव्हा कपाट नव्हते तेंव्हा आई वेगवेगळ्या रंगाचे ब्लाऊज पीस एखाद्या कापडी पिशवीत नाहीतर पेटीत बोचकून ठेवून द्यायची. बर्‍याचदा तेच ब्लाऊज पीस आई इतर कुणाला द्यायची. दुकानदाराकडे जर तुम्ही डझनानी ब्लाऊज पीस विकत घ्यावयास गेलात तर ते आधी विचारत कुणाला द्यायला वगैरे असेल तर दुसरे पीस दाखवतो. ही दुसरी पीसे म्हणजे कमी किमतीची, सुती, आणि ६०-६५ सेंटीमीटरची असत.

विषय: 
प्रकार: 

ये क्या जगह दोस्तों...

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

आज आमच्या कंपनीतर्फे आम्ही २०/२५ स्वयंसेवकांनी एका NGO ला भेट दिली. वृक्षारोपण, सौरदिव्यांचं रोपण, तिथल्या मुलींसाठी घेतल्या गेलेल्या मेहंदीवर्ग, सौंदर्य प्रसाधन, संगणक वर्ग, इ. वर्गांमध्ये सहभाग घेतला. कंपनीने त्यांच्या सध्या चालू असलेल्या/ नजीकच्या काळात सुरू होऊ घातलेल्या नियोजित प्रकल्पांकरताच्या खर्चाचा काही वाटा उचलला.

प्रकार: 

एका 'सेक्युलर' कॉलेजाची गोष्ट

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

भारतातल्या प्रत्येक शहरात असतो, तसा अकोल्यातही एक महात्मा गांधी पथ आहे. मदनलाल धिंग्रा चौकातल्या बसस्थानकापासून जुन्या शहराकडे जाणार्‍या या रस्त्यावर शास्त्री मैदानासमोर एक उंच, मोठी आणि देखणी इमारत उभी आहे. ‘श्रीमती मेहरबानू कॉलेज ऑफ सायन्स अ‍ॅण्ड कॉमर्स’ अशी या इमारतीवर पाटी आहे. आत शिरलं की एक प्रशस्त जिना आणि समोर कोनशिला. या कोनशिलेवर अकोला गुजराती समाजानं ५ फेब्रुवारी, २००८ रोजी संमत केलेला एक प्रस्ताव कोरला आहे- ‘श्रीमती मेहरबानू ज्यूनिअर कॉलेज ऑफ सायन्स’ ही एक निधर्मी शिक्षणसंस्था आहे.

प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - लेख