स्फुट

कथाकथी

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
4 वर्ष ago

मध्यंतरी ऑफिसमध्ये एकाने विचारलं, "मला चांगल्या मराठी कथा वाचायच्या आहेत. सारखा मायबोली मायबोली करत असतोस.. तर तिथल्या कुठल्या कथा वाचू ते सांग आणि लिंक पण शोधून दे.. "
तेव्हा त्याला पटकन सापडतील अश्या कथांच्या लिंक दिल्या. (त्या अर्थातच यंदाच्या दिवाळी अंकातल्या होत्या. Wink )

विषय: 
प्रकार: 

मनकोलाज - १

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

सकाळच्या पारी जीमचा रस्ता पकडते तेंव्हा बर्‍यापैकी काळोख असतो. त्या धूसर अंधारात दवात न्हाल्या रस्त्याचा, झाडापानांचा मिळून येणारा ओला वास माझी पहाटे उठण्याची नाराजी घालवतो.
नेहमीच्या झाडाखाली मी गाडी पार्क करते. एक मोठ्ठा श्वास घेऊन आत शिरते. शूज चढवून अवयवांना चालू करते.
स्वत:ची अशी निरुपद्रवी पाच मिनिटं मला सध्या मिळत नाहीत. वर्क आऊट चालू असतानाही पुढं दिवसात घडतील अशा आणि मला घडवायलाच हव्यात अशा गोष्टींची यादी फ़िरत असते.

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

हाफ कुजबुज - क्रमश: मारके - भाग : २६

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

कुजबुज

२१ ऑक्टोबर २०१०

नमस्कार वाचकहो,

टायटल बघून दचकू नका. कुजबुजची "धार वाही" कादंबरी दररोज मायबोलीवर प्रकाशीत करण्याचा आमचा अजिबात मानस नाही. पण गेल्या काही अंकाच्या प्रकाशना नंतर "अंक फार लहान वाटला" "मॅटर ज..रा कमी वाटतेय" अशी तक्रार काही वाचकांनी केली होती. त्याला घाबरून यावेळी आम्ही विचारपूर्वक हे शिर्षक दिले आहे जेणे करून यावेळी पण कुजबुज मधे मॅटर कमी वाटल्यास हाफ प्लेट आहे म्हणत वेळ मारून नेता येईल.

प्रकार: 
शब्दखुणा: 

व्यक्ति तितक्या देव

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

LAMAL, विषय: देव, १६ Oct. २०१०

काही लोकांकरता देव सखा असतो, काहींकरता मित्र, अनेकांकरता आधार तर इतरांकरता नसतोच. अजुनही प्रकार आहेत पण आपण त्या सर्वात शिरु शकणार नाही. पण देव हा प्रकार या पेक्षा कितितरी क्लिष्ट आहे. लोकांना, आजच्या आणि आधिच्या, या संकल्पनेबद्दल काय वाटायचे, काय वाटते याचा आढावा घ्यायचा प्रयत्न करु या, आणि त्या अनुशंगानी आपल्याला बदलायला हवे का ते पाहुया.

प्रकार: 

प्रश्न

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

कितीतरी लोकं (माझ्यासारखी) स्वच्छंदी असतात बोलण्याच्या बाबतीत .. मनात येईल ते बोलून टाकतात पटकन मग ईतरांकडून (नवरे टाईप कायम उपदेश करणारे लोक) ऐकून घ्यायला लागतं की, "विचार करून बोलत जा!"

विषय: 
प्रकार: 

हळवाचे लाडु.......!

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

पहिली माबोकर: ऑस्ट्रेलियात हळीव मिळते का हो?
दुसरी माबोकर: मी पण शोधतेय एका मैत्रीणीसाठी. मिळाले कि सांगते.

चार दिवसांनी...
दुसरी माबोकर: अग हळीव नाही मिळालेत, पण तुला भेटायला आवडेल. पत्ता कळवतेस?
पहिली माबोकरः नक्कीच! खुप छान वाटेल!

दोन दिवसापुर्वी..
दुसरी माबोकर: हॅलो, अग आम्ही येतोय, आहात ना घरी?

आज...
दुसरी माबोकर अन तिचे यजमान १०० किमी वरील दुसर्‍या गावातुन, आमच्या घरी आले. हळीव नाही आणले...........हळवाचे तुप-खोबरे घालुन केलेले डबा भरुन लाडुच आणलेत!! सोबतीला इतरही पदार्थ आणलेतच... गरज पडणार आहेच म्हणुन! Happy

प्रकार: 

ये परतीचा वारा...

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

नियती तुम्हां, आम्हां सर्वांना एक कोडं घालते, आयुष्य नावाचं विलक्षण कोडं. प्रत्येकासाठी वेगळं आणि वैचित्र्यपूर्ण. एकाला घातलेलं कोड पुन्हा दुसर्‍याला नाही, तेह्वा ह्याचं किंवा त्याचं पाहून मी माझंही कोडं तसच सोडवीन म्हणालात, तर फसलात हे नक्की! इथे एकासाठीचा कायदा दुसर्‍याला लागू पडत नाही. प्रत्येकासाठी वेगळे कायदेकानून, ज्याच्या त्याच्या आवाक्याप्रमाणे.

विषय: 
प्रकार: 

शिशिरातल्या दुपारी

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

खूप दिवस झाले लिहून. कधी सुचायचं तेंव्हा वेळ नसायचा. आणि आता लिहायचंच म्हणून बसलं की मग सगळी पाटी कोरी. ते काल घडलेलं, आज सकाळीच अनुभवलेलं सगळं धुक्यागत विरळ होत जायचं. लख्ख उन्हात आज आणि आत्ता घडणारं वास्तव दिसायला लागायचं ज्यात काहीच सापडायचं नाही सांगण्याजोगं. सगळं कोरडं, शिशिरातल्या दुपारीसारखं. इतकं की वाटायचं हेच सत्य. या पलिकडं कुठला ऋतू, कुठलं वर्तमान असूच नाही शकत. शिशिरातली झाडं पाहिली की कसं वाटतं, हॅं या झाडांना कधी बहर थोडाच येणार आहे. संपलीच आता ही. तसंच विचारांचं होतं कधी कधी. शिशीर उलटतो. झाडं आपल्या धर्माला अनुसरून पुन्हा बहरतात.

विषय: 
प्रकार: 

आपके पीसी मे कौन रेहता है ?

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

[माझ्या लिखाणाचे इतर कुठल्याही, चर्चाग्रस्त / वादग्रस्त बाफ शी सा'धर्म्य' आढळल्यास, तो निव्वळ एक योगायोग समजावा]

"आपके PC मे कौन रेहता है, व्हायरस या अँटी व्हायरस ?"

ईईई हा काय वेड्यासारखा प्रश्ण आहे, असाच विचार आला ना तुमच्या मनात. माझी पण रोज-रोज अशीच चिड-चिड होते, कारण रोजच रेडीओ सिटीवर ही जाहिरात लागते आणि मी विचार करायला लागते अरे हे विचारावे का लागते आहे, किती साधे आणी सरळ उत्तर आहे या प्रश्णाचे.

विषय: 
प्रकार: 

मुळांची तक्रार....!

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

शाळेत असताना (२ री ते ४ थी!), 'मुळांची तक्रार' नावाचा एक धडा होता. एका बागेत माळीबाबा काम करित असताना अचानक एका झाडाची मुळे वर येउन बोलायला लागतातः कि आम्हाला नेहमीच जमिनीखाली रहावे लागते. आम्ही एवढी कामे करतो, अन कुणीच आम्हाला मान देत नाही, सगळे पानाअ-फुलांना, फांद्यांनाच छान, सुंदर म्हणत असतात. आजपासुन आम्ही पण जमिनीवर येणार अन मोकळ्या हवेचा आनंद घेणार........! मग माळीबुवा त्यांना समजावतात कि, बाबांनो प्रत्येकाला एक काम नेमुन दिलेले असते, अन त्याने त्यानुसारच वागायचे असते! जर मुळे जमिनीच्या वर आली, तर झाडाचे अस्तित्वच संपेल, मग तुम्हाला ही कुणी विचारणार नाही.....

विषय: 
प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - स्फुट