प्रश्न

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago
Time to
read
<1’

कितीतरी लोकं (माझ्यासारखी) स्वच्छंदी असतात बोलण्याच्या बाबतीत .. मनात येईल ते बोलून टाकतात पटकन मग ईतरांकडून (नवरे टाईप कायम उपदेश करणारे लोक) ऐकून घ्यायला लागतं की, "विचार करून बोलत जा!"

असं दर वेळी विचार करून बोलायचं म्हंटलं तर एकतर त्यातली उस्फुर्तता निघून जाईल आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे मग ते 'manipulated' होईल .. 'manipulate' ह्यालाच ईतर काही समानार्थी शब्द म्हणजे plastic, कमावलेलं, staged .. (ऐश्वर्या राय च्या चेहेर्‍यावरचे भाव कसे असतात किंवा तिचं हास्य कसं असतं अगदी तसंच :p) .. मला तर अगदी मनस्वी चीड आहे अशा वागण्या-बोलण्याची .. तेव्हा असं विचार करून बोलणं कितपत योग्य आहे? ऑफीसमध्ये किंवा परक्या माणसांच्यात ठीक आहे पण आपल्या माणसांत तरी किमान मनाला येईल ते बोलावं, विचार न करता .. हो की नाही?

:p

विषय: 
प्रकार: 

थोडासा विवेक राखणं अपेक्षीत आहे इतकंच. शब्द कमी जह्यरी ठेवणे. म्हणजेच बोलण्यात 'पोच' असावा जरा.

इकडेतिकडे सुनावणार्‍या लोकांना, स्वतःला मात्र काहीही बोलल्याचे खपत नाही असे सर्वसाधारणपणे दिसून येते. इतरांना आणि आपल्याला वेगळे मानदंड कशासाठी? Happy

मला असे वाटते कि आपल्या मांणसाने आपल्या शि नेहमि मनमोकळे पणाने बोलावे मोजुन मापुन बोलने म्हणजे ओफ्फिस मधे बोस समोर रिपोर्टिन्ग करन्या सार्खे आहे

पण आपल्या माणसांत तरी किमान मनाला येईल ते बोलावं, विचार न करता .. हो की नाही? >>> सशल मनाला येईल ते बोलावं पण वाट्टेल ते बोलु नये Proud

LOL
सशल, मी तुला "आपली" मानेन, तू मला बॉस मान. Proud

आर्या आणि श्री ने लिहिलेच आहे. श्री, आपण ज्यांना 'आपले' समजतो त्यांना आपण 'वाट्टेल ते' बोलत नाहीच. Happy कोणालाच बोलू नये, पण 'इतर जनता' हा इथे विषयच नाही. Happy

आपल्या माणसांत तरी किमान मनाला येईल ते बोलावं, विचार न करता .. हो की नाही?>>>
नाही. आपल्या माणसांना बरेचवेळा आपण गृहित धरतो.
शब्द विसरले जात नाहीत पटकन. निदान इमोशनल माणसांच्या बाबतीत तरी. मुलांच्या बाबतीत तरी ही प्रिकॉशन घ्यावी अस वाटत. त्यांच्या सेल्फ इस्टीमसाठी .