नीला आसमा सो गया...
आज दिपवाळीनिमित्त भारतीयांना इथे ४:३० वाजता घरी परत जायला अनुमती दिलेली असते. भराभर ओस पडलेल्या कुबीकल्सकडे पाहताना त्यावेळी मी 'नीला आसमा सो गया' हे गाणे ऐकत होतो आणि तो रिकामा क्षण एकदमच काळजावर चरचरत गेला. काही सांगितीक गोष्टी ह्या एकट्यानीच ऐकायच्या असतात त्यापैकी 'नीला आसमा सो गया' हे अमिताभने गायलेले एक गाणे मला फार बरे वाटते. केवढे क्षणभंगूर वाटणारे शब्द आहेत ह्या गाण्याचे आणि अमिताभने ते किती सार्थपणे गायले आहेत.