सामाजिक संस्थां अन आर्थिक पाठबळ

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

सामाजिक संस्थांच्या बाबतीतील बातम्या वाचताना नेहमीचे एक वाक्य म्हणजे, ' संस्थेला आर्थिक मदतीची गरज आहे, वाचकांनी कृपया यांचेशी संपर्क करावा.' अनेकदा ई-मेल वा एसेमेस द्वारे देखील आर्थिक मदतीचे निरोप येतच असतात. अन, नुकतीच एक वेगळी बातमी वाचली http://www.loksatta.com/lokprabha/20100514/samaj.htm

अश्या बातम्या वाचल्यावर मला नेहमीच एक प्रश्न पडतो, कि सामाजित कार्य करायचे असे ठरवुन संस्था स्थापण करताना, संस्थापक संस्थेच्या आर्थिक बाजुचा पुरेसा विचार करित नाहीत का? कारण सुरुवातीला खुप चांगले काम करुन, या संस्था आर्थिक डबघाईला येताना दिसतात. कायम स्वरुपी आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण करुन मगच त्या संस्थेची उभारणी केली तर चांगले होणार नाही का?

अर्थात, समाजातील अनेक लोक सामाजिक जाणीवेच्या भावनेतुन अश्या चांगले काम करणार्‍या संस्थांना मदत करतातच. ज्यांना संस्था उभारणे शक्य नाही, वा वेळ देणे शक्य नाही, ते लोक अगोदर कार्यरत असलेल्या संस्थांना मदत देतात. अन काही संस्था या विरुद्ध, केवळ आर्थिक मदत मिळवण्यासाठीच स्थापण होतात!

विषय: 
प्रकार: 

>>>> कारण सुरुवातीला खुप चांगले काम करुन, या संस्था आर्थिक डबघाईला येताना दिसतात. कायम स्वरुपी आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण करुन मगच त्या संस्थेची उभारणी केली तर चांगले होणार नाही का?
चम्प्या, याचे कारण बेशिस्त्/गैरव्यवहार्/काही सदस्यान्चे व्यक्तिगत इन्टरेस्ट यामधेच अस्ते
याशिवाय, उभी असलेली सन्स्था फोडण्याकरता वा ताब्यात घेण्याकरता कारवाया करण्याचे प्रमाण वाढते आहे.
यातुनही, कट्टर अभिमानी/शिस्तप्रिय/सावध लोकान्च्या सन्स्था काळाच्या कसोटीवर टिकून राहिलेल्या दिसुन येतात.
(यात मी अजुनही "जातीवर" आधारीत निरनिराळ्या उपद्रवी हस्तक्षेपान्चा विचार केला नाहीये)

तेव्हा केवळ भरभक्कम आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत वगैरे निर्माण केला म्हणजे सन्स्था टिकेल असे नाही हे सान्गण्याकरता ही पोस्ट केली असे.
(सेव्ह करुन ठेवू का ही पोस्ट? चम्प्या, हे तुझे रन्गिबेरन्गी पान आहे का? ही पोस्ट देखिल मागाहून उडवली जाणार का? वगैरे प्रश्न मला सन्स्थान्च्या भवितव्यापेक्षा जास्त महत्वाचे वाटताहेत सध्या! Proud )

कायम स्वरुपी आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण करुन मगच त्या संस्थेची उभारणी केली तर चांगले होणार नाही का?<<
चंप्या सारांशाने तुझी पोस्ट विचार करण्यासारखी नक्कीच आहे. काही मुद्दे महत्वाचे आहेत. पण हा वरचा मुद्दा दिसताना लॉजिकल दिसत असला तरी घोळाचा आहे.
मला वाटतात ती कारणे ही.
१. मुळात एक संस्था म्हणजे कंपनी नव्हे. कंपनी सुरू करतानाची गुंतवणूक ही संपूर्णपणे प्रॉफिटच्या तत्वावर केलेली असते. ते तसेच असायला हवे. कंपनी तयार करत असलेले/ विकत असलेले प्रॉडक्ट/ विकत असलेली सेवा यातून येणार्‍या नफ्यातून कंपनी वाढत असते. प्रायव्हेट लिमिटेड ते पब्लिक लिमिटेड इत्यादी... हे एखाद्या सेवाभावी संस्थेच्या बाबतीत शक्य नसते. मुळात प्रॉफिट किंवा रिटर्न्स हा मुद्दा अमुक टक्के पैसा या पद्धतीने इथे बघता येतोच असे नाही. शक्यतोवर नाहीच.

२. एखाद्या कंपनीचे कंपनी सुरू करताना/ नवीन व्हेंचर सुरू करताना अमुक एक वर्षाचे/ महिन्याचे ध्येय असते तेवढ्या काळात ठराविक रिझल्टस/ आउटपुट मिळणे गरजेचे असते. तिथे भावनिक गुंते, मानवी संबंध यांना खूप कमी महत्व दिले जाते किंवा या गोष्टींमुळे वेळ वाया घालण्यास परवानगी नसते. परिणामी रिझल्ट दिसतो. जे एखाद्या संस्थेच्या बाबतीत होत नाही. शेवटी सेवाभावी किंवा नॉन प्रॉफिट, नॉन गव्हर्न्मेंट संस्था असते ती माणसांच्या संदर्भात काम करत असते. आर्थिक किंवा वस्तूरूपाने मदत देणार्‍या संस्था बाजूला ठेवू कारण त्यांचा परिणाम हा खूपच तात्कालिक आणि वरवरचा असतो. बाकी संस्थांमधे लोकजागृती ही पहिली पायरी असते. आणि लोकांची मने बदलून/ डोक्यात प्रकाश पडून/ हे काम आपल्याच फायद्याचं(केवळ आर्थिक नव्हे) आहे हे त्यांना समजून लोकांनी त्याला रिस्पॉन्स देणे ह्याल किती वेळ लागेल याचं गणित मांडता येत नाही. तसंच सरकारी पातळीवरची बेपर्वाई, दिरंगाई, डोळे बंद करून बसणे यामुळेही वेळ जातोच तेव्हा आउटपुट आणि वेळेचं गणित बांधता येत नाही. आणि मिळणारा आउटपुट हा पैशाच्या स्वरूपात संस्थेला मिळण्यासारखा नसतो/ नसावा.

३. संस्थेचं कार्यक्षेत्र वाढत जातं तेव्हा डोनर्सची गरज लागतेच. आणि लक्षात घे इथे डोनर्स हाच शब्द आहे. कंपनीच्या बाबतीत इन्व्हेस्टर हा शब्द असतो. दोन्हीतला फरक मी विशद करायची गरज नाही.

असो.. खूप वरवरचं झालंय पोस्ट. तपशीलात डॉ. प्रसाद देवधरांशी तुला बोलता येईल.

"कायम स्वरुपी आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण करुन मगच त्या संस्थेची उभारणी केली तर चांगले होणार नाही का?"
संस्थेचे कार्य पाहुनच लोक आर्थिक पाठबळ देणार ना? सुरुवातीला काही समानधर्मी एकत्र येउन आर्थिक पाया रचतील, पण खोलात जाउ तसे ते तोकडे वाटणारच्...आणि यात गैर ते काय?