आपके पीसी मे कौन रेहता है ?

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

[माझ्या लिखाणाचे इतर कुठल्याही, चर्चाग्रस्त / वादग्रस्त बाफ शी सा'धर्म्य' आढळल्यास, तो निव्वळ एक योगायोग समजावा]

"आपके PC मे कौन रेहता है, व्हायरस या अँटी व्हायरस ?"

ईईई हा काय वेड्यासारखा प्रश्ण आहे, असाच विचार आला ना तुमच्या मनात. माझी पण रोज-रोज अशीच चिड-चिड होते, कारण रोजच रेडीओ सिटीवर ही जाहिरात लागते आणि मी विचार करायला लागते अरे हे विचारावे का लागते आहे, किती साधे आणी सरळ उत्तर आहे या प्रश्णाचे.

पण असे माझे बरेचदा होते. म्हणजे माझ्या मनात अत्यंत स्पष्ट असलेल्या एखाद्या मुद्यावर जर कुणाला प्रश्ण पडला असेल तर मला खुपच अस्वस्थ वाटायला लागते. म्हणुन मी यावेळेस ठरवले, आपण काही 'प्रातीनिधिक' म्हणता येईल अशा 'व्यक्तीमत्वांशी' चर्चा करुया आणि जाणुन घेउया त्यांची उत्तरे काही वेगळी आहेत का ? आणि आहेत तर ती काय आहेत ? चला बघुया तुमच्या मनातल्या उत्तराशी जुळणारी आहेत की माझ्या ...........

एकः
हा काय प्रश्ण आहे ? व्हायरस, अँटी व्हायरस सगळी एकत्र एकाच PC मधे राहणारच. तुम्ही हे असले प्रश्ण विचारुन त्यांना वेगवेगळे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहात. ताबडतोब बंद करा हे सगळे नाहीतर आम्ही खास व्हायरस साठी एका स्वतंत्र PC ची व्यवस्था करु.

दोनः
अँटीव्हायरस हा एक अत्यंत चांगला concept आहे. म्हणजे मी त्यांचा मार्केटींग एजंट आहे असा गैरसमज करुन घेउ नका. माझ्या मनात व्हायरस-अँटीव्हायरस दोघांनाही समान स्थान आहे. अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे. [अँटीव्हायरस च्या सुरक्षाकवचात माझा डेटा सांभाळुन ठेवल्यानंतर व्यक्त केलेले]. अँटीव्हायरस जर व्हायरस ला किल करणार असेल तर मग दोघांमधे फरक काय राहीला. अशाने सगळी मेमरी free राहण्याचा धोका संभवतो.

तिनः
आमच्या कडे PC वगैरे काही नाही, त्यामुळे अँटीव्हायरस-व्हायरस याच्याशि माझा कधी संबंध आलाच नाही. आणि मुद्दाम काही जाणुन घेण्याचा मी कधी प्रयत्न ही केलेला नाही. पण प्रश्ण उपस्थित झाला आहे तर माझे उत्तर तयारच आहे. अँटीव्हायरस चे जर काही उद्दीष्ट असेल तर व्हायरस चे पण काही उद्दीष्ट आहे. आणि ते एकमेकांशी जुळत नाही म्हणुन एकाला वाईट म्हणुन दुसर्‍याला चांगले म्हणण्याचा अधिकार तुम्हाला मिळत नाही. ही आपापल्या अस्तित्वासाठी केलेली धडपड आहे असे मला वाटते.

चारः
मला असे वाटते, व्हायरस ला जे जमले ते अँटीव्हायरस ने आधी करुन दाखवावे आणि मग प्रश्ण विचारावे. व्हायरस किती नकळत तुमच्या PC मधे येतात, तिथलेच होउन रहातात, अगदी तिथल्या प्रत्येक फाईल शी इतके एकरुप होतात की त्यांची छाप पावलो-पावली दिसते आणि हे सगळे 'विना' मोबदला. दाखवा असा एकतरी अँटीव्हायरस विनामोबदला तुमच्या PC चे रक्षण करणारा, आणि मग बोला. शिवाय आहेच सारखे, हे ब्लॉक, ते ब्लॉक, कुणाला हे आपले मानायलाच तयार नाहीत. अँटीव्हायरसला जे जमत नाही ते व्हायरस अगदी सहज करत असल्याने हा सगळा आरडा-ओरडा आहे.

पाचः
मला थोडे सविस्तर बोलायचे आहे. अँटीव्हायरस हा जसा एक प्रोग्राम आहे, तसाच व्हायरस हा सुद्धा एक प्रकारचा प्रोग्रामच आहे. त्यामुळे दोन्ही प्रकार रन करण्यासाठी PC चा वापर होणे अटळ आहे. अँटीव्हायरस तयार करण्यासाठी जसे कष्ट आणि पैसा लागतो, तसेच व्हायरस तयार करण्यासाठी पण कोणीतरी पैसे आणि कष्ट वापरले आहेत. आणि कुठलीही निर्मीती ही कधिच वाईट नसते. व्हायरस जर कुठलीही जाहीरातबाजी करत नसेल तर अँटीव्हायरस ने पण विनाकारण प्रक्षोभक जाहीराती करुन समाजमना वर ताण येईल असे काही करु नये. शिवाय मुख्य मुद्दा हा आहे, PC मधे स्टोअर केलेला डेटा जर काही हरकत घेत नसेल तर स्वताला अँटीव्हायरस म्हणवणार्‍यांना हा अधिकारच नाही.

सहा:
माझ्या मशिन मधे मी व्हायरस ला राहू तरी देईन का, शक्यच नाही, ज्याच्या पासुन माझ्या 'अत्यंत' महत्वाच्या डेटा ला 'प्रचंड' धोका आहे, माझा अनेक वर्ष मेहनत करुन तयार केलेला डेटा नष्ट करण्याच्या आणि केवळ याच हेतुने ज्याची निर्मीती झाली आहे त्या व्हायरसला माझ्या पिसी मधे काही स्थान असु तरी शकते का, कधिच नाही. त्याउलट जो माझ्या PC चे, डेटा चे रक्षण करणार आहे त्या अँटीव्हायरस साठी मी नक्कीच चार पैसे खर्च करुन, तो व्यवस्थित इनस्टॉल होण्यासाठी आवश्यक ते कष्ट घेउन निर्धास्त मनाने रहाणे पसंत करेन. आणि हेच अधिक सयुक्तिक आहे असे मला वाटते.

........... जुळते आहे ना एक तरी उत्तर तुमच्या उत्तराशी ! माझेही !! Happy

व्हायरस 'क्लिन' करायला अँटीव्हायरस पाहिजेच्-पाहिजे, मग तो क्विकहील असेल, मॅकअफी असेल, सिमँटेक असेल किंवा एखादी हिंदुत्ववादी संघटना.

इतके साधे आणि सरळ आहे सगळे. मग प्रश्ण पडतातच कसे, असा माझा प्रश्ण आहे.

विषय: 
प्रकार: 

कुठल्याश्या इंग्रजी चित्रपटात (जेफ गोल्डब्लूम नि विल स्मिथ यांचा) परकीय ग्रहावरील लोक पृथ्वीवर आक्रमण करतात. जेफ त्यांच्या काँप्युटरमधे व्हायरस घालून ते आक्रमण थांबवतो!
बघा बिल गेटचे मायक्रोसॉफ्ट कुठपर्यंत पोचले आहे! की मॅक ओएस? की आयबीएमचे सध्या काय असेल ते!

मेरे पीसीमे पैले सिर्फ अँटी-व्हायरस था...मायबोली अ‍ॅक्सेस किया तो व्हायरस भी आ गया Uhoh

मी नंबर सहा. Happy मागे माझ्याही पीसी मध्ये माबोमुळेच व्हायरस पसरला होता. Sad

व्हायरस जर कुठलीही जाहीरातबाजी करत नसेल तर अँटीव्हायरस ने पण विनाकारण प्रक्षोभक जाहीराती करुन समाजमना वर ताण येईल असे काही करु नये. >>> परफेक्ट.

आम्ही सर्वांच्या मताचा आदर करतो Happy
<<<व्हायरस ला जे जमले ते अँटीव्हायरस ने आधी करुन दाखवावे आणि मग प्रश्ण विचार>>> हे म्हणजे........ रावणाला जे जमले ते रामाने आधी करुन दाखवावे आणि मग युद्धाचे काय ते बघु असे झाले.....

.

सध्या माझ्याकडे व्हायरस आणि अ‍ॅन्टी-व्हायरस सुद्धा नाहीत. कोणत्याही प्रकारचा व्हायरस हानीकारकच मग तो स्वाईन फ्लु , सर्दि, मलेरीया, डेंगु त्याला हटवण्यासाठी उपाययोजावेच लागतात मग ते सरकारी पातळीवरील किंवा वैयक्तिक पातळीवर उपचार होणे महत्वाचे.
आता घरी संगणक आला आणि अंतरजालात प्रवेशकेल्यावर व्हायरस चा धोका अधिक त्यामुळे गाफिल न रहाता तयारी केली पाहीजे

छान! Happy
यापेक्षा ज्या बा.फ. शी याचा "योगायोगाने" (?) संबंध आहे असे तुम्हाला वाटते त्याच बा.फ. वर मग यापेक्षा थेट का नाही लिहीत?
pc, virus, antivirus ही शब्दयोजना सर्व सोपे करून दाखवत असली तरी विचारप्रक्रीया त्या बा.फ.शीच संबंधीत आहे ना?
असो. वस्तूस्थिती ही आहे की माझा pc चालतोय ना क्रॅश न होता तोवर माझ्या pc मध्ये व्हायरस कीती का अँटिव्हायरस किती याची चिंता मी का कारू? virus detected चा मेसेज आल्याशिवाय माझे लक्ष तरी कुठे जाते? कुणीतरी antivirus program बनवून शिवाय माझ्या pc वर टाकलाय ना? झालं तर..
एक pc crash झाला की घेईन दुसरा विकत.. किती दिवस हे चालणार?
गळ्याशी येत नाही तोपर्यंत किंव्वा crash झाल्याशिवाय आपण धडा घेत नाही. यात दोष virus/antivirus चा नाहीये तर आपल्या औदासिन्याचा आहे.
बघा पटतय का..

योग,
नक्कीच सगळेच पटते आहे. आणि चिंता पण वाटते, तु उल्लेख केलेल्या औदासिन्याची , पुर्वग्रहांची.

तिकडची सगळी चर्चा वाचत असताना ही जाहीरात कानावर पडली आणि वाटले हे असे इतके सोप्पे असताना का बरे लक्षात येत नाही अनेकांच्या.

'या' पद्धतीने तिथे लिहीले असते तर विषयांतर वाटले असते. आणि स्पष्ट शब्दात लिहयला ही काही हरकत नाही, पण तुम्ही सगळ्यांनी [तु, केदार, GS ई] मिळुन सगळे मुद्दे घेतलेच आहेत चर्चेत.

पुर्वी अनेक वेळा लिहीलेही आहे, या वेळेस थोडे वेगळ्या पद्धतीने लिहावेसे वाटले इतकेच. गैरसमज नसावा Happy

गळ्याशी येत नाही तोपर्यंत किंव्वा crash झाल्याशिवाय आपण धडा घेत नाही >> हेच तर बदलायला हवे आहे. Sad

गैरसमज नक्कीच नाही..
पण तिथे जास्त संख्येने लिहीले गेले तर बहुमत काय आहे हे कळेल. एरवी ईतर बा.फ. वर मिनीटाला एक पोस्टी पाडणारे अशा बा.फ. च्या बाबतीत ऊदासीन असतात तेव्हा हे औदासिन्य अधिक प्रकर्षाने जाणवते नाही का?

शेवट बदललास का ? आता वेगळाच अर्थ लागतो आहे.

योग, त्या चर्चेत पोस्ट न टाकणारे तिथे फिरकत नाहीत असा होत नाही. हे अनेकदा गृहित धरले जाते. वाहत्या बाफंवर टीपी करायला कुठल्या विषयाचा फार अभ्यास असायची गरज नसते. हिंदुत्वासारख्या विषयावर जर माझ्याकडे केदार, जी एस, इत्यादींनी मांडलेल्या मुद्द्यामध्ये value addition करणारे काही नाही तर उगीचच फक्त अनुमोदनं द्यायची का ? तसेच माझी (पक्षी: तिथे वाचक मोडात असणार्‍या कुणाचीही) काही पोस्ट नाही ह्याचा अर्थ असा नाही की मी (पुन्हा, तिथे वाचक मोडात असणारे कुणीही) त्या बाबतीत उदासीन आहे. आणि एक, ज्या वाहत्या बाफंबद्दल तुम्हाला आकस आहे तिथेच अतिशय अर्थपूर्ण चर्चा होउन केदारने संस्कृतीविषयक लेख लिहिला.

असो, शेवट बदलल्यानंतर भारीच वाटतय हे Happy

>ज्या वाहत्या बाफंबद्दल तुम्हाला आकस आहे
हे कशावरून...? Happy आकस वगैरे काही नाही हो, जिथली चर्चा तिथे झाली तर अर्थ असतो एव्हडेच.
बरेच जण रोमात आहेत हे मला नक्की माहित आहे पण निव्वळ value addition नाही म्हणून पोस्ट नाही हे पटत नाही. असो. ज्याचा त्याचा दृष्टीकोन आहे.

आरती,
क्या बात है ...
"सहा" तो बहुत खास है !
दाखवा असा एकतरी अँटीव्हायरस विनामोबदला तुमच्या PC चे रक्षण करणारा, आणि मग बोला.
असे अनेक बाजारपेठेत आहेत,पण त्यांच्या कडे कुणाच लक्ष जात नाही, लोक विनामोबदला म्हणुन विश्वास ठेवत नाहीत ....लोकांना खर्च केल्याशिवाय समाधान लाभत नाही .
Lol