संघमित्रा यांचे रंगीबेरंगी पान

शोभिवंत सर ओघळतो.. (कविता आणि भाषांतराचा प्रयोग-२)

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

नवी कविता आणि तिचं भाषांतर..

वार्‍याचे बघ धैर्य सखे, तो करितो लाघवगान!
प्रणयोत्सुक आकाशसुंदरी, अन्‌ होते बेभान!
शोभिवंत सर ओघळतो गं, घेता चुंबनतान.
लाल हरित मखमालीवरती मोती विराजमान.

-संघमित्रा

See the courage of wind,
he openly sings a love song.
The amorous babe called sky,
blushes and sings along.
The precious necklace breaks,
in a passionate, hasty kiss.
On the red-green velvet of leaves,
the pearls thus land in bliss..

-Sanghamitraa

विषय: 
प्रकार: 

सॉफ्टकथा - २ (जुन्या गुलमोहरावरून)

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

ऑनसाईटवरून आलेल्या एका अत्यंत दुर्बोध मेलला मी जीव तोडून री करत होते.
"आज कीबोर्डची स्ट्रेस टेस्ट चालू आहे वाटतं?" भान विसरून कीबोर्ड बडवत असल्यामुळे मी दचकले.
मागे संयुक्ता उदास चेहर्‍याने उभी होती. एकमेकींच्या चेहर्‍यावरचे हे असे भाव बघायची आम्हाला सवय आहेच.
"काय झालं आता?" तरी मी खर्‍या उत्सुकतेनं विचारलं. कारण भाव तेच असले तरी कारणं जनरली रंगतदार असतात.
"हे बघ." संयू हात हलवायचा प्रयत्न करत म्हणाली.
आता तिच्या हातातल्या निळ्या ट्रॅवल बॅगेकडे माझं लक्ष गेलं.
"कुठे निघालीस?" आता मी जरा घाबरले. इतकं ऑफिसातून परस्पर प्रवासाला जाण्यासारखं काय असेल? कुठले नातेवाईक वगैरे...

विषय: 
प्रकार: 

उन्हांच्या प्रदेशात.. (कविता आणि भाषांतराचा प्रयोग)

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

उन्हांच्या प्रदेशात लाचार वाटा
कशा शोधती सावल्यांचे थवे..
जुने आठवावे तयांचेच रूप,
जुन्या काहिलीला मुलामे नवे!

उन्हांच्या प्रदेशातले शुष्क निर्झर
कुण्या काळची गाळती आसवे..
प्रवाहात ज्यांच्या खळाळून हसले,
मला बाल्य माझे पुन्हा आठवे.

The helpless roads in the sunshine land,
Search for the flocks of shadows..
Better to recall their old facets,
And brighten the bare, old plateaus..

विषय: 
प्रकार: 

समुद्र - १ : किनारा

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

अरे हो हो..
ही आपली सामायिक वहिवाटीची जागा आहे
हे मान्य..
तू इथंच आत-बाहेर असतोस
हे मान्य..
मी इतक्या लांबून कधी कधीच इथं येते
हे ही मान्य..
पण म्हणून मी इथं विसावलेली असताना
तू असं अवचित इथंच झेपावावंस..
तेही तुझ्या भरतीच्या वेळा, आवेग आणि प्रवाह बदलून?
चुकीचं नाही का हे?
नाही ना..
बरं.. हेही मान्यच.. Happy

विषय: 
प्रकार: 

एक सॉफ्टकथा

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

जुनीच गोष्ट.. इथं टाकतेय ते सगळं लिखाण एका ठिकाणी रहावं म्हणून. शोधायला आणि लिंक द्यायला सोपं जातं.

===================================================================

" बोला. "
न वळताही संयूचा चिंताक्रांत मूड लक्षात घेत मी विचारलं.
" काही नाही गं. चल ना कॅन्टीनला "
म्हणजे नक्कीच ताजा खबर.
" चल. " मी पिसी लॉक केला.
संयू माझी जवळची मैत्रीण. याच ऑफिसात फ्रेशर्सची सेम बॅच आणि पहिलं प्रोजेक्ट सुधा.
फक्त ती जावावाली आणि मी ऑरॅकल मधे. ट्रेनिंग़मधे फुल धमाल केली होतीच आणि पहिल्या प्रोजेक्टमधे पण.

प्रकार: 

मनकोलाज - २

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

चालतेय. सुखद पावसाळी हवेला लपेटून. ऊन न पाऊस यातलं दोन्ही नसलेलं. मी या इथंच रहावं कायम इतकी प्रेमात या जागेच्या. अर्थात यापेक्षा सुंदर जागी मी राहिली नाहीये असं नाही पण.. बस दिल तो इसी पे आया है.. झाडं.. गवत.. बागा.. इतकं असं सुंदर असावं? ते सपर्ण सौख्य सहन न होऊन मान वळवावी तरी कुठं? इथल्या हवेलाही हिरवा वास येतो. ऑफिसेस आणि घरं यांच्या सिमेंटचाही त्रास होऊ नये इतका. कन्स्ट्रक्शन्स जणू परवानगी घेऊन या हिरवाईच्या आश्रयाला गुपचुप उभी हे ऐश्वर्य निरखत.

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

आठवण

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

एका आळसटलेल्या दुपारी..
माळ्यावरून आठवणींचं एक बोचकं खाली काढताना,
ठसक्यांवर ठसके यायला लागलेत.
आणि डोळ्यातलं पाणी आवरता आवरत नाहीये.
तो खाली उभा राहून माझ्याकडे पाहतोय..
अनिमिष नजरेनं..
मी शिडीच्या वरच्या पायरीवर.
आणि " अरे मला धुळीची अ‍ॅलर्जी आहे." मी त्याला सांगायचा प्रयत्न करतेय.
ही एक आठवण..
तिला त्या बोचक्यात कोंबून मी ते पुन्हा माळ्यावर ढकलते.
इतकंच..

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

पयलं नमन...

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

२००८ च्या गणेशोत्सवात लिहीलं होतं बहुधा. मायबोलीवरच.

*****************

"हाय गॅनी कसा आहेस रे? किती दिवसांनी दिसतोयस..." विशनं नेहमीच्या रुबाबदार स्टाईलमधे विश केलं.
"विश अरे किती तू स्वतःच्या व्यापात गुंतून गेलायस? मी जाताना बोल्लो नव्हतो का? चाल्लोय जरा म्हणून."
गॅनीचं ते मराठी ऐकून विशचे कान गढूळले.
" अरे काय हे गॅनी? कुठं जाऊन आलास? काय हे बोल्लो चाल्लो ऑं?"
" आयला.. आपलं.. अबे.. आपलं.. अरे विश. मी मस्त दहा दिवस फुल टू धमाल करून आलो. अरे ही बॉ.. आपलं मुंभायची भाषा आहे रे. जॅर्गनच खरं तर. कारण तिथं सगळाच व्यवहार आहे. पण धम्माल आली."

विषय: 
प्रकार: 

सुट्टी

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

मायबोलीवर लिहीलेले पहिले ललित..

सुट्टी या शब्दाइतका स्फूर्तीदायक दुसरा शब्द नसेल. आणि दरवर्षी नेमानं उन्हाळा आणि दिवाळीच्या सुट्टीत धमाल करायचं वय एकदा संपलं की हाच शब्द एकदम nostalgic करून टाकतो.
सुट्टी म्हटलं की मला आठवतो आमचा गावातला वाडा. पुढच्या दारात उभं राहून जोरात ओरडलं तरी मागच्या दारातल्याला ऐकू जाणार नाही इतका मोठा जुना पण दणकट.
परिक्षा संपली की लगेच पप्पा आम्हाला ३ तासांवर असलेल्या आजोळी न्यायचे. जसजशा परिक्षा संपतील तसतसे आमच्या टोळीचे सभासद (म्हणजे इतर आत्ये, चुलत भावंडं) येऊन दाखल व्हायचे.

विषय: 
प्रकार: 

आता काय करावं? (एक जुनी (च) गोष्ट)

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

मायबोलीवरचं जुनं साहित्य पुन्हा इथं पोस्ट करायचं नाही असं ठरवलं होतं.
पण मधे एकदा शोधायचं म्हटलं तर इतका घाम गाळावा लागला.
स्वतःच्या शोधताना इतकी मारामारी तर इतरांच्या आवडलेल्या कथा शोधणं किती अवघड आहे ते कळलं.
कथाकथीचा घाट घालणार्‍याला सलाम...

तर ही मायबोलीवर मी लिहीलेली पहिली कथा.

वाड्याच्या दारातून पळत येताना बैठकीत पोहोचेपर्यंत तान्याला दम नव्हता. 'बाबासायब बाबासायब बाबासायब'

प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - संघमित्रा यांचे रंगीबेरंगी पान