आसवं

आनंद

Submitted by चाऊ on 1 December, 2012 - 00:00

कुणी पुसावे डोळे म्हणून आसवं येत नाहीत
का होतात सर्द पापण्या मलाच नाही माहीत

सरत नाही संध्याकाळ विरत नाही अंधारात
दिवस रात्रीच्या वेशीवरती हरवलेपण आत

कळले नाही कधी निसटला हातामधला हात
गेले सारे उरे निशाणी हातावरल्या रेषांत

सगळे आहे तरी रितेपण झाकळल्या मनात
काय मिळे हे सुख मलाही तु दिलेल्या कळांत

काळालाही काही कळेना हि स्तब्धता जगात
सुखावते अस्वस्थ वेदना, शांती तळमळण्यात

दुखावला जो उरी झेलुनी कट्यारीची पात
तोच जाणतो लपवुन अश्रु जगणे आनंदात

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - आसवं