सावलीचा आकाशकंदील
सावलीने केलेला आकाशकंदील प्रचंड आवडला. सीटिएमएमने ह्या वर्षी आकाशकंदील स्पर्धा ठेवली होती आणि त्यात हाच आकाशकंदील करुयात म्हणुन ठरविले. सावलीने टेंपलेट तर पाठविली पण बाकी सामानाची जमवा जमव करे पर्यंत शुक्रवार उजाडला, स्पर्धा शनिवारी. शुक्रवारी ४ वाजता सुरु करुन रात्री ११ पर्यंत काम चालले. सावली तु खरचं महान आहेस. हा आकाशकंदील करताना सगळे टुल्स व्यवस्थित जमविले पाहिजेत. बारीक कापायचे काम साध्या पेपर कटरने केल्याने बराच वेळ लागला. क्विलींग टुल वापरताना मज्जा आली. छोट्या फुलपाखरांवर थोडं स्पार्कल लावलं.
सावली खुप खुप धन्यवाद!
आम्हाला दुसरं बक्षिस मिळालं.