तिन्हीसांजा - अॅक्रॅलिक ऑन कॅनव्हास
आज हे पेंटिंग केलंय. कॅनव्हासवर अॅक्रॅलिक कलरमध्ये.
पेंटिंगमध्ये अजून शिकण्याच्या स्टेजमध्येच आहे. कॅनव्हासवरचा हा तिसरा प्रयत्न.
कॅनव्हास साइझ - १२" x १५"
रंग - आर्टिस्ट ग्रेड अॅक्रॅलिक रंग
आज हे पेंटिंग केलंय. कॅनव्हासवर अॅक्रॅलिक कलरमध्ये.
पेंटिंगमध्ये अजून शिकण्याच्या स्टेजमध्येच आहे. कॅनव्हासवरचा हा तिसरा प्रयत्न.
कॅनव्हास साइझ - १२" x १५"
रंग - आर्टिस्ट ग्रेड अॅक्रॅलिक रंग
सिल्क पेंटिंग असा काही कलाप्रकार असतो हे मला माहित नव्हते आणि अजूनही नाही. पण अशी पेंटींग्ज मी स्वतः करत असे. त्याबद्दल हे. अगदी पहिल्यापासून सविस्तर लिहितो.
मुंबईच्या प्रिंस ऑफ वेल्स म्यूझियममधे भरतकामाचे दोन अप्रतिम नमुने आहेत. ( हे नेहमीच प्रदर्शनासाठी
असतील असे नाही.) ज्या ज्या वेळी मी ते बघतो, त्यावेळी भान हरपून जाते.
ते बहुतेक भारतीय नाहीत. माझ्या अंदाजाप्रमाणे चिनी आहेत. त्यापैकी एक आहे एका तूर्रेबाज कोंबड्याचे.
भारतीय कोंबड्यापेक्षा जरा वेगळा असा तो कोंबडा आहे. आजूबाजूला काही कोंबड्या पण आहेत. रंग आता
सास-बहू मधली भांडण, कटकारस्थान आणि एकूण च पुरूष जमातीची गळचेपी या तीन गोष्टीभोवती फिरणार्या हिंदी-मराठी सिरीयल्स पाहण्यापेक्षा मला स्टार वर्ल्ड वरील भन्नाट कॉन्सेप्ट्स असणार्या मालिका बघायला आवडतात. फ्रेंड्स, हाउ आय मेट युवर मदर आणि टू अँड हाफ मेन आणि सगळ्यात भन्नाट आवडत म्हणजे द सिंपसन्स. सिंपसन्स ही सेटिरिकल पॅरोडी या वर्गात मोडणारी animated serial. २० वर्षापूर्वी सुरू झालेला हा शो अजूनही चाहत्यांमध्ये तितकाच लोकप्रिय आहे. द सिंपसन्स ही स्प्रिंगफील्ड या अमेरिकन शहरात राहणार्या एका परिवाराभोवती फिरते.
आम्ही शाळेत होतो तेव्हा गॅदरिंग असायचं. शाळेतली मुलं करमणुकीचे कार्यक्रम (गाणं, नाटक, नाच) करायची. वरतून टांगलेले कित्येक वर्षं वापरात असलेले जुने मायक्रोफोन असायचे.
http://www.google.com/imgres?um=1&hl=en&client=firefox-a&tbo=d&rls=org.m...
६ मायक्रोफोनने अख्खा रंगमंच चालायचा. थेटर खूप मोठं असेल तर आठ. समुहगान असेल तर त्याच ठोकळ्या मायक्रोफोनसमोर मुंलमुली उभ्या रहायच्या. भाषण असेल तर हेडमास्तरांच्या समोर तोच एक ठोकळा उभा केला जायचा..
ओळखा पाहू हा तरण तलाव कुठला ? म्हटलं खरं पण झकासने लगेक्च ओळखला
परवा मुंबई - पुणे प्रवासात मस्त धुकं भेटलं. दुपारी नऊ -साडेनऊला सुर्य चंद्रासारखा दिसत होता, मधूनच दिसेनासाही होत होता!
मोबाइलने, बसच्या काचेतून काढलेले फोटो आहेत, समजून घ्या!
मेंदी - लहानपणापासूनच लागलेलं एक वेड. सोलापूरला असताना लहानपणी फक्त नागपंचमीला मेंदीच्या झाडाची पानं तोडून वाटून तिचा लगदा करुन हातावर गोळे लावले जायचे. नंतर पावडर आणून, पंच्यातून चाळून, सगळे सोपस्कार करून पेस्ट तयार होऊ लागली. मग ती चांगली रंगावी म्हणून प्रचंड प्रयोग!!
राजसच्या वेळी दिवस राहिले असताना मनशक्ती (लोणावळा) केंद्र आयोजित एकदिवसीय गर्भसंस्कार शिबिराला आम्ही उभयतांनी हजेरी लावली होती. तेव्हा होऊ घातलेल्या माता-पित्यांनी करावयाचे आचार-विचार तसेच गर्भावतीचा आहार-विहार इ. बद्दल समुपदेशन, माहितीपर व्याख्यान इ. दिले गेले. त्यात गर्भवतीने अधून - मधून एक धैर्य-प्रतीक चित्र काढावे असे सांगितले गेले. त्यांनी दिलेल्या एका माहितीपर पुस्तकात काही राष्ट्रीय संत, थोर पुरुष इ. ची चित्रे दिली होती. आणि ती चित्रे नेहमी काढतो तशी काढायची नव्हती. तर चित्र उलटे (म्हणजे खालची बाजू वर व वरची बाजू खाली. उपडे नव्हे!) ठेवायचे. आणि आता ते जसे दिसते तसे काढायचे.