आपण चुका शिकतोय, की शाहणपण ? इतिहासातून,पूर्वजांकडून!!!!!
मासिकपाळी पुरुषदेहप्रधान मानसिकतेला पटत नाही की काय? ज्यातून आपला देह निर्माण झाला ती प्रोसेस इतकी अपवित्र का वाटावी? स्वत:च्या जन्माच दु:ख इतक जिव्हारी लागाव की ती प्रक्रिया (मासिकधर्म/मासिकपाळी) च घाणेरडी,अस्वच्छ, असुरक्षित (अगदी इतकी की तो धारण करणारा देहच कमजोर वाटून त्या देहाला सुरक्षा देण्याच्या नावाखाली बंधनाच्या जोखडात अडकवून ठेवला/ टाकला.) समजून वेगवेगळ्या प्रकारच्या शुद्धीकरणाची जणू रेलचेलच सुरू झाली आहे.तेही वेगवेगळे नवे-जूने दाखले/उदाहरणे देत,सांगत!!!!! श्रद्धेच भांडवल करत!!! विज्ञान, तत्वांचे खेळ, गणित मांडत!!!!!
हे कितपत योग्य आहे? व का ????