अवघ्या प्राक्तनाला स्वीकारून मी कणखर उभा आहे
चौफेर कलंकित डौल झुगारून मी हे स्वाभिमान साकारला आहे
भूतकाळाचे ग्रहण, आणि वर्तमानाचे गोंदण घेऊन
मी भविष्याचे कोंदण कसे साकारावे?
अविश्वासाची पाळेमुळे घट्ट गिळलेल्याना
मी कोणते बरे बाळकडू पाजावे?
"छत्रछायेत वाढवलेल्या वेलिनी जरी छताचीच उंची झाकु पाहिली
आपलेच म्हणून पुन्हा पुन्हा मात्र त्यांची रक्षाच केली"
खडतर नशिबाच्या छाताडावर स्वतःला भरभक्कम उंचावलय
तरी आभाळभर उंची मात्र अजून आकाशा एवढी दूर आहे
खंड खंड विखुरलेल्या स्वप्नांना तिलांजली द्यावी
की,
पुन्हा मन:निश्चय गाठ बांधून
अखंड ताकदीने उभारी घ्यावी
ह्या द्वीधेला मीच प्रश्न आणि उत्तरही मीच असे
रणणत्या माळरानावर मी स्वकष्टाची सावली साकारेन
प्रत्येक घामाच्या थेंबाने तेव्हा अवघा आसमंत दरवळेल
जीवघेण्या स्पर्धेतील ते आगतिक विषाणू जरी झुंड करून सज्ज आहेत
ध्येयवेड्या प्राक्तनाला परी हे सर्व वर्ज्य आहे....
अरे भेदून टाकल्यायत मी केव्हाच त्या परिणामांच्या चौकटी
प्राक्तनाचा नवा मथळा लीहण्यास मी वारंवार सज्ज आहे....
- श्री:श्रीकांत उत्तम गुंजाळ
मायबोलीवर स्वागत.....
मायबोलीवर स्वागत.....
सुंदर ध्येयासक्त कविता...
हा स्वाभिमान साकारला हवे का ?