आवाहन - ऑनलाईन कविसंमेलनासाठी

Submitted by अ. अ. जोशी on 7 August, 2023 - 02:58
ठिकाण/पत्ता: 
हा कार्यक्रम ऑनलाईन Google Meet वर असणार आहे. त्याबद्दल नंतर कळविण्यात येईल.

ऑनलाईन कविसंमेलनसाठी कविता
पुण्याचे माजी चीफ ऑफिसर व लोकमान्य टिळकांनी गौरविलेले सामाजिक कार्यकर्ते कै आप्पासाहेब भागवत यांच्या १४१व्या जन्मदिनानिमित्त...
पुण्यातील सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तिंवरील कवितांचे ऑनलाईन कविसंमेलन आयोजित करण्याचे ठरवीत आहे. ज्या व्यक्तिंवर कविता करायची आहे त्या सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्ति कोणत्याही विशिष्ठ जाती किंवा धर्मासाठी कार्य करणाऱ्या नसाव्यात अथवा त्यांचेच प्रश्न उचलून धरणाऱ्या नसाव्यात. त्या व्यक्ती राजकीय नसाव्यात किंवा राजकीय क्षेत्राशी संबंधित नसाव्यात. अशा प्रसिद्ध किंवा अप्रसिद्ध व्यक्तींच्या जीवनावर किंवा जीवनातील एखाद्या प्रसंगावर त्या व्यक्तिचा थोडक्यात परिचय देऊन जास्तीत जास्त ३ स्वरचित कविता रचून ११ ऑगस्ट पर्यंत अजय अनंत जोशी, ९९२३८२०८४२ या व्हॉट्सएप क्रमांकावर किंवा suchetanantprakashan@gmail.com या ईमेल पत्त्यावर पाठवाव्यात असे निवेदन करीत आहोत.
आपण सहभागी होणार असल्यास तसे दिनांक ८ ऑगस्टपर्यंत कळवावे म्हणजे पुढील नियोजन सोपे जाईल.
प्राप्त झालेल्या कवितांपैकी आपापल्या निवडक कविता ऑनलाईन कविसंमेलनात सादर करायच्या आहेत. निवडीबाबत आपल्याला कळविण्यात येईल.
*** याबाबत अधिक माहिती वर दिलेल्या क्रमांकावर विचारू शकता. ईमेल पत्ता फक्त कविता देण्याकरिता वापरावा.

माहितीचा स्रोत: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
Tuesday, August 8, 2023 - 02:51 to 14:29
Group content visibility: 
Use group defaults