गोंदण

"ध्येयवेडे प्राक्तन"

Submitted by VaicharikKatta ... on 26 August, 2023 - 04:03

अवघ्या प्राक्तनाला स्वीकारून मी कणखर उभा आहे
चौफेर कलंकित डौल झुगारून मी हे स्वाभिमान साकारला आहे

भूतकाळाचे ग्रहण, आणि वर्तमानाचे गोंदण घेऊन
मी भविष्याचे कोंदण कसे साकारावे?
अविश्वासाची पाळेमुळे घट्ट गिळलेल्याना
मी कोणते बरे बाळकडू पाजावे?

"छत्रछायेत वाढवलेल्या वेलिनी जरी छताचीच उंची झाकु पाहिली
आपलेच म्हणून पुन्हा पुन्हा मात्र त्यांची रक्षाच केली"

खडतर नशिबाच्या छाताडावर स्वतःला भरभक्कम उंचावलय
तरी आभाळभर उंची मात्र अजून आकाशा एवढी दूर आहे

प्रांत/गाव: 

विठ्ठल नामाचं चांदणं

Submitted by पुरंदरे शशांक on 13 October, 2019 - 03:25

विठ्ठल नामाचं चांदणं

त्याच्या अंगणी सांडलं
विठ्ठल नामाचं चांदणं

त्याच्या ह्रदयी गोंदण
विठूनामाचं स्मरण

त्याच्या श्वासी रुणुझुण
जपमाळ नारायण

तोचि होऊनी विठ्ठल
करी विठू गुणगान

विश्वात्मक तुका जाण
अवकाशी संकीर्तन
विठ्ठल नामाचं चांदणं
टाकी आकाश न्हाऊन

गोंदण!

Submitted by चैतन्य दीक्षित on 23 December, 2010 - 22:46

ओळखी पुसल्याच नव्हत्या एकमेकांच्या, म्हणूनच,
ओळखी पुसल्या, तरीही शांत दोघे आज आपण ॥

नांव होते परिचयाचे, होत होते बोलणेही
... आज काळाच्या तलावी, त्या तरंगांचे न कंकण ॥

नागमोडी रानवाटा, पाखरे गेली उडोनी,
बांधले नव्हतेच घरट्याला कधी चाहूलतोरण ॥

भरदुपारी येत गेले मेघ काळे, चिंब पाउस-
-अन् उसासे खिन्न, आले त्या मिठीला पोरकेपण ॥

संधिकाली आजही येतात विस्कटले तराणे,
ओळखीचा स्वर, म्हणूनच ऐकतो गंधाळले क्षण ॥

ओळखीचे फक्त आता ओंजळीतिल चांदणे हे,
चंद्र पुनवेचा निसटला, आणि अंधारात अंगण ॥

ओळखी पुसल्यात साऱ्या, हे कधी विसरू नये मी,
म्हणुन आहे अंतरी, त्या विस्मृतीचे एक गोंदण ॥

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - गोंदण