माणिक बाग प्रोजेक्ट - पिंपरी
पुण्याच्या पिंपरी येथील मगर स्टेडियमच्या समोर चालु असलेल्या वाघेरे यांच्या 'माणिक बाग' प्रोजेक्ट मध्ये कोणी फ्लॅट बुक केले आहे का?
असल्यास कृपया संपर्क साधा किंवा फोन नंबर कळवा. थोडी माहीती हवी आहे.
पुण्याच्या पिंपरी येथील मगर स्टेडियमच्या समोर चालु असलेल्या वाघेरे यांच्या 'माणिक बाग' प्रोजेक्ट मध्ये कोणी फ्लॅट बुक केले आहे का?
असल्यास कृपया संपर्क साधा किंवा फोन नंबर कळवा. थोडी माहीती हवी आहे.
नमस्कार!
मधुरांगणच्या कोल्हापूर शाखेने येत्या २२ सप्टेंबर रोजी, गुरुवारी सायंकाळी पाच वाजता माझा 'गझल - कविता - किस्से व कथा' यांचा समावेश असलेला खालील कार्यक्रम आयोजीत केलेला आहे.
'मथितार्थ सारी शायरी'
हा कार्यक्रम कोल्हापूर येथील केशवराव भोसले सभागृहात होणार असून तो सायंकाळी पाच ते सायंकाळी साडे सहा या कालावधीत होईल. हा कार्यक्रम मधुरांगणच्या सभासदांसाठी आयोजीत केलेला असला तरीही मायबोली सदस्यांनी या कार्यक्रमास येण्यास मधुरांगणच्या पदाधिकार्यांची हरकत नाही. हा कार्यक्रम मी एकटा सादर करतो व त्यात वाद्यवृंद किंवा सूत्रसंचालन नसते.
सन २०१२ मध्ये महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदा अन पंचायत समित्यांच्या निवदणुका होत आहेत. वृत्तपत्रांतील बातम्यांवरुन अनेकांना याबद्दल कल्पना असेलच. आमच्या अहमदनगर जिल्ह्यातील ७५ जि.प. गट अन १५० पं.स. गणांमध्ये मार्च २०१२ ला निवडणुका होणार आहेत. त्यासाठी पॅनेल उभा करण्याचा विचार आहे. या संबंधी ६ महिने अगोदर पासुन जिल्हा स्तरावर कार्यक्रम राबवायचा आहे.
खालील बाबींचा समावेश असेलः
१) निवडणुक लढवु इच्छिणार्या सुशिक्षित तरुणांची निवड करणे. (निवड प्रक्रिया कशी करावी? वृत्तपत्रांत जाहिरात देणे ई?)
खुप दिवसापासुन या ट्रेक बद्दल नुसती चर्चा चालु आहे. गिरीविहारच्या पोस्ट वरुन (पुन्हा एकदा आणि) शेवटी २२-२३ तारीख फायनल केलंय. इछुकांनी नाव नोंदणी करा.
जमलेल्या टाळक्यांवरुन ट्रेकचा प्लॅन इथेच दिला जाईल.
टिप : अनुभवी लोकांनी मार्गदर्शन पर पोस्टी टाकाव्यात.
मुंबईकर :
१] इंद्रधनुष्य
२] गिरीविहार
३] रोहित ..एक मावळा
४] विनय भिडे
५] बाजीराव
पुणेकर :
१] मल्लिनाथ
५ ला सकाळी लवकर निघायच.दापोली ,पुण्याची लोकं ताम्हिणी घाटातून माणगाव ला भेटतील.
तिथून आजंरले, मुरुड कर्दे बीच ,सुवर्णदुर्ग, हर्णे दिपगृह ,गोवा किल्ला.दापोलीत मुक्काम.
६ ला दाभोळ जेट्टी, चंडीका देवी, कोळेश्वर मंदीर , केळशी मार्गे मंडणगड , बाणकोट किल्ला ,दिघे जेट्टीवरुन मुरुड जंजिरा, आक्षीत मुक्काम
७ ला आक्षी माघी गणपती उत्सव करुन परत मुक्कामी घरी...
यात अजुन काही आपल्याला अॅडपण करता येइल.
जाताना आठवणीने मायबोलीचा झेंडा घेउन जाउ...
बाईकची नोंद इथेच करतो म्हणजे सगळ्यांना कळेल..
मुंबई :- बाईक १ ) विनय भिडे
२ ) जिप्सी
३ ) जिप्सीचा मित्र
माबोवर विबासंवर ब-याच साधक बाधक चर्चा झडून गेल्यात. काहींनी आपले अनुभव देखील लिहायला सुरूवात केली आहे. काही सदस्यांना मात्र विबासं हे प्रकरण अजूनही पचायला जड जातय हे दिसून आलय. सर्वांनी जगाबरोबर चालाव, कुणीच मागे पडू नये अशा उदात्त हेतूने अशा सर्व बुज-या विबासंच्छुक सदस्यांसाठी एक कार्यशाळा घ्यावी अशी कल्पना मनी आली आहे.
कार्यशाळेच स्वरूप, अवधी, दिनांक, वेळ, सदस्य शुल्क, आणि मार्गदर्शक कोण असाव यावर चर्चा करूनच कार्यवाही करण्यात यावी. इतर सर्व गोष्टी सर्वानुमते ठराव्यात मात्र कार्यक्रमाच स्थळ पुणे शहर हेच असाव अस सुचवावस वाटत. .
सूचना येउ द्यात.
नमस्कार,
जोगवा या चित्रपटाला ५ राष्ट्रीय मिळाले आहेत.
उत्क्रुष्ट अभिनेता : उपेंद्र लिमये
उत्क्रुष्ट संगीतकार : अजय-अतुल
उत्क्रुष्ट गायक (पुरुष) - हरीहरन
उत्क्रुष्ट गायिका (स्त्री) - श्रेया घोषाल
उत्क्रुष्ट सामाजिक चित्रपट
तसेच 'हरिश्चंद्राची फॅक्टरी' याला सर्व्श्रेष्ठ प्रादेशिक चित्रपट हा पुरस्कार मिळाला.
जोगवा व 'हरिश्चंद्राची फॅक्टरी' च्या सर्व कलाकारांचे व टीम चे अभिनंदन.
नमस्कार मंडळी,
हे गप्पांचे पान अगदी सर्वांसाठी आहे. या, मस्त मनमोकळ्या गप्पा मारा. ह्या पानावर गप्पा मारायला प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे; वय, विषय, वेळ, सामाजिक स्थान - कसलीच मर्यादा नाही.
मैत्री करा, एकमेकांना मदत करा, धम्माल करा. या पानावर नवीन मंडळींनी यावं, मित्र जोडावेत आणि टिकवावेत अशांचे निखळ, निकोप गप्पागोष्टींसाठी माझ्यातर्फे सर्वांचे हार्दिक स्वागत.
कुणी निंदा, कुणी वंदा, माणसे जोडण्याचा आमुचा धंदा!