अभिमान आहे मी महाराष्ट्रीय असल्याचा............

Submitted by आराध्या on 27 June, 2012 - 22:06

अभिमान आहे मी महाराष्ट्रीय असल्याचा...........

maayboli.jpg

महाराष्ट्रात अशी अनेक व्यक्तिमत्वे आहेत ज्यांनी त्यांच्या कर्तुत्वाने पुर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात व जगात आपले नाव कमावले आहे ज्यांचा प्रत्येक मराठी माणसास अभिमान वाटतो तर त्यांना एकत्र एका चित्ररुपात प्रस्तुत करावे यासाठी हा छोटासा "कोलाज" प्रयत्न .

बाकी मला हे मुळीच सांगायचे नाही की जगातील सर्व काही बुद्धिमत्ता,ज्ञान्, तेज हे फक्त मराठी माणसातच भरले आहे ...... परंतु इतर भाषिक लोकांकडे मुख्यता गुजराती, मारवाडी, बंगाली, पंजाबी, तमिळ यांना स्वभाषेविषयी, स्वलोकांविषयी नितांत आदर व अभिमान आहे , ते स्वताच्या लोकांच्या उन्नतीसाठी ज्या प्रकारे एकत्र येउन प्रयत्न करतात तसा प्रयत्न मराठी माणसे खुप कमी प्रमाणात करतात. ते लोक स्वभाषेबद्द्ल किंवा स्वलोकांविषयी चुकुनदेखिल कधी वाइट एकुन घेत नाहीत. तेच मराठी माणसाचे घ्या कुणीही येउन त्याच्या भाषेविषयी, संस्क्रुतीविषयी काहीही चुकीचे बोलले तरी मराठी माणुस तेवढयाच तडपेने उत्तर देत नाही. कुठेतरी मनात न्युनगंड बाळगतो.

आता हेच बघा हिंदी सिनेमात किंवा सिरीयल्समध्ये मराठी माणुस हा नेहमी घरकाम करणारा घरगडी किंवा कामवाली बाई या रुपात दाखवला जातो, का? इतर भाषिक ही कामे करत नाहीत कि काय? पण नाही ते मराठीच दाखवणार.....तेच याच सिनेमात नायक्-नायिकेला मात्र गुजराती,पंजाबी,बंगाली दाखवणार, मग त्या भाषिकांचे रिती-रिवाज , खान-पान , पेहराव , त्यांची संस्क्रुती कशी श्रीमंत आहे, किती राजेशाही व उच्च आहे हे दाखवले जाते आणि मग आपला मराठी समाज त्यांचेच अनुकरण स्वताच्या लग्न समारंभात व इतर कार्यकमात करतो. मी मराठी स्त्रियांना लग्नसमारंभात किंवा इतर कार्यकमात गुजराती पद्धतीने साडी नेसताना खुपदा बघितले आहे पण एखाद्या गुजराती मुलीला तिच्या लग्नात किंवा इतर कार्यकमात कौतुकाने नउवारी नेसताना कधीच पाहीले नाही, का? कारण एकतर आपण आपल्या पेहरावाचे, रितीरिवा़जांचे मार्केटिंग करण्यात कमी पडत आहोत व हे इतर लोक ज्यावेळी मराठी माणुस म्हणजे नोकर माणुस, गरीब लोक, सर्वसाधारण बुद्धिमत्तेचा माणुस असे जाणते अजाणतेपणे बोलत असतात किंवा दाखवत असतात त्यावेळी आपण आवाज उठवत नाही, हे असे मुळीच खपवुन घेणार नाही हा खाक्या कमी पडतो.

तर असेच एकदा आमच्या मित्रपरिवारात आपापल्या राज्यातुन आलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे कोणती यावर चर्चा रंगली व त्यावेळी जी नावे पुढे आली त्यावेळी असे जाणवले कि इतर भाषिकांसोबत तुलना करता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व कर्तुत्ववान व्यक्तिमत्वे तर अगणित आहेत...... त्यावेळी माझ्या मनात हा विचार आला कि या सर्व व्यक्तिंचे एक कोलाज बनवायचे व इंटरनेटवरील महाजाळात ते प्रसिद्ध करायचे कि ज्यायोगे अनेक लोकांना महाराष्ट्रातील कर्तुत्ववान व्यक्तिंची माहीती होइल. फेसबुकवरील भिंतीवर अनेक सकारात्मक प्रतिकीया मिळाल्या, तसेच काही अमराठी भाषिकांनी इतर अनेक प्रसिद्ध व्यक्तिमत्वांची नावे दिली जी मराठी नव्हती व तरीही कर्तुत्ववान होती. मी त्यांना हेच सांगितले कि तुम्ही ज्या व्यक्तिंची नावे दिलीत ती खरोखर कर्तुत्ववान आहेत व मला त्यांचा आदरच वाटतो परंतु ही पोस्ट मी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व कर्तुत्ववान व्यक्तिमत्वांची माहिती देण्यासाठी काढली आहे व त्यामध्ये इतर भाषिक व्यक्तिंचा अनादर करणे हा हेतु मुळीच नाही. जसे एखादया गुजराती माणसाला महात्मा गांधी किंवा अंबानीचे नाव घेताना ते गुजराती आहेत याचा अभिमान मनात कुठेतरी वाटतच असतो तसेच हे आहे. मला हे देखिल सांगावेसे वाटते कि मी स्वताला प्रथम भारतीय समजते व नंतर महाराष्ट्रीयन त्यामुळे कुठे प्रांतिक मतभेद करण्याचा माझा कोणताही हेतु नाही. पण शेवटी आपली आई ती आपली आईच मग आजुबाजुला कितीही प्रेम करणारया मावश्या,आत्या,काक्या असल्या तरी

विषय: 
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

णीषेढ!
फकस्त दादासाहेब फाळक्यांच्या फोटू भव्ती नांव लिव्लंया.
सग्ळ्यांच्या फोटूला नांव लिवा. न्हायतर आनदोलन कर्नयात यील
(धडाडीचा कार्यकर्ता) इब्लिस

अत्र्यांचा फोटो का नाही ? त्यांच्यासारखे अष्टपैलू व्यक्तिमत्व गेल्या दहा हजार वर्षात झाले नाही.

सडक या हिंदी सिनेमात उत्तम अभिनय केलेले मराठी अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या छायाचित्राचा समावेश करणार का या कोलाजमधे ?

@ भरत मयेकर

धन्यवाद शुद्धलेखनाबद्द्ल........

<<<<< बाकी काही वाचत नाही <<<<<

नका वाचु हो, तुम्हाला कोणी आग्रह करीत नाही , मी कोणी मोठी लेखिका नाहीच आहे कि माझा लेख लोकांनी वाचलाच पाहीजे..... इतके दिवस जे मनात होते ते फक्त लिहुन काढले बस इतकेच......... त्यावर इतर कोणी कितीही टवाळी केली तरी मला काही मोठा फरक पडत नाही आहे...... चालु द्या तुमचे...........

मी कोणी मोठी लेखिका नाहीच आहे कि माझा लेख लोकांनी वाचलाच पाहीजे<<
लेख??
हे नेटवरून फोटो मिळवून एकत्र डकवलेत एका इमेजमधे. लेखाचा मजकूर कुठेय?

@ नीधप

मी कोणी मोठी लेखिका नाहीच आहे कि माझा लेख लोकांनी वाचलाच पाहीजे<<
लेख?? <<<<<<<

हे मी माझ्या वरील प्रतिक्रियेसाठी लिहीले आहे ज्यावर भरत मयेकर यांनी "बाकी काही वाचत नाही" अशी स्वताची प्रतिकीया दिली आहे..........

@ किरण

अरे हो सदाशिव अमरापूरकर राहिलेच की....... त्यांचा देखिल समावेश करायला हवा..... ते देखिल हिंदीत नाव कमावलेले उत्तम अभिनेते आहेत......

विषयातील भावनेशी जरी सहमत असलो तरी वरील एका प्रतिसादात महाराणी यानी जे म्हटले आहे ~ "काजोल विषयी तीची आई आणि मावशी ज्या हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध नायिका आहेत त्या मराठीच आहेत".... त्याविषयी रोखठोकपणे इतकेच म्हणतो की नूतन आणि तनुजा यानी स्वतःला कधीच महाराष्ट्रीयन म्हणवून घेतले नाही. दोघी कधीही मराठी बोलत नसत.

डॉ.श्रीराम लागू यांच्या 'लमाण' आत्मचरित्रातील हा उल्लेख पाहा :

".....सामाजिक कृतज्ञता निधीसाठी आम्ही 'लग्नाची बेडी' हे नाटक बसविण्याचे निश्चित केल्यावर पात्रांची निवड करताना 'रश्मी' च्या भूमिकेसाठी तनुजाला विचारावे असे ठरले. तिची माझी ओळख असल्याने मी तिला घरी भेटलो. पण तिच्याबाबतीत प्रश्न वेगळाच होता. ती जरी मराठी कुटुंबात जन्मली असली तरी सारे शिक्षण कॉन्व्हेण्टमध्ये आणि परदेशी झालेले असल्याने तिला मराठी बोलण्याची अजिबात सवय नव्हती. मराठी तर वाचताही येत नसे अजिबात आणि हिंदी चित्रपटातली हीरॉईन म्हणजे एकूण सामाजिक जाणिवेचा उजेडच ! तरीही तिला आग्रह करून घोड्यावर बसविले. भाषेचा प्रश्न सोडवण्यासाठी मी स्वतः सबंध लग्नाची बेडी वाचून रेकॉर्ड केले आणि ती कॅसेट तनुजाला दिली भाषण पाठ करण्यासाठी. मग मारून मुटकून का होईना तनू तयार झाली...."

अशा "संस्कारा"त वाढलेली ही नटी केवळ तिचे आडनाव मराठी आहे म्हणून महाराष्ट्रीयन होते का ? 'काजोल' बद्दल तर काही लिहायचेही कारण नाही.

कोल्हापूरात जयप्रभा स्टुडिओत 'झाकोळ' चित्रपटाचे शूटिंग चालू होते. त्या संदर्भात तिथले तंत्रज्ञान सांगतात की त्या पूर्ण महिन्यात डॉ.लागू आणि तनुजा यांचे सेटबाहेरील संवाद फक्त आणि फक्त इंग्रजी भाषेतच चालत. त्यामुळे त्या दरम्यान 'कोल्हापुरी मातीतील कामगारांना' ही जोडी कधी आपली वाटलीच नाही.

नूतनविषयीची अशीच कथा....पण राहू दे. ज्याना या दोघी 'अस्सल महाराष्ट्रीयन" वाटतात त्याबद्दल त्याना तशी समज करून घेण्याचे स्वातंत्र्य आहे इतकाच अर्थ.

अशोक पाटील

@ अशोक पाटील

तुमच्या प्रतिसादाबद्दल व दिलेल्या माहीतीबद्द्ल धन्यवाद.......

ज्याना या दोघी 'अस्सल महाराष्ट्रीयन" वाटतात त्याबद्दल त्याना तशी समज करून घेण्याचे स्वातंत्र्य आहे इतकाच अर्थ

नाही हो तसा समज वगैरे करुन घेण्याचा प्रश्नच येत नाही....... एक खंत मात्र वाटली की नुतन तनुजा या ज्या संस्कारात वाढल्या त्याच प्रकारच्या संस्कारात सध्या महाराष्ट्रातील अनेक मराठी कुटुंबातील मुले वाढत आहेत ज्यांना मराठी भाषेत बोलायचीही लाज वाटते व आपल्याला मराठी कसे नीट वाचायला किंवा नीट लिहायला जमत नाही याचे ते व त्यांचे पालक मोठ्या कौतुकाने वर्णन करतात Sad

अत्र्यांचा फोटो का नाही ? त्यांच्यासारखे अष्टपैलू व्यक्तिमत्व गेल्या दहा हजार वर्षात झाले नाही.

एक खंत मात्र वाटली की नुतन तनुजा या ज्या संस्कारात वाढल्या त्याच प्रकारच्या संस्कारात सध्या महाराष्ट्रातील अनेक मराठी कुटुंबातील मुले वाढत आहेत ज्यांना मराठी भाषेत बोलायचीही लाज वाटते व आपल्याला मराठी कसे नीट वाचायला किंवा नीट लिहायला जमत नाही याचे ते व त्यांचे पालक मोठ्या कौतुकाने वर्णन करतात

माझ्या ओळखीच्या एका गृहस्थाने मला सांगितले,
'अहो, शेकडो, नव्हे हजारो वर्षे, धोतर साड्या नेसल्या, घोकून घो़कून संस्कृत श्लोक, गीता म्हंटली, फक्त वेद नि तसले काहीतरी अगम्य, त्याचाच रोज अभ्यास केला! संध्या केली, गायीची पूजा केली, वरण भात नि अळूचे फदफदे खाल्ले - जाती पाती कटाक्षाने पाळल्या! अधिक 'शुद्ध' रहायला, अस्पृश्यता चालू केली, लहान मुलींचे म्हातार्‍या मणसाशी लग्न करून त्यांना विधवा केले, नि त्यांचे केस भादरले. ज्या वयात नटावे थटावे असे वाटते, शोभते त्या वयात फक्त लाल आलवण नेसायला लावले. तारुण्यसुलभ विचार मनात आले असे समजले तरी त्यांना विहिरीत ढकलून देत, सोने चांदी आम्हा मृत्तिकेसमान असे म्हंटले, भौतिकवाद त्याज्य मानला.

नि काय हाती आले? इतर सगळे लोक श्रीमंत झाले, मज्जा केली, आपल्यावरच राज्य केले, नि आपण?

आता कंटाळा येतो हो, काही बदल नको का? '

जर असे आढळले की 'आपल्या जुन्या संस्कृतीत काही चांगले आहे' तर ते घेतीलच!

मी पण माझ्या मुलांना मस्त इंग्लीश शिकवणार. अमेरिकेत सेटल करणार. आणि मग मराठीतून शिका म्हणून प्रचार आणि प्रसार करायला मला भरपूर वेळ मिळेल. माझ्यानंतर माझी अमेरिकेतली मुलं प्रौढ होतील, मग ते ही भारतातल्या संस्कृतीबद्दल चिंता करतीलच.

मला वाटतं मुलांनी न्यूयॉर्क सोडून इतरत्र कुठे सेटल होऊ नये. तितकं इन्कम मिळेल अशी मेहनत मला आधी करून घ्यावी लागेल. मराठी हा विषय ऑप्शन ला टाकावा असा विचार आहे. उगीच वेळ जाईल. नंतर सेटल झालं आणि डॉलर्स मिळायला लागले कि इथून कुणाला तरी मराठी शिकवण्यासाठी पाठवता येईल. एकाच्या पोटापाण्याची व्यवस्था होईल. नेटवर हे उदाहरण लिहायला होईल..

आणि नंतर भारतातल्या व्यवस्थेविषयी लिहायला जन्म पडलाय... कसं ?

झक्कीसाहेब , प्रतिक्रियेबद्द्ल धन्यवाद....... माझे स्वताचे वैयक्तिक मत असे आहे की जगात तुम्हाला, तुमच्या मताला, भाषेला तेव्हाच किंमत मिळते जेव्हा तुम्ही पैश्याने, बुद्धिने,क्रुतीने तुमचे श्रेष्ठत्व सिद्ध करता...... जगात शेवटी जेत्याचा भाषेला किंमत मिळते त्याअर्थी सध्या इंग्रज व त्यांची इंग्रजी ही जेत्यांची भाषा म्हणुन जगभर मान्यता पावली आहे.... ज्यावेळी हिंदुची सत्ता होती त्यावेळी संस्क्रुत भाषेला मान होता, मुस्लिम राजवटीत तोच मान अरबी,फार्सी भाषेला मिळाला, शिवरायांनी स्वकर्तुत्वाने स्व-राज्य निर्माण केले त्यावेळी मराठी भाषेला राणीपदाचा मान मिळाला व हल्लीच्या काळात इंग्रजांच्या गुलामीत राहुन इंग्रजीने तो मान पटकावला. परंतु तुमच्या ओळखीच्या ग्रुहस्थाने जो निश्कर्ष काढला त्याचा व मराठीचा मान राखण्याचा काय सबंध आहे ते कळले नाही.......

ब्राम्हण ज्यावेळी वेद पठणात मग्न होते व इतर क्षत्रिय समाज फक्त परकियांनी बहाल केलेल्या जहागिरी सांभाळत होता त्यावेळी छत्रपती शिवरायांसारखा माणुस परकिय राजवटींविरुद्ध लढा देउन स्वराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न करतच होता, त्यांच्या कर्तुत्वाने व दुरद्रुष्टीने मराठीस वैभव प्राप्त झाले. त्यावेळी ते काय फक्त देव देव करत बसले नव्हतेच व हे वैभव उभारताना त्यानी कोणत्याही परकिय भाषेचा आधार घेतला नव्हता....... उलट त्यांच्या जेतेपणामुळेच ते बोलत असलेल्या भाषेला त्यांनी किंमत मिळवुन दिली.....

सोने चांदी आम्हा मृत्तिकेसमान असे म्हंटले, भौतिकवाद त्याज्य मानला

आता भौतिकवाद त्याज्य मानायचा प्रकार अध्यात्मात केव्हापासुन आला माहीत नाही........ परंतु अध्यात्मात उच्च पातळीवर जाण्यासाठी लोक ज्या देवतांची पुजा-अर्चना करतात ते देवदेखिल कधी असे पलायनवादी दिसले नाहीत उदा. श्री रामप्रभु शस्त्राने सुसज्ज , स्वताची पत्नी हरवल्यावर हातावर हात धरुन न बसता रावणाविरुद्ध सशस्त्र लढा दिला, श्री क्रुष्णाने हातात सुदर्शन चक्र धारण करुन अर्जुनाला अन्याविरुद्ध लढ सांगितले , रामदास स्वामींनी देखिल फक्त राम राम करत बसा व बाकी सर्व सोडुन द्या असे सांगितलेच नाही उलट त्यांनी श्री मारुतीचा आदर्श समोर ठेउन बलोपासना करावयास सांगितली जे आजकालची मुले सलमान खानचा आदर्श ठेउन करतात Happy

आता कंटाळा येतो हो, काही बदल नको का?

अहो बदला कि कोण सांगत आहे की तुम्ही बदलु नका म्हणुन, ज्या ज्ञानाने तुमची प्रगती होईल, आयुष्यात पैसा, मानमरातब , स्थैर्य मिळेल ते मिळवा, तो तुमचा अधिकारच आहे.... पण त्याचा अर्थ असा होत नाहीच कि त्यामध्ये तुम्ही तुमचा स्वाभिमान गहान ठेवा..... तुमच्या प्रगतीसाठी इंग्रजी शिकणे आवश्यक आहे तर ते शिका,त्यातुन संवाद साधा....अहो माझ्या प्रगतीसाठी व पैसा मिळवण्यासाठी उद्या मला जपानी किंवा फ्रेंच शिकावे लागले तर तेही मी आनंदाने शिकेन पण त्यासाठी जर मला कोणी तु मराठी बोलायचे सोडुन दे किंवा शी मराठीत काय बोलायचे असे ऐकवणार असेल तर मी का ऐकुन घेउ , इंग्रजीतुन सर्व जग बोलते म्हणुन जगाशी संवाद साधण्यासाठी मी इंग्रजी नक्की बोलेन परंतु त्याचा दुसरा अर्थ हा होतच नाही कि तुमची मायबोली ही टाकाउ आहे असे तुम्ही माना व दुसरयांना ते कौतुकाने सांगा....

मला हेच कळत नाही की मराठी, महाराष्ट्र केले की लगेच आपण इंग्रजीविरुद्ध आहोत किंवा प्रगतीविरुद्ध आहोत असे लोक का समजतात, अरे काय ते सर्व ज्ञान फक्त इंग्रजीमध्येच आहे का , बाकी सर्व भाषा काय बिनडोक आहेत...... न कळे Sad

न्यूयॉर्क सोडून इतरत्र कुठे सेटल होऊ नये.
नाही हो, इतर पुष्कळ ठिकाणी आहेत सेटल व्हायला. तिथे बक्कळ पैसा साठवता येईल, मग न्यू यॉर्कला नुसते 'जिवाचे न्यू यॉर्क ' करायला काही दिवस जाऊन यायचे.
तितकं इन्कम मिळेल अशी मेहनत मला आधी करून घ्यावी लागेल.
अमेरिकेत पैसे मिळवायचे तर मेहेनत कसली करायची? मेहेनत करावी लागत नाही इथे, अगदी सुखी आयुष्य, म्हणून तर लोक इथे येतात. आठवीपर्यंत ए बी सी डी सुद्धा लिहायला वाचायला न शिकलेली माणसे इथे येऊन झक्कपैकी मज्जेत, पैसे कमावून सुखात रहातात.
भारतात कुणा मूर्ख माणसाच्या मनात आले सगळे आपल्यासारखे बिनडोक आहेत, एकापेक्षा जास्त भाषा येणार नाहीत, तर फक्त इंग्रजीच शिकवले पाहिजे!! नि सगळे लागले मेंढरासारखे त्याच्या मागे. नि आता धड इंग्रजीहि नाही, मराठीहि नाही असले काहीतरी होऊन बसले आहे!
आपल्या जुन्या गोष्टींचा, छत्रपती श्री. शिवाजी महाराज, पहिले बाजीराव, इ. चा अभिमान असावा. रामदास, तुकारामादि संत, कुसुमाग्रज, बालकवी, पु. लं दे इ. कवी, लेखक यांच्या मराठीबद्दल अभिमान आहे मला.

बाकी इतर लोकांचा प्रसिद्ध असण्याचा नि मराठीपणाचा काही संबंध नाही!

मराठी बोलायची लाज वाटणारे, महाराष्ट्रीय पद्धती सोडून करवा चौथ नि रेव्ह पार्टी करणारे महाराष्ट्रीय, त्यांची लाजच वाटायला पाहिजे, अभिमान कसला!

@ झक्की

भारतात कुणा मूर्ख माणसाच्या मनात आले सगळे आपल्यासारखे बिनडोक आहेत, एकापेक्षा जास्त भाषा येणार नाहीत, तर फक्त इंग्रजीच शिकवले पाहिजे!! नि सगळे लागले मेंढरासारखे त्याच्या मागे. नि आता धड इंग्रजीहि नाही, मराठीहि नाही असले काहीतरी होऊन बसले आहे!
आपल्या जुन्या गोष्टींचा, छत्रपती श्री. शिवाजी महाराज, पहिले बाजीराव, इ. चा अभिमान असावा. रामदास, तुकारामादि संत, कुसुमाग्रज, बालकवी, पु. लं दे इ. कवी, लेखक यांच्या मराठीबद्दल अभिमान आहे मला. बाकी इतर लोकांचा प्रसिद्ध असण्याचा नि मराठीपणाचा काही संबंध नाही! मराठी बोलायची लाज वाटणारे, महाराष्ट्रीय पद्धती सोडून करवा चौथ नि रेव्ह पार्टी करणारे महाराष्ट्रीय, त्यांची लाजच वाटायला पाहिजे, अभिमान कसला!

अनुमोदन १०००००++++++++

अमेरिकेत पैसे मिळवायचे तर मेहेनत कसली करायची? मेहेनत करावी लागत नाही इथे, अगदी सुखी आयुष्य, म्हणून तर लोक इथे येतात. आठवीपर्यंत ए बी सी डी सुद्धा लिहायला वाचायला न शिकलेली माणसे इथे येऊन झक्कपैकी मज्जेत, पैसे कमावून सुखात रहातात.
भारतात कुणा मूर्ख माणसाच्या मनात आले सगळे आपल्यासारखे बिनडोक आहेत, एकापेक्षा जास्त भाषा येणार नाहीत, तर फक्त इंग्रजीच शिकवले पाहिजे!! नि सगळे लागले मेंढरासारखे त्याच्या मागे. नि आता धड इंग्रजीहि नाही, मराठीहि नाही असले काहीतरी होऊन बसले आहे!

मुलं अजून लहान आहेत हो. अजून साठ वर्षांनी असंच सांगतील लोकांना

@ अवधुत

जो स्वतःला मराठी समजतो तो मराठी ----- अनुमोदन

शेवटी ज्यांना स्वता:ला मराठी समजण्यातच कमीपणा वाटतो ते लोक पुढे स्व्-कर्तुत्वाने कितीही मोठे झाले तरी ते मराठी आहेत, कोणीतरी आपल्या घरचे, आपल्या मातीतले आहेत या बद्द्ल इतर स्वत:ला मराठी समजणारया लोकांनी का बरे अभिमान बाळगावा.........