समीर सरवटे यांना भेटण्यासाठी मुंबई गटग

Submitted by विनय भिडे on 3 May, 2012 - 00:55
ठिकाण/पत्ता: 
हॉटेल सूरज व्हेज ट्रिट, राम मारुती रोड, बेडेकर हॉस्पिटलजवळ, लॅक्मे सलोनसमोर, ठाणे (पश्चिम)
विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
रविवार, May 6, 2012 - 01:30 to 03:00
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

२/३ दिवसच आधी सांगितल्याबद्दल क्षमस्व. पण नेमका कुठला दिवस मोकळा मिळेल हे माहीत नसल्याने थोडा उशीर झाला. तेव्हा ज्यांना शक्य असेल ते या. सर्वांनाच भेटायला आवडेल.

दरवेळी उभ्या उभ्या गडकरीला भेटून मग कुठेतरी खादाडीला जायचं जरा कंटाळवाणी होतं आणि या उन्हाळ्यात जरा जास्तच बोअर होईल. तर यावेळी आधीपासूनच अशी जागा ठरवायची का की जिथे सर्वांना बसून गप्पा मारता येतील आणि लगे हाथ खादाडीही करता येईल?

बरं मग हॉटेल सूरज व्हेज ट्रिट, राम मारुती रोड, बेडेकर हॉस्पिटलजवळ, लॅक्मे सलोनसमोर - इथे चालेल का? स्टेशनपासूनही जवळ आहे, जागा निवांत आहे आणि त्यांना दंगा केलेला चालतो Wink

हॉटेल सूरज व्हेज ट्रिट, राम मारुती रोड, बेडेकर हॉस्पिटलजवळ, लॅक्मे सलोनसमोर, ठाणे (पश्चिम) हा पूर्ण पत्ता.

त्यांना दंगा केलेला चालतो >>>> म्हंजे मंजी इथे ऑलरेडी दंगा करून आलेली दिस्ते. मंजे तू येताना बुरखा घालून ये. नाहीतर तुला पाहिल्यावर आम्हा सगळ्यांनापण बाहेर काढतील.

रविवार म्हणजे रेल्वेचा मेगा ब्लॉक....मालाड ते ठाणे प्रवासाला एरवी जिथे दीड तास लागतो तिथे अशा वेळी किमान अर्धा एक तास तरी जास्तच लागणार....त्यामुळे इच्छा असूनही नाही येऊ शकणार....
मजा करा..माझ्या सदिच्छा आहेतच आपल्याबरोबर.

समीरभाऊंच्या सदस्यनामास १२ वर्षे पुरी होत आहेत. प्रत्यक्षात खूप जास्त वर्षे मायबोली अस्तित्वात आहे! कृतज्ञताप्रदर्शनही होऊ द्यात.
Happy
-गा.पै.

Pages