चाल-ढकल Procrastination

Submitted by Mandar Katre on 2 October, 2012 - 13:31

आपल्यापैकी सर्वांना थोडीफार चालढकल करण्याची सवय असते , पण काही लोकांच्या बाबतीत हा फार मोठा स्वभावदोष ठरतो व त्यामुळे अनेक मानहानीकारक प्रसंग उद्भवू शकतात.

शास्त्रीय दृष्ट्या विश्लेल्षण केल्यास या चालढकल करण्याच्या प्रवृत्ती मागे काही वैज्ञानिक आणि भावनिक कारणे असू शकतात.त्यातील मुख्य भावनिक कारण म्हणजे माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती-"कठीण किंवा त्रासदायक काम पुढे ढकलल्याने जो तात्पुरता आनंद किंवा सुटका "मिळते ते आहे .आणि मग त्याचीच सवय लागते .

मात्र महत्त्वाची कामे पुढे ढकलून कमी महत्त्वाची /आनंद-दायी कामे करणे याचे अतिशय घातक परिणाम होऊ शकतात. मुख्य म्हणजे माणसाची कार्यक्षमत कमी होते.तसेच, वेळेवर कामे पूर्ण न केल्याने येणारा ताण-तणाव / भीती/ नैराश्य/guilt येणे आणि तुमची विश्वासार्हता कमी होते.लोक तुमच्याकडे संशयाने पाहू लागतात,बिनभरवशाचा म्हणून हिणवू लागतात.

मग कंटाळा /बेजबाबदार-पणा /आळस आणि कोडगेपणा याच्या मिश्रणातून एक अति-टाकाऊ व्यक्तिमत्त्व जन्मास येते.आत्मविश्वास /इच्छाशक्ती चा अभाव आणि self defeating mentality ही कारणे यापाठी असू शकतात. यामागे काही प्रमाणात आजकाल बोकाळलेली सुख-लोलुप वृत्ती आणि कष्ट करण्याची सवय /वृत्त्ती नसणे हेही कारण असू शकते.

वैज्ञानिक दृष्ट्या विचार केल्यास मेंदूतील prefrontal cortex या भागाचे कमी उद्दीपन झाल्यास असे प्रकार घडतात. मुख्यता: विद्यार्थी वर्गात हा प्रकार जास्त आढळतो आणि मग त्यातूनच वर्षभर अभ्यास न करता परिक्षेच्य वेळी घाई-गडबड करून कसातरी अभ्यास पूर्ण करण्याचा खटाटोप केला जातो.त्याला अनुक्रमे planning fallacy आणि student syndrome असे म्हटले जाते.

तर मंडळी ,आपल्या कार्यक्षमतेवर अतिशय मोठ्या प्रमाणात या चाल-ढकल करण्याच्या दुर्गुणाचा परिणाम होत असतो.ज्यांना आपल्या स्वभावात हा दोष असल्याची शंका असेल,त्यांनी प्रयत्न-पूर्वक तो दोष निस्तरायचा प्रयत्न करावा,किंवा वेळप्रसंगी मनो-वैज्ञानिक तज्ज्ञाची मदतही घ्यावी

-संदर्भ-विकिपीडिया

विषय: 
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users