माधुरी मिडल्क्लास - स्टार प्रवाह

Submitted by मुग्धटली on 28 November, 2013 - 00:44

स्टार प्रवाहवर कालपासुन एक नवीन मालिका सुरु झाली आहे. स्टार वनवरच्या सुप्रसिद्ध साराभाई v/s साराभईची ही कॉपी आहे, पण मालिका छान काढली आहे.
नावः- माधुरी मिडल्क्लास
वाहिनी:- स्टार प्रवाह
प्रसारण वेळ:- रोज रात्री ९:३० ते १०:३०
कलाकारः-
१. अमिताभ राजे Amitabh Raje.jpg (साराभईमधल्या सतीश शहाच्या रोलमध्ये)
२. माया राजेMaya Raje.jpg (साराभईमधल्या सतीश शहाच्या बायकोच्या (नाव नाही आठवत) रोलमध्ये)
३. डॉ. अजिंक्य राजे Dr. Ajinkya Raje.jpg (साराभईमधल्या सुमित राघवनच्या रोलमध्ये)
४. माधुरी राजे Madhuri Raje.jpg (साराभाईमधल्या रुपा गांगुलीच्या रोलमध्ये)
५. रोमेश राजे Romesh Raje.jpg (साराभाईमधल्या रोसेशच्या रोलमध्ये (हे पण नाव आठवत नाही)

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मूळात (सिरीयलमधल्या) मराठी बायका हायक्लास होऊन होऊन किती होणार?
Wink

साराभाई एक अफलातून सिरीयल आहे.
एकूण एक पात्रं नमुने होते.
पण सगळ्यात लाडकी मॉमा आणि रोशेस .
आणि रोशेसच्या अफलातून कविता.

'टूबडूक टूबडूक टाडा'

रत्नापाठक ची माया.....तर माईल स्टोन होता.... त्यात वरची अभिनेत्री बसेल का ? >प्रचंड अनुमोदन. हाय क्लास सेसायटीच्या बाईचा रोल तिने काय केला होता. अजिबात फार्सिकल न वाटता आरडाओरडा न करता.. इंदू, रोसेश, मोनिषा
सतिश शाह तर परफेक्ट होता त्या रोलमधे. बेरकीपणा, भोळसटपणा स्पष्ट जमायचा त्याला. त्याची आणि रोसेशची जुगलबंदी तर महान... सतिश शहाचीचे आर माधवनबरोबर एक सीरीयल होती (हा पंजाबी, माधवन तमिळ) ती पण क्लास सीरीयल होती.
मला साराभाई मधे सुमीत राघवन सर्वात जास्त आवडायचा. आजूबाजूला एवढे नमुने असतील तर साध्यासरळ माणसाचे काय हाल होतील ते चेहर्‍यावर सही दाखवायचा तो.
त्या वरच्या फोटोमधे सासू पेक्षा सून थोराड वाटतेय. >>>>> १००% अनुमोदन...

ही मालिका पाहण्यापेक्षा यूट्यूबवर जाऊन पुन्हा साराभाई vs साराभाईचे भाग पहावेत म्हणते मी.... रोशेस कसला क्युट दिसला होता त्यात Happy टूबडूक टूबडूक टाडा' >>> परत १००% अनुमोदन...
आणि सुमीत राघवनपण अफलातून !!!

साराभाईची बिल्कुल म्हणजे बिल्कुल सर नाही.... Angry
>>ही मालिका पाहण्यापेक्षा यूट्यूबवर जाऊन पुन्हा साराभाई vs साराभाईचे भाग पहावेत म्हणते मी.... रोशेस कसला क्युट दिसला होता त्यात स्मित टूबडूक टूबडूक टाडा' >>>> अनेक अनुमोदन!!

सगळ्या पोस्टींना मम!

मुळात अगदी हिंदीतही त्या सिरिअलचा रिमेक बनवायचा प्रयत्न केला ना.. वेगळे स्टार्स घेऊन तरी ती तितकी क्लास होणार नाही.

गुजर गयेssssss पोपट काका
नबे साल जीलिया यहा
शौक से की जीये जी
उनकी शोकसभा Proud

मला हेच गाणं आठवतं आईये मेहरबाँ ऐकुन Rofl
ऑसमेस्ट होती ती सिरिअल

रत्ना पाठक शहा अत्यंत गुणी अभिनेत्री आहे. अशा कलाकारांनी खरं तर या माध्यमासाठीपण वेळ द्यायला हवा. तिची इधर उधर मालिका आठवतेय का कुणाला ? दोघी बहिणींनी धमाल केली होती त्यात. ती अचानक बंद झाली मग बर्‍याच वर्षांनी परत सुरु झाली. ती मात्र मी बघितली नाही.

प्लीजच मी ही मालिका बघणं शक्यच नाही... अजूनही तू नळीवरून साराभाईचे जमतील तेवढे भाग एका बैठकीत बघून काढते... त्याची भ्रष्ट नक्कल सहनच होणार नाही.

तसंही हल्ली मालिकांमध्ये (विशेषतः स्टार प्रवाह वर) स्टार प्लसवरील हिंदी मालिकांची भ्रष्ट नक्कल करणार्‍या मराठी मालिका करण्यात चढाओढ सुरू झालेय... देवयानी (प्रतिज्ञा - प्रतिग्या), मानसीचा चित्रकार तू ( दिया और बाती हम), पुढचं पाऊल (साथिया) आणि आता ही...

वरीजनल कंटेट सापडत नाय की एका ष्टोरीवर दोघांचे टीआरपी साधतात? प्रॉडक्शन हाऊसलाच माहीत

आजच पोस्टलेलं थोपु वर...

नवी मालिका आलेय स्टार प्रवाह वर "माधुरी मिडलक्लास". हल्ली सगळ्या वृत्तपत्रांमध्ये मालिकांच्या पानभरून जाहीराती देण्याची आगळी शक्कल लढवलेय...
तर या मालिकेची म.टा. च्या मुख्यपृष्ठावरच पानभर जाहीरात - वृत्तपत्राचे तुम्ही कुठले कुठले उपयोग करता?
तर या मिडलक्लास माधुरीने यादीच सादर केली होती... त्यात एक उपयोग - "कांद्याच्या भजीचे तेल सोकायला!!!" (!?!?!?) ---- भाषांतरकार सोकावलेत... दुसरं काय!!!

रत्ना पाठक, खरंच खूप छान काम करते आणि सुप्रिया पाठकपण. साराभाईची सर नवीन मालिकेला येईल असं वाटत नाही, ती a-1होती.

रत्ना पाठकपण सुनेपुढे यंग वाटायची तसेच इथे दाखवायचा प्रयत्न केला असेल.

मला स्वतःला तरी किशोरी आणि अतुल परचुरे आवडले आहेत. रोमेश (साराभाईमधला रोसेश) कंप्लीट गंडला आहे. पण इथे मायाच्या जावयाचा(यातही त्याच नाव दुष्यंतच आहे) रोल करणारा एक नंबर आहे. गुजराती स्टाईलने मराठी बोलण जमलय त्याला.

मला ह्या पोस्ट्स वाचून सुचलं की आपण साराभाई vs साराभाई मालिकेवर काढूया ना एक धागा! म्हणजे मान्य आहे की ती मालिका आता सुरू नाहीये, पण त्यानिमित्ताने त्या जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा देता येईल आणि पोटभर हसताही येईल... Happy कशी वाटली आयडिया?

साराभाइ व साराभाइ भारी होती.
आम्ही खुप रेग्युलरली नाही पाहिलेली.
पण रिपिट टेलीकास्ट मधले काही एपिसोड पाहिलेत. Happy

सगळेजण भारीच अभिनय करायचे आणि विनोदही ओढुन ताणुन नसायचेत.

रत्ना पाठक महान आहे. देहबोली, चेहरा सर्वच बोलतं. Happy

पण मराठी मालिकेच्या मराठी जाहिरातीचं भाषांतर कशाला करायला लागतंय??>> मान्य! हे एका वेगळ्या पोस्टसाठी खरडलं होतं... " १ जिंगल आठवतेय क्लोज अप ची... श्वास माझं ताजं ताजं... मला पटकन आठवलं "येथे बोकडाचं ताजं ताजं मटण मिळेल..." आणि त्यावर हे अनुषंगाने खरडलं गेलं...

विषयांतराबद्दल माफी करा.

पण मराठी मालिकेच्या मराठी जाहिरातीचं भाषांतर कशाला करायला लागतंय??>> मान्य! हे एका वेगळ्या पोस्टसाठी खरडलं होतं... " १ जिंगल आठवतेय क्लोज अप ची... श्वास माझं ताजं ताजं>>>> ड्रिमगर्ल, मला हे जिंगल ऐकताना गाणार्‍याला/रीला बद्धकोष्ठतेचा त्रास आहे की काय अस कायम वाटत.