चिंधी : ६

Submitted by सोहनी सोहनी on 18 October, 2021 - 01:28

चिंधी : ६

अहिर???
तू इथे? हे सगळं काय आहे?? काय चाललंय?? मी मुर्खा सारखी शोधतेय तुला, आणि तू इथे कसा आला?? काय प्रकार चाललाय इथे?? ती बसलीये ती कोण आहे ?? माणूस आहे कि पिशाच्च ?? सांग मला आत्ताच, कारण माझं मन वेगळाच विचार करायला धावतोय?? सांग . . .
मी त्याची कॉलर पकडून त्याला विचारात होते.
त्याने मला पुन्हा झिडकारलं आणि बेफिकिरीने म्हणाला " तुझं मन योग्य त्याच बाजूने विचार करतोय, हे सगळं घडवून आणलंय, त्या अण्णांनी मधेच तुला वाचवायचा विचार नसता केला ना तर तुला आमचे खरे चेहरे हि दिसले नसते ना अण्णांचा जीव गेला असता ना आम्हाला इतकी वाट पाहावी लागली असती"

कसली वाट अहिर?? मी आवंढा गिळत म्हणाले.

" ती समोर दिसतेय "चिंधी" तिला तुझं शरीर प्राप्त होण्याची वाट,
आम्ही काळ्या शक्तींना पुजतो, ती पिढ्यानपिढ्या आमच्या घराण्याला बरकत देण्यासाठी बद्ध आहे, त्याच्या बदल्यात आम्हाला फक्त आमच्याच घरातल्या एका स्त्रीचं शरीर द्यावं लागलं, आजोबांनी आजीला अर्पण केलं बाबांनी आईला आणि आता मी.
आमच्या साठी तिने तिचं शरीर गमावलं, आजोबांच्या वेळेस विधी चालू असताना अचानक त्यांच्यावर जंगली प्राण्यांनी हल्ला केला आणि तिचं संपूर्ण शरीर छिन्न विछिन्न केलं, त्या जखमा ते व्रण सगळे त्या हल्ल्यातले आहेत, तिच्या अफाट शक्तींच्या ताकतीने तिने स्वतःला वाचवलं, पण ते शरीर लवकर नष्ट होणार होतं, म्हणून तिच्या सांगण्यावरून आजोबांनी आजीला तिच्या स्वाधीन केलं, तिने आजीच्या शरीरातील चेतना स्वतःच्या शरीरात घेतली आणि . . . ."

तुम्ही नालायक लोक मूर्ख बनलात, डोक्यावर पडलात, तिने हूल दिली आणि तुम्ही शहाणी लोक स्वतःला गुलाम बनवून घेतलं, त्याच म्हणणं पूर्ण व्हायच्या आधी मी रागाच्या उद्रेकाने बोलले.

त्याने पुन्हा माझ्या कानाखाली वाजवली.
मी स्वतःपेक्षा ज्याच्यावर प्रेम केलं तो असा राक्षस निघेल मला वाटलं नव्हतं, अप्पांचं काही नाही, पण अहिर. . .
माझं खूप प्रेम होतं त्याच्यावर, तो असा वागून देखील मी त्याला समजावण्याचा प्रयत्न करू लागले.
अहिर, अरे असं काही नसतं, ह्या सगळ्या आंधळ्या श्रद्धा आहेत, ज्या डोळे उघडताच फोल आणि मूर्खपणाच्या आणि पश्चाताप देणाऱ्या असतात.
अरे तूच सांग असं कोणाचं शरीर हस्तगत करून कुणी अमर झाल्याचं एकतरी उदाहरण आहे का तुझ्या ऐकण्यात.
अरे ती स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी तुम्हाला मूर्ख बनवत गेली आणि तुम्ही बनत आहेत अजून हि.
अशी शरीरातील चेतना वैगेरे घेऊन जिवंत आहे वैगेरे फक्त आणि फक्त मूर्खपणाच्या गोष्टी आहेत, अरे ती तुम्हाला हाताशी घेऊन स्वतःच काहीतरी साध्य करू इच्चीत असेल पण तिला त्यात यश आलं नसेल आणि कधीच येणार नाही.
बरकत, पैसे आणि संपत्ती तुमच्याकडे वडिलोपार्जित आहे, ती तुमच्या आधीच्या पिढीच्या मेहनतीने, पुण्याईने वाढली आहे, ह्या असल्या गोष्टींनी नाही मिळाली,
तुम्ही सगळे लोळत बसला आहेत घरात तरीही तिजोरी भरत चाललीये असं झालंय का??? नाही ना मग कसा आलास तू असल्या गोष्टींत.

तो माझं काहीच ऐकायला तयार नव्हता, ते तिघेही तिच्या कडेच पाहत होते, आणि ती माझ्याकडे.
ती घोगऱ्या आवाजात म्हणाली,
"हुशार निघालीस, जे ह्या लोकांच्या ३ पिढ्यांना कळलं नाही ते तुला समजलं.
मला अजून यश आलं नाही पण या वेळेस नक्कीच येणार आहे, मी सर्व ताकतीनिशी तयार आहे, चिंधी कधी हरली नाही.
मी नवीन शरीर हस्तगत करायला सफल झाले नाही, ह्याचा अर्थ असा नाही कि माझ्या कडे काहीच शक्ती नाहीत, हे लोक सर्वकाळ संमोहनाखाली आहेत माझ्या, तू काहीही सांग ते कधीच तुझं ऐकणार नाहीत.
त्यांची सुटका नाही, मृत्यू हीच त्यांची सुटका"

तिने अहीरला इशारा केला आणि अहिरने मला पकडून तिच्या समोर बसवलं, तिथेच असलेलं कुंकू, भस्म माझ्या कपाळी फासलं, अंगावर काय काय टाकलं.

तिचा आवाज वाढला, मंत्र उच्चरण वेगाने होऊ लागलं, ती आहुती टाकत राहिली हवनात, तिचा आवाज वाढला, हि तिघे पुतळ्यांसारखे तिच्या इशाऱ्यावर नाचू लागले, अहिर अचानक माझ्या पुढ्यात येऊन एकवार माझ्या डोळ्यांत पाहून मला कळायच्या आत चर्र्कन माझ्या हातांच्या बोटांवरून धारदार शस्त्र फिरवलं वेळीच हात झटकला नसता तर चारही बोटं त्या हवनात तुटून पडली असती.

मी अविश्वासाने अहिर कडे पाहत बसले, लग्नाच्या दोन वर्षात ज्या माणसाने मला साधी ठेच लागून दिली नाही तोच माणूस आज माझा विश्वास माझं प्रेम ठेचून काढतोय.

हि तीच माणसं आहेत ज्यांनी स्वतःची आजी आई बायको यांच्या भावनांची त्यागाची पर्वा न करता केवळ आपल्या स्वार्थासाठी ह्या अघोरी बाईला सोपवलं, ती लोक माझी काय पर्वा करतील,
ती फक्त आणि फक्त हैवान झाले आहेत.
त्यांचा नायनाट झाला पाहिजे आणि ती जी स्वतःला काळ्या शक्तीने भूषवते आहे तिचा देखील अंत करावा लागेल.पण कसं??? ती इतका काळ जिवंत कशी राहू शकते? ३ पिढ्या म्हटलं तर कमीत कमी १५० वर्षे वय, तिच्या कडे माया आहे त्यानेच तर फसून मी इथवर आले, आई आणि आजी आईच्या सोबत तिने नक्की काय केलं असेल??
अहिर म्हणतोय ते होणे अशक्य आहे पण सर्वच अशक्य नाही.

मी इथवर येताना पाहिलेले झलावे, तीच्या कडे शक्ती आहेत ह्यात शंका नाहीच, पण असं काय करू ज्याने ह्या सगळ्याचा अंत होईल, मी एकटी कशी लढेन ह्या सगळ्यांसोबत?
मला असल्या गोष्टी साठी मरायचं नाहीये. मी आजू बाजू पाहिलं, झऱ्याच्या तो भाग अतिशय हिरवा गार आणि दाट आणि हा भाग पुढे पुढे वाळलेला, जर मुद्दामहून लावली तर अशी आग लागेल जी पूर्ण जंगल भस्म करुन सोडेल..

माझे वेगाने चाललेले विचार अहिरच्या चेहऱ्याकडे पाहत असताना मावळलेले, मी वाचू शकेन की नाही माहित नाही पण अहिर वाचू शकेल का?? तो निघेल ह्या सगळ्यातून?? मी स्वतःच्या हाताने त्याला आगीत होरपळण्यासाठी कशी सोडू????
पण क्षणांत माझ्या विचारांना त्यानेच पक्क केलं, तिने मंत्र उच्चाराने पुजून, काहितरी निशाण काढून एक धारदार शस्त्र अहिर कडे फेकून अहिर ला म्हणाली,
' दे आहुती ' सगळ्यांचे डोळे विचित्र चमकले, हर्षान त्यांचे चेहरे तेजस्वी दिसत होते, ती उत्साही वाटत होती दोन्ही हात आभाळाकडे करुन जोरजोरात मंत्र म्हणू लागली. अचानक सगळी कडे अंधारून आल्यासारखं जाणवायला लागलं, झाड पान अस्वस्थ जाणवू लागली, काहितरी नैसर्गिक शक्तीच्या उलट होतेय, तिला आव्हान देतेय, पुढे काय होईल ह्याची चिंता करत सगळा निसर्ग श्वास रोखून पाहत आहे असं वाटतं होतं. अहिर ने ते शस्त्र उचललं, आणि माझी केस घट्ट पकडून मला उभं केेलं,

मी शेवटची त्याला म्हणाले ' माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर, तू जर साथ दिली तर आपण इथून सुटून नवीन आयुष्य जगू शकतो'
पण त्याचा कानांत माझे शब्द जात नव्हते, त्याने ते धारदार शस्त्र सर्व ताकतीने माझ्या वर उगरलं जे सरळ येऊन माझ्या मानेवर घाव करुन कदाचीत माझी मान धडावेगळे करणार होतं, मी सर्व ताकतीने अहिरच्या गुढग्यावर लाथ मारली, ती इतकी जोरात लाथ बसली की गुढग्यात आवाज झाला, तो कळवळून खालीच बसला,

मी क्षणाचा विलंब न हवनातील जळती लाकडे रक्त येणाऱ्या हाताने उचलून चहू कडे फेकली, ते दोघे माझ्याकडे धाव घेत होते तोच आग पकडणारा तो कापरा सारखा पदार्थ उचलून मी सर्वत्र फेकत होते, ती संतापाने उठली, तिचे डोळे अंगार ओकत होते, ती माझ्यावर हल्ला करायला पुढे काही करणार होतीच तोच तिच्यात पुन्हा बदल व्हायला लागले, ती आपोआप ताज्या जखामांनी भरत गेली, शरिर म्हातारं होत गेलं, जणू तीच्या मूळ रूपात येत होती, ती स्वतः जे होतेय त्याने आश्चर्य चकित होत होती, तिला ते अपेक्षित नसावं.

विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्तचं
पण संपवायचीच होती ना आताच