मेडीटेशन — ध्यानधारणा

Submitted by कविता१९७८ on 19 March, 2021 - 07:58

आजकालच्या स्पर्धेच्या , धकाधुकीच्या जीवनात प्रत्येकजण मानसिक तणावाखाली वावरत आहे. आयुष्य सुखी आणि आनंदी बनवण्याच्या नादात माणूस आपली मन:शांती हरवुन बसला आहे. नोकरी आणि प्रवास यासाठी लागणारा वेळ इतका जास्त आहे की बर्‍याचदा घरच्यांशी संवाद साधणेही कठीण होउन बसले आहे. सततचे धावते जीवन , प्रेशर यामुळे वेगवेगळे आजार जडु लागले आहेत. लहान मुलांचीही परीस्थिती काही वेगळी नाही. मुलांमधे ही शालेय स्तरावर वेगवेगळ्या स्पर्धांमुळे ताणतणाव वाढला आहे , त्यात पालकांच्या अपेक्षेंचे ओझे , शेजार , मित्रमंडळ यांच्यातील सततची स्पर्धा , बरीच मुले या ना त्या कारणाने सतत व्यस्त असल्याने मैदानी खेळ खेळायला न मिळणे यासारख्या कारणांमुळे लहान वयातच मुलांना मानसिक तणावाला सामोरे जावे लागत आहे. ©Copy Right by Kavita Patil

आपल्या सर्वांनाच माहीत आहे की मेडीटेशन केल्याने आपल्याला मन:शांती मिळते पण आणखी बरेच फायदे आपल्याला मेडीटेशन केल्याने मिळतात. मेडीटेशनची पद्धत आणि सराव यावर मेडीटेशनपासुन मिळणारे फायदे आणि अनुभव अवलंबुन असतात, मेडीटेशनची पद्धत जरी वेगवेगळी असली तरीही कुठलेही मेडीटेशन हे दुसर्‍यापेक्षा कमी प्रभावशाली नसते. प्रत्येक मेडीटेशन हे आपल्याला शरीराला , आत्म्याला सूदृढ बनवण्यास मदत करते. मेडीटेशन दरम्यान मिळणारा अनुभव हा प्रत्येकाचा वेगळा असतो. आणि प्रत्येकवेळी आपल्याला हवा तसा अनुभव येईलच असे नाही. म्हणुन मेडीटेशन करताना कधीही कुठलीही अपेक्षा ठेउन मेडीटेशन करु नये. ©Copy Right by Kavita Patil

मेडीटेशन केल्याने मन तर शांत होतेच पण हा एक असा मानसिक व्यायाम आहे की ज्यामुळे मेडीटेशन करताना आपल्या मेंदूच्या कार्यामधे उल्लेखनीय आणि चांगले बदल होतात. मेडीटेशन करताना एका विशिष्ट प्रकारच्या श्वासोछ्वास घेण्याच्या पद्धतीमुळे आपले शरीर शांत होते. मेडीटेशन हे मनाला सशक्त बनवण्याचे एक प्रभावी साधन आहे. नियमित मेडीटेशनमुळे मेंदुचे स्नायु बळकट होण्यास मदत होते. सतत मेडीटेशन केल्याने आंतरीक शांतता मिळते , ताण तणावापासुन मुक्ती मिळते आणि सकारात्मकता येते. शरीरा बरोबर मनाचा शीण ही दुर होतो. सतत मेडीटेशन केल्यामुळे मुलांची स्मरणशक्ती आणि आकलनशक्ती वाढते. नकारात्मकता दुर होते , तणाव कमी होतो, एकाग्रता वाढते तसेच आत्मविश्वासही वाढीस लागतो.©Copy Right by Kavita Patil

कविता पाटील
मेडीटेशन टीचर , रेकी मास्टर

विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

ध्यानधारणा केल्यामुळे मेंदूमधील रसायानांमध्ये बदल घडून येतो, ज्यामुळे मनाचं औदासिन्य दूर होते.

>> मेडीटेशनची पद्धत जरी वेगवेगळी असली तरीही कुठलेही मेडीटेशन हे दुसर्‍यापेक्षा कमी प्रभावशाली नसते

कोणत्या पद्धती आहेत. कसे करतात, व फायदे. या माहितीची थोडक्यात भर घालता येते का पहा लेखात. अधिक माहितीपूर्ण होईल. धन्यवाद.