१. सुवर्ण संधी

Submitted by Ratnakaryenji on 8 January, 2021 - 01:59

जेव्हा मी लार्सन अ‍ॅण्ड टुब्रोत पहिले वर्ष मढ आयलण्ड येथे ड्रिलिंग इक्विपमेंट्स मध्ये एक वर्ष शिकाऊ म्हणुन प्रवेश केला मला सर्व काही नवीन होते. मजा म्हणजे मड आयलण्ड हे नावच मुळात ऐकले नव्हते. सुरवातीलाच पवईला मुलाखत,निवड व कागदपत्रे सादर करण्याचे सोपस्कार झाल्यावर वाटले की पवईच्या मोठ्या कँम्पस मध्ये कुठेतरी खपुन जाऊ . आमची पंचवीस मुलांची निवड झाली होती.तो काळ असा होता की लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो व तिथे मेकॅनिकल ड्राफ्टमन हे तुम्ही सांगितले की लोकांना तुमच्या चेहर्यामागे एक सुंदर चकचकीत वलय फिरते असा भास व्हायचा. कारणच तसे होते. मुंबईत फारच कमी खाजगी कंपन्या होत्या . तेव्हा माझ्या माहितीतल्या माझगाव डाँक,वोल्टास,गोदरेज,रिचर्ड एण्ड क्रुडास व वायमन गार्डन अशा कितीतरी ईजिंनिअरींग कंपन्या होत्या पण मला पहिलीच संधी लार्सन अ‍ॅण्ड टुब्रोत मिळाली. हो मी त्याला संधीच म्हणेन कारण मुलाखत घेण्यार्याने ईग्रजीत काय विचारले ते मला कळलेच नाही. माझा कावरा बावरा झालेला चेहरा पाहून कदाचित पॅनेल मधील एकाला दया आली. त्याने मराठीत विचारले
" कुठे राहतोस?"
मी ताबडतोब उत्तरलो
" मी सांताक्रूझ ला बेस्ट स्टाफ काँर्टस मध्ये राहतो.वडील बेस्ट च्या सेवेत आहेत"
कदाचित बेस्ट ऐकुन त्याला आणखीन द्या आली असावी त्याने विचारले
" घरी कोण कोण आहेत?"
"आई ,वडील,आम्ही चार भाऊ व दोन बहिणी"
त्याने मराठीत प्रश्न विचारत होता म्हणून मन आता हलके झाले होते. कारण मुलाखतीला येताना घरच्यांनी व मित्रांनी लार्सन मध्ये मुलाखत ईग्रजीत घेतात म्हणुन घाबरवून सोडले होते.
त्याने विचारले
"वडिल बेस्ट मध्ये नक्की काय करतात?"
"ते तिथे लेट. 06D04EA7-11E7-4532-9B32-28DE79011612.jpegर पेंटर आहेत"
"लेटर पेंटर म्हणजे काय प्रकार असतो"?"
"बेस्ट मध्ये बरीच डिपार्टमेंट आहेत. पहिले ट्रान्सपोर्ट, दुसरे इलेक्ट्रिक सप्लाय, तिसरे बिल्डिंग डिपार्टमेंट व इतर आणखीन डिपार्टमेंट आहेत.माझे बाबा बिल्डिंग डिपार्टमेंट साठी लागणारे वेगवेगळे सुचना फलक,बिल्डिंग वर मोठी नावे पेंटींग करतात. त्यांचे अक्षर फार चांगले असल्यामुळे ब्रशने बारीक अक्षरे सुंदर काढतात."
मी बोलत गेलो.मनात भिती वाटली आपण जास्त तर बोललो नाही ना? पण तो मंद हसत होता त्याने प्रथम ज्याने ईग्रजीत प्रश्न विचारला त्याच्या कडे पाहिले.आता त्या पहिला आँफिसरने मला इंग्रजीतून न विचारता हिदींत विचारले
" लाईफमे ड्राफ्टमन होना चाहिये ऐसा आपने कभी सोचा?"
मध्येच दुसर्‍या मराठी अधिकाऱ्याने विचारले
" परिवारात कोण ड्राफ्टमन आहे का?"
" नाही माझे बाबा खरं म्हणजे चित्रकार आहेत .स्टाफ काँर्टस मध्ये राहायला जागा मिळाली म्हणून त्यांनी बेस्ट ची नोकरी पत्करली. त्यांना आयुष्यात मेकॅनिकल ड्राफ्टमन व्हायचे होते पण ते स्वप्न पुर्ण झाले नाही म्हणुन मला मी इयत्ता सातवीत सांगितले की तुझे ड्राँईंग चांगले आहे म्हणून जे.जे.स्कूल ऑफ मध्ये जाण्याची स्वप्ने पाहु नकोस मी आयुष्यात चांगला आर्टिस्ट असुनही मला चांगले काम व संधी मिळाली नाही. तु चित्र काढत रहा त्याचा फायदा तुला आयुष्यात केव्हाना केव्हा होईलच.कला अशी लपून राहत नाही . जसा एखादा हिरा कित्येक वर्ष खाणीत पडुन असतो जेव्हा त्याचे नशीब फळफळते तेव्हाच तो सम्राटाच्या मुकुटात जाऊन बसतो. तु टेक्निकल ड्राँईंग्स काढायला शिक. व त्यात तु तुझी कला वापर."
मी भरभरून बोलत होतो.
समोरचे माझ्या बाबांनी मला सांगितलेले गोष्टी मन लावुन ऐकत होते.
दुसर्‍या मराठी माणसाने विचारले
"तु सुरवातीला ही ड्राँईंग्स हा प्रकार कधीच पाहिला?"
मी म्हणालो
" माझा मोठा भाऊ खारच्या रतन वालावलकर टेक्निकल शाळेत शिकत होता तेव्हा मी त्याला ड्राँईंग्स शिट काढताना पहात असे. त्यामुळेच मला आवड निर्माण झाली."
माझे हे उत्तर त्या मुलाखतीत निर्णायक ठरले.
त्या पहिल्या ईग्रजीत प्रश्न करणारा अधिकारी खुष झाला त्याने माझ्याकडे पाहुन उजव्या हाताच्या अंगठ्याने थम्प्सअप केले. मी सिलेक्ट झाल्याची खूण होती.
याच्या पुढे काय झाले ते मी पुढल्या आठवड्यात सांगेन तो पर्यंत राम राम
आपण काळजी घ्या, हात स्वच्छ धुवावेत असे मी सांगणार नाही हे ज्याचे त्याने समजुन घेतले पाहिजे.
क्रमश..

रत्नाकर दिगंबर येनजी
ratnakar.yenji@rediffmail.com

विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान.. छान... घरची पार्शभूमी कळाली, एल अँड टी ची मुलाखत चांगली पार पडली अन सिलेक्ट झाल्याचेही कळाले. आता पुढे पहिला दिवस आणि पुढील सर्व अनुभव वाचण्यासाठी उत्सुकता वाढली..! Bw

छान लिहिलयं!!
पुढील भागाच्या प्रतिक्षेत..