२. ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन

Submitted by Ratnakaryenji on 8 January, 2021 - 07:47

मुलाखत देऊन बाहेर पडणार इतक्यात दुसरे मराठी बोलणारे अधिकारी यांनी
" मिस्टर येनजी तुम्ही ओरीजिनल कुठले? कारण.... येनजी नाव महाराष्ट्रात कुठे ऐकले नाही. "
हे ऐकुन पहिला ईग्रंजीत बोलणारा अधिकारी स्वतःशीच पुटपुटला.
" I think from south"
त्याबरोबर मी ताबडतोब म्हणालो
" No No, Sir ! I am from Vengurla near Goa border"
"अरे मी सुध्दा सावंतवाडीचा आहे. वेंगुर्ला तालुका व सावंतवाडी बाजुलाच "
मराठी अधिकारी बोलला.
" सर खरं म्हणजे आम्ही ओरीजिनल गोव्यातले मला मुळ गाव माहित नाही पण तिकडे विहिरीत ब्रेड टाकुन धर्मांतर करत होते म्हणुनच माझे पणजोबा व इतर लोक तिकडुन पळाले व जवळच असलेल्या शिरोडा गावात स्थाईक झाले. ईतर लोकांनी नावे बदलली , कोणी शिरोडकर, कोणी आरवलीत आले म्हणून आरोलकर तर कोणी सावंतवाडीला आले ते सांवत झाले. पण आमच्या पणजोबांनी जे पुर्वी येनजी नाव होते तेच कायम ठेवले. "
पहिला अधिकारी त्याला मराठी बोलता येत नव्हते पण त्याला मराठी समजत होते. तो लक्ष देऊन ऐकत होता. खुशीत म्हणाला.
" Lovely ! Very interesting "
त्यावर मराठी अधिकारी मला म्हणाला.
" अरे मी सावंतवाडीचा व आमचे नाव सांवत पण आमची कुलदेवता गोव्यातच आहे.ठिक आहे म्हणजे तु मराठी माणुस छान ,Best of luck , बाहेर देसाई मँडम आहेत त्या तुला काही पेपर देतील त्या फ्राँमवर माहीती भर व सह्या कर"
" OK Sir , Thank you very much "
केबिनच्या बाहेर आलो.बाहेर सगळेजण माझीच वाट पहात होते. खर म्हणजे माझे नाव येनजी असल्यामुळे YENJI चा Y ईग्रंजी अक्षरात शेवटी असल्यामुळे मला कुठेही नेहमी शेवटी बोलविले जायचे पण ईकडे Z पासुन सुरवात केल्याने माझी मुलाखत पहिली झाली होती.
मला सगळ्यांनी गराडा घातला. त्याकाळात म्हणजे ऐंशीच्या दशकात सिलेब्रेटी असा काही प्रकार नव्हता नाहीतर मला त्यावेळेस उगाच सिलेब्रेटी झाल्या सारखे वाटले असते.
" अरे येनजी! काय विचारले ? Workshop calculation की Types of materials?"
सुरेश ने विचारले.
सुरेश असे विचारणार हे मला माहीत होते.कारण तो त्या विषयात फार हुषार होता. आम्हाला मशिन ड्राँईंग्स, साँलिड जिओमेट्री, डेव्हलपमेंट, आँर्थोग्राफिक प्रोजेक्शन या विषया शिवाय अलाईड ट्रेड थिअरी व वर्कशॉप कॅल्क्युलेशन हे विषय होते. दोन वर्षांच्या काळात आम्हाला आयुष्यात पुढे फक्त ड्राँईंग्स काढायची म्हणुन जास्त भर त्यावरच दिला जायचा. मला आठवते जेव्हा आमचा कोर्स सुरवात झाला तेव्हा आमच्या पुजनीय कुंटे सरांनी पेन्सील ला टोक कसे काढायचे ते शिकविले होते. पहिला दिवस आमचा टोक काढण्यातच गेला. नंतर जेव्हा कधी आम्ही आमचे ड्राँईंग घेऊन कुंटे सरांकडे जायचो तेव्हा कधी कधी ड्राँईंगकडे न पाहता पेन्सीलला टोक कशी काढली ते पहायचे. त्या काळात क्लच लिड पेन्सील नुकतीच बाजारात आली होती पण ती परवडण्यासारखी नव्हती. आताची 0.5mm व 0.7mm मेकॅनिकल पेन्सील तेव्हा आलीच नव्हती. हे सगळे सांगायचे कारण म्हणजे मशिन ड्राँईंग हा मला अतिशय आवडता विषय होता.अलाईड ट्रेड मध्ये आम्हाला वर्कशॉप मध्ये वेगवेगळ्या प्रोसेस व त्यासाठी लागणाऱ्या मशिन उदा. टर्निंग व त्या साठी लागणारी लेथ मशिन, होल ड्रिलिंग मशिन, एकसाँ कटींग, प्रेस मशिन, मिलिंग मशिन व ग्राईड्रिंग मशिन वगैरे वगैरे थिअरी असायची. ह्या विषयात मला या सर्व मशिनची स्केचेस काढुन त्यांची वर्णने व माहिती लिहिण्यास मला आवडे. माझी चित्रकला चांगली असल्याने फायनला इयरला हँण्ड स्केचिंगची तिन तासाची परिक्षा होती तेव्हा मी माझा पेपर एक तासात सोडवून मी बाकिच्या पाच सहा मुलांच्या पेपरवर फटाफट स्केचेस काढुन दिली. यात मला कधीच अपराधी वाटले नाही. मनात विचार आला मला देवाने कला दिली त्याचा आपण असा वापर केला तर मला पाप लागणार नाही उलट त्या मुलांचे वर्ष वाचुन लवकर नोकरीला लागली तर त्यांच्या परिवारात थोडे सुख येईल. त्या काळात सगळीकडेच परिस्थिती वाईट होती.मधेच मी भरकटलो.मला माफ करा.....आणखी एक मी वर्कशॉप कॅल्क्युलेशन या विषयात फार कच्चा होतो. ...

मघाशी सुरेशने विचारलेल्या प्रश्नावर सुशांत ने उत्तर दिले.
" अरे!असे काही विचारत नाही. फक्त ड्राँईंग्स मधले आँर्थोग्राफिक प्रोजेक्शन किंवा मशिन ड्राँईंगचे सिम्बाँल विचारतात."
त्यावर मी हळु आवाजात म्हणालो
" कामाचे काहीच विचारलेच नाही.माझे नाव येनजी असल्यामुळेच त्यावरच व घरची माहीती व या ट्रेडमध्ये का यावेसे वाटले ते विचारले.
सुशांत ने विचारले.
" कायरे रत्नाकर प्रश्न ईग्रजीत विचारतात का?
" नाही रे ते माझ्याशी मराठीतून बोलले." त्यामुळेच त्याला धीर आला असावा असे त्याच्या चेहर्‍यावर पाहुन मला वाटले.
हळुहळु सर्वांचीच मुलाखत झाली. ईकडे एक पध्दत चांगली होती की ज्यांना निवडले जायचे त्यांना ताबडतोब सांगुन त्यांच्या मनावरचा भार हलका करुन पुढची प्रोसिजर करण्याची सुचना दिली जात असे. आम्ही पंचवीस मुले निवडली त्यात औधोगिक प्रशिक्षण संस्था आग्रिपाडा,साने गुरुजीं मार्ग, मुंबई-११ व फादर अग्नेल टेक्निकल इन्स्टिटय़ूट, वांद्रे पश्चिम या दोन संस्थेची अनुक्रमे १२ व १३ मुले निवडली. फादर अग्नेल या संस्थेतील मुले आमच्या आय.टी.आय. पेक्षा पाँलिश्ड वाटत होती. साहजिकच ते खरे होते. आम्ही आमच्या आय.टि.आय.ला कधी काँलेज म्हटले नाही व ती मुले बोलताना आमच्या काँलेज मध्ये हे शिकविले,आमचे काँलेज असे आहे, आम्ही काँलेज मध्ये असेच त्यांच्या बोलण्यात काँलेज हा शब्द जास्त असायचा. आम्ही आय टी.आय.ची मुले अस समजायची की जिकडे पदवी मिळते त्यालाच काँलेज म्हणतात. फादर अग्नेल सेवाभावी संस्था असली तरी त्यांची कोर्स ची फी आमच्या पाचपट होती. आणखीन एक कारण म्हणजे तिकडे फादर अग्नेल मध्ये
ईजिंनिअरींग डिप्लोमा सुध्दा होता.त्यामुळे ती मुले काँलेज म्हणायची म्हणून ही दोन वर्ष कोर्स असलेली मुलेसुध्दा काँलेज म्हणायची. त्या काळात ज्यांना जास्त फी भरून उपजीविकेचे शिक्षण घेणे शक्य नव्हते तीच मुले आय.टी.आय. मुबंई आग्रीपाडा, साने गुरूजी मार्ग येथे शिक्षण घेत असत . ईकडे आणखीन ईतर कोर्स होते ते म्हणजे टर्नर,फिटर,टुल अँड डाय मेकर,डिझेल व मोटर मेकॅनिक व आणखीन भरपुर पण त्यातल्या त्यात सिव्हिल व मेकॅनिकल ड्राफ्टमन चा कोर्स व्हाइट काँलर ट्रेड होता. ह्या ट्रेड मध्ये तुम्ही वर्कशॉप मध्ये गेल्याशिवाय हात काळे होत नसत म्हणुन या ट्रेड ला पांढरपेशातील काही मुले जातीचे खोटे दाखले देऊन प्रवेश घेत असत. त्यामुळे हुषार गरीब मुलांना हे सरकारी चांगले शिक्षण घेण्यापासून वंचित राहावे लागत असे.
फादर अग्नेल ची बहुतेक मुले सराईत ईग्रंजीत बोलत होती. मुलाखत चालु असलेल्या केबिनच्या बाहेर ड्राँईंग मधल्या आँर्थोग्राफिक प्रोजेक्शन व मिसिंग व्हु (View) बरीच प्रॅक्टिस केल्यासारखे चर्चा करत होते.त्या मानाने आम्ही मुबंई .टी.आय.ची मुले गप्प होती. ड्राँईंग व ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन बद्दल कधी रात्री झोपेतुन मध्येच उठवून आम्हाला विचारले असते तर त्यांनी कसलेही प्रोजेक्शन किंवा मिसिंग व्हु (View)सांगितले असते.आम्हाला प्रॅक्टिस करायची गरज नव्हती कारण हेच ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन पुढे जीवनाची दिशा ठरविणार होते........
याच्या पुढे काय झाले ते मी पुढल्या लेखात सांगेन तो पर्यंत राम राम
आपण काळजी घ्या,अस म्हणतात की आता मोठी लाट येणार आहे. काळजी वाटते.
क्रमश..
रत्नाकर दिगंबर येनजी
ratnakar.yenji@rediffmail.com533D2327-F038-4BE8-8C63-DD0A10FF600B.jpeg

विषय: 
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Use group defaults