कालपासून तिकडे सचिन पगारेंच्या 'लिंबू - मिरची' च्या लेखावर जोरदार चर्चा चालू आहे आणि आज सकाळी ऑफिस मध्ये आल्यावर माझ्या मैत्रिणीने तिच्याबाबतीत घडलेला एक किस्सा मला सांगितला.
हा, तर किस्सा असा आहे कि तिच्या सासूने मसाला करायला घेतला होता आणि माझी मैत्रीण सध्या periods मध्ये आहे आणि चुकून तिचा हात मसाल्याला लागला त्यावरून तिच्यात आणि तिच्या सासूत प्रचंड वादावादी झाली. तिच्या सासुच म्हणन अस होत कि आता तिचा हात लागला म्हणून सगळा मसाला खराब होईल (आणि हे फक्त मसाल्यांच्या बाबतीतच नव्हे तर लोणच्यांच्या बाबतीतही लागू होत म्हणे )
ब्रीद संक्रातीचे
मनातील द्वेश
पटकन सोडवा
गुळाचा गोडवा
मनात वाढवा
कपटी पणाचा
विसरून झोला
तिळ-गुळ घ्या
गोड-गोड बोला
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
खेल खेल मे
खेल खेल के
खेल खेल ये आ जायेगा.
बुद्धीबळ हा एक असा खेळ आहे. जो खेळतात तर दोन जण परंतू दोघेही दोन्हींकडून खेळत असतात. उत्तम बुध्दीबळपटू तो असतो जो स्वतःची चाल खेळून समोरच्याला आपल्या मनाप्रमाणे एक विशिष्ट चाल खेळायला भाग पाडेल. या पार्श्वभुमीवर चित्रपट आधारीत आहे. एक एक चाल सावधपणे खेळून वजीरला कसे नेस्तनाबूत करून बादशाहाला मात देणे हे बघणे उत्सुक्तेचे आहे.
श्री लवथळेश्वर मंदिर
श्री समर्थ रामदास स्वामींना या मंदिरामध्ये श्रीशंकराची 'लवथवती विक्राळा' आरती रचिली होती .
१. माझ्या लग्नाला सुमारे आठ वर्षे होऊन गेली. मी मुंबईत नव्यानेच आलो होतो. नोकरी होती. बायकोही गावाकडचीच . सुमारे महिनाचभर सुखाचे दिवस पाहिले. तदनंतर तिला नोकरी लागली आणि सगळा बट्ट्याबोळ झाला. तिच्या बापाला असलेल्या अनेक मुलींपैकी एक रिकामट्व्कडी तिची बहीण व तिचा रिकामटेकडा नवरा याना सगळा पगार देणार , त्याग करणार या हट्टाने घरात भांडणे सुरु झाली... माहेरी पगार द्यायला माझा विरोध नव्हता. पण भविष्यात होणार्या आपल्या मुलाला चार पैसे तरी ठेवावेत हीच माझी इच्छा होती. उरलेली रक्कम सुमारे ७० % तिने रिकामटेकड्याना द्यावेत ही माझी अपेक्षा होती.
सध्या माबोवर वादविवादाचे असंख्य धागे निघत आहेत, बहुतेक धाग्यावर वाद होत आहेत, फेक आयडीचे प्रमाणही वाढले आहे तेव्हा असे सुचवावेसे वाटते की एखादा धागा उघडायचा तर One time password घेऊन उघडणे सक्तीचे केले तर बोगस धागे निघणे कमी होईल. तुम्हाला काय वाटते??
शीर्षकामधे जरी शब्दांतरिताचे श्रवण असं म्हटलेलं असलं.तरी तो नुसताच काटेकोरपणा आहे. भाषाशास्त्राच्या नियमानुसार असलेला. मुळात उपक्रम संस्थळावर येथे श्री धनंजय यांनी या सूक्ताचे जे छंद आणि वृत्ताचा नियम पाळून शब्दशः भाषांतर तसच्या तसं करण्याचा प्रयत्न केलेला आहे.. तोच ऐंशी टक्के बाजी मारून जाणारा आहे.
तू माझी माऊली .....
हे ज्ञानदेवा, हे ज्ञानराजा,
तुमचे -माझे नाते तरी काय आहे बरे नेमके ? का तुमच्या नावाने, आठवाने ह्रदयात कालवते, डोळ्यात आसवं दाटून येतात ? एक मराठी भाषिक म्हणून ? का तुमच्या ज्ञानदेवीने वेड लावलेला कोणी एक सामान्य रसिक म्हणून ? का तुमच्या तत्वज्ञानाची भूल पडलेला कोणी एक अभ्यासक म्हणून ? का अजून काही ??
तुम्ही खरे तर योगीयांचे योगी, ज्ञानीयांचे देव, प्रत्यक्ष श्रीविष्णूंचा अवतार...
असहिष्णूतेच्या वादात
कुणाला दिसली नाही
कुणाला थोडी वाटली
असहिष्णूतेच्या वादामध्ये
अनेकांनी ऊडी घेतली
असहिष्णूतेचा अर्थ देखील
कुणा-कुणाला ज्ञात नाही
पण फाटक्यात पाय घालण्याची
सवय त्यांची जात नाही
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
देवाच्या नावाखाली
देवाच्या नावाखाली
अंधश्रध्दा चालतात
अनिष्ठ रूढी-परंपरा
आत्मियतेने पाळतात
माणसांना धारेवर
माणसंच धरतात
देवासाठीचे नियम
माणसंच करतात
चुक झाली माणसांची
तर देवाला घेऊ द्या सुड
पण करु नये माणसांनी
ऊगीच मध्ये-मध्ये लुडबूड
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३