धार्मिक-साहित्य

तडका - दसरा शुभेच्छा

Submitted by vishal maske on 21 October, 2015 - 20:59

दसरा शुभेच्छा

झाली असेल चुक तरी
या निमित्ताने ती विसरा
वाटून प्रेम एकमेकांस
साजरा करू हा दसरा

देऊ-घेऊ सोनं-चांदी
आज एकमेकांस स्वेच्छा
सदैव मिळावं यश उदंड
दसर्‍याच्या याच शुभेच्छा

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - गंध

Submitted by vishal maske on 18 October, 2015 - 10:39

गंध

त्रासवलं तर त्रासतात लोक
अंधश्रध्देनं ग्रासतात लोक
त्यांना हे पक्क ठाऊक आहे
फसवलं तर फसतात लोक

हल्ली म्हणूनच तर समाजात
लोक अंधश्रध्देत अंध आहेत
पण फसणार्‍यांच्या पार्श्वभुमीवर
लागलेले श्रध्देचेही गंध आहेत

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - संप

Submitted by vishal maske on 3 October, 2015 - 09:19

संप

पशु-पक्षांच्या माना-पानाचं
रूढी-परंपरेत गूढ भासतं
पितृपाठाची सुरूवात होता
कावळ्यालाही महत्व आसतं

जर विचार करण्याची क्षमता
कावळ्यांनाही दिली असती
तर स्वत:ची किंमत कदाचित
त्यांनाही कळून आली असती

मागण्या कशा करायच्या हे
त्यांच्याही लक्षात आले असते
अन् वेग-वेगळ्या खाद्यासाठी
कावळ्यांनी संपही केले असते

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - संघटनांचे फायदे

Submitted by vishal maske on 29 September, 2015 - 20:21

संघटनांचे फायदे

सामाजिक ऐक्या साठीच
सांघटनिक आखणी हवी
जाती-धर्मांच्या विषमतेवर
वैचारिक झाकणी असावी

सामाजिक समानतेचे धडे
जेव्हा संघटना देऊ लागतील
तेव्हाच संघटनांचे फायदेही
समाजाला होऊ लागतील

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

टिकलेल्या गणेशोत्सवाची शान : मुंबईचे खर्या मानाचे तीनगणपती.

Submitted by मी दुर्गवीर on 20 September, 2015 - 10:12

" परंपरा जपणारे गणेशोत्सव "

मुंबईचा पहिला गणपती : केशवजी नाईकचाळ १२३ वे वर्ष (स्थापना : १८९३)
मुंबईचा दुसरा गणपती : जितेकरवाडी १२२ वे वर्ष (स्थापना : १८९४)
मुंबईचा तिसरा गणपती : कामतचाळ १२० वे वर्ष (स्थापना : १८९६)

कालचा दिवस एक विलक्षण क्षण होता . सकाळी ऑफिस ला निघातांनाच ठरवले होते . संपूर्ण दिवस सार्थकी घालवायचा . दुपारी ऑफिस मधील मैत्रीनीसोबत गिरगावात आलो . गिरगाव म्हणजे हक्काची जागा खुप काही नात या गिरगावाशी आणि येथील लोकांशी जोडले आहे .
खेतवाडीच्या १०व्या गल्लीत गौरी गणपती निम्मित नैवद्या वर ताव मारून पुढे आलो .

तडका - माणसं

Submitted by vishal maske on 18 September, 2015 - 10:26

माणसं

कधी कधी लोकांसाठी
इथे मरतात माणसं
तर कधी कुणासाठी
कुणा मारतात माणसं

माणसांच्याच कुकर्मात
सांगा का खपावे माणसं,.?
माणसांकडून माणसांसाठी
माणसांनीच जपावे माणसं

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

विठठल सापडला

Submitted by नितीनचंद्र on 16 September, 2015 - 04:55

तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल ।
देव विठ्ठल देवपूजा विठ्ठल ॥१॥

माता विठ्ठल पिता विठ्ठल ।
बंधु विठ्ठल गोत्र विठ्ठल ॥२॥

गुरू विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल ।
निधान विठ्ठल निरंतर विठ्ठल ॥३॥

नामा म्हणे मज विठ्ठल सांपडला ।
म्हणोनी कळिकाळां पाड नाही ॥४॥

तडका - विचारवंत मारणारांनो

Submitted by vishal maske on 31 August, 2015 - 23:12

विचारवंत मारणारांनो

विचारवंत मारण्यासाठी
फूसके ठूसके वार असतात
अविचारी माणसांकडूनच
भ्याड गोळीबार असतात

विचावंत मारण्या आधी
विचार त्यांचे वाचुन पहा
जे दुष्कृत्य करत आहात
त्याला स्वत: टोचुन पहा

तुमच्यातील अविवेकाला
विवेकाने विराम कराल
विचारवंतांच्या विचारांना
सदैव तुम्ही सलाम कराल

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - निष्कर्ष

Submitted by vishal maske on 19 August, 2015 - 21:26

निष्कर्ष

कुणाच्या भावना आनंदल्या
कुणाच्या भावना कुस्करल्या
'महाराष्ट्र भुषण' वितरणाने
चर्चा जास्तच विस्फारल्या

वादावर पडदा टाकला तरी
पडद्याच्या आत परामर्श होतील
अन् वेग-वेगळ्या चर्चे मधून
वेग-वेगळे निष्कर्ष येतील

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - पुरस्कारांच्या इतिहासात

Submitted by vishal maske on 19 August, 2015 - 10:27

पुरस्कारांच्या इतिहासात

जशा सकारात्मक गोष्टी घडतात
तशा नकारात्मकही घडत असतात
अन् सामाजिक द्वेष-भावांच्या मध्ये
सत्य मांडणारेही पीडत असतात

वर्तमानात घडणारे प्रत्येक क्षण
भविष्याचा इतिहास राहिले जातील
अन् पुरस्कारांच्या इतिहासाबरोबर
घडलेले वादही पाहिले जाताल

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

Pages

Subscribe to RSS - धार्मिक-साहित्य