धार्मिक-साहित्य

बजरंगी भाईजानचा मराठी रिमेक !!!!!

Submitted by हेमन्त् on 29 July, 2015 - 11:46

"बजरंगी भाईजान" ने प्रेरीत होऊन त्याचा मराठी रिमेक बनवायचे एका मराठी चित्रपट निर्मात्याने घोषित केले आहे.
चित्रपटाचे नाव "मारुती भाऊ" असे असेल आणि मुंबईत हरवलेल्या पुणेकर मुलीला एक मुंबईकर कशी मदत करतो हे दाखविले जाईल.
पुण्यात मुलीला सोडताना त्याला ज्या अडचणी येतात, जसे की तुसडेपणाने बोलणारे पुणेकर, पत्ता विचारल्यावर तोंड वाकडं करणारे पुणेकर अशा अनेक अडचणी दाखविल्या जातील.
याशिवाय एक विशेष साहस द्रुष्य असेल ज्यात सिग्नल तोडुन नो एन्ट्री मधे घुसणार्या एका पुणेकराच्या दुचाकी पासुन मारुती भाऊ त्या मुक्या मुलीला वाचवतो.

सांगता - निमित्त पालखी सोहळ्याचे- भाग- आठ

Submitted by किंकर on 26 July, 2015 - 16:58

निमित्त पालखी सोहळ्याचे .भाग एक - http://www.maayboli.com/node/54551

निमित्त पालखी सोहळ्याचे .भाग दोन - http://www.maayboli.com/node/54561

निमित्त पालखी सोहळ्याचे- भाग तीन- http://www.maayboli.com/node/54583

निमित्त पालखी सोहळ्याचे- भाग चार - http://www.maayboli.com/node/54599

निमित्त पालखी सोहळ्याचे- भाग- पाच- http://www.maayboli.com/node/54630

निमित्त पालखी सोहळ्याचे- भाग सहा - http://www.maayboli.com/node/54629

निमित्त पालखी सोहळ्याचे- भाग- सात - http://www.maayboli.com/node/54748

कोंडल्याचे गाणे....

Submitted by लाजो on 12 July, 2015 - 21:58

कोंडल्याचे गाणे...

----

विशेष सुचना १:

एक लिंब झेलू बाई दोन लिंब झेलू---- या परंपरागत गायल्या जाणार्या भोंडल्याच्या गाण्यावरून प्रेरणा मिळाली...

चाल अर्थात त्याच गाण्याची Happy

माहित नसेल तर ऐकण्यासाठी मला वि पु करा... माझ्या मंजुळ आवाजात रेकॉर्ड करून पाठवेल Happy

----

एक तडका मारू बाई दोन तडके मारू
दोन तडके मारू बाई तीन तडके मारू
तीन तडके मारू बाई चार तडके मारू
चार तडके मारू बाई पाच तडके मारू

पाचा तडक्यांचा पुरवठाsss

माळ घाली कवीराजाला

कवीराजाची सुस्साट गाडी
येता जाता कविता पाडी...

कवितांच्या भाराने पिचली जनता

अरे अरे राजा बस तुझी सजा....

गोत्र माझे भागवत

Submitted by पुरंदरे शशांक on 10 July, 2015 - 07:05

गोत्र माझे भागवत

आज सोनियाचा दिन
दिंडी येतसे वेशीला
संतमेळ्यासवे विठू
स्वये जाई पंढरीला

दिंड्या पताकांचे भार
आले वैकुंठ घरास
विठु नामाचा गजर
काय वानावी मिरास

भाळी अबीर चंदन
मुखे हरिचा गजर
नुरे संसाराचा पाश
विठु व्यापी अवकाश

तुका-माऊली गजर
धन्य गर्जते अंबर
डोळे वाहती भरुन
भक्ति अंतरापासून

विठु सखा भगवंत
गोत्र माझे भागवत
वारकरी गणगोत
नमनाची रीतभात

वारी जाते पंढरीला
चित्त वाहिले विठ्ठला
दुजे नाठवे जीवाला
नामरुप श्वास झाला .....

श्री निरंजन रघुनाथ चरित्र भाग 1

Submitted by शशिकांत ओक on 7 July, 2015 - 14:33

श्री निरंजन रघुनाथ चरीत्र

नाम विठोबाचें

Submitted by नवनाथ राऊळ on 28 June, 2015 - 11:53

नारायणनामें । वर्षाव सुखाचा ।
उद्धार जिवाचा । तेणें होय ॥१॥

नाम विठोबाचें । द्रव्य जयांगाठीं ।
परमार्थहाटीं । साहुंकार ॥२॥

पांडुरंगनाम । आयुध अजोड ।
समूळ बीमोड । पातकांचा ॥३॥

इहलोकीं हेचि । साधन साचार ।
भवसिंधू पार । करावयां ॥४॥

नाथ म्हणें नाम । जपावें सज्जनीं ।
आठवावां धनी । वैकुंठीचा ॥५॥

लाभो संतसंग

Submitted by नवनाथ राऊळ on 24 June, 2015 - 03:06

लाभो संतसंग । भक्तीचा पैं ठेवा ।
घडो हरीसेवा । जन्मोजन्मीं ॥१॥

ज्ञानियांचा राजा । भक्तराज नामा ।
मार्ग विष्णूधामां । उजळितीं ॥२॥

आम्हा हरीदासां । आधार ते मेरू ।
करुणासागरु । धन्य संत ॥३॥

तुका एका चोखा । वैष्णव मंडळी ।
तयां पायधुळीं । नाथ शुद्र ॥४॥

नारायणी भाव

Submitted by नवनाथ राऊळ on 21 June, 2015 - 08:04

नारायणी भाव । परिस बा दासा ।
नुपजे सहसा । अकारणें ॥१॥

हरीप्रेम चित्तीं । खळाळें निर्झरु ।
उमळें पाझरु । अहोभाग्यें ॥२॥

ऐशा भावें पाहीं । बहुमोल ठेवा ।
पांडुरंगें जीवां । धाडिलासे ॥३॥

नाथ म्हणें रावें । प्रेमें भरविला ।
तोचि जाणियेंला । गुरूमंत्र ॥४॥

नवीन सभासदांसाठी प्रश्नावली

Submitted by दिनेश. on 19 June, 2015 - 06:33

मायबोलीवर एखाद्या नव्या सभासदाने थेट देवनागरीत काही लिहिले कि मनात प्रश्नांचे काहूर उठते. त्यामूळे ही प्रश्नावली भरून घ्यावी काय ? पडीक सभासदांनी भर घालावी.. हि विनंति ( नम्र वगैरे नाही, थेट विनंतिच )

१) तूम्ही मराठी टायपायला कुठे शिकलात ?
२) तूमचे वय इतके तास, इतके दिवस, इतके आठवडे आहे, ते का ?
३) यापुर्वी नेमक्या कुठल्या कारणासाठी तूमच्यावर कारवाई ( पक्षी हकालपट्टी ) झाली होती ?
३) जूना ( रेग्यूलर ) आय डी कुठला होता ?
४) त्या वेळचे डू. आय. कुठले होते ?
५) कुठल्या कंपूत होता ?
६) गेल्या वर्षाविहाराला आला होतात का ? का आला होतात ?
७) तूम्हाला काय येतं ( घाम सोडून ) ?

आपुलालें चित्त

Submitted by नवनाथ राऊळ on 18 June, 2015 - 03:10

आपुलालें चित्त । विठुचें राऊळ ।
राखावें निर्मळ । सकळांनी ॥१॥

काम क्रोध माया । मद मोह द्वेष ।
किंचितही लेश । धरों नये ॥२॥

विषय समूळ । कुर्वाळितीं चित्तां ।
अलिप्त सर्वथा । विठू राहें ॥३॥

नाथ म्हणें रितें । चित्त शुचिर्भूत ।
नित्य वसें तेथ । विठाबाई ॥४॥

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - धार्मिक-साहित्य